Steel and Cement Rate: घर बांधण्याचे स्वप्न आता उतरणार सत्यात; स्टील आणि सिमेंटच्या दारात पुन्हा विक्रमी घसरण..

Steel and Cement Rate: वाढत्या महागाईने (inflation) आता प्रत्येकाच्या चिंतेत भर घातली आहे. नुकताच कुठे कोरोनाने थोडा धीर घेतला होता. जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. तेवढ्यातच र शि या आणि य क्र नचे सुरु झाले. त्यामुळे छोट्यातल्या-छोट्यापासून ते मोठ्यातल्या-मोठ्या गोष्टींवर त्याचा परिणाम बघायला मिळाला. या देशांमधून तेल व वायु यांच्याशिवाय ईतरही गोष्टी निर्यात होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एकप्रकारे मंदीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा परिणाम थेट सर्वसामान्य माणसांच्या खिशावर झाला. वाढत्या महागाईने अनेकांच्या चिंतेत भर पडली. मात्र आता पुन्हा काही दिलासादायक बातम्या समोर येत आहे. अनेक मुलभुत गोष्टींच्या दरांमध्ये वेगाने घसरण होत असल्याचे चित्र आहे. ज्यामुळे थांबवुन ठेवलेल्या कामांना आता पुन्हा गती देता येऊ शकते. (Today Steel rate)

Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..

स्वत:चे छान, सुंदर घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. त्यामुळे अनेकांच्या मनात नविन घर बांधण्याचे किंवा आहे त्या घरामध्ये काही मगत्वाचे बदल करण्याचे विचार असतात. बांधकाम साहित्यांच्या दरांनी गाठलेल्या ऊच्चांकीने अनेकांना या विचाराला ब्रेक लावावा लागला. मात्र आता घर बांधु ईच्छिणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. बांधकाम साहित्यांच्या किंमती घसरल्या आहेत. बांधकाम साहित्यामध्ये सगळ्यात महत्वाचे मानल्या जाणार्‍या स्टीलच्या किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे आता तुमच्या बांधकामाचा खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे बांधकामाच्या विचारात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरु शकते.

बांधकामात सगळ्यात महत्वाचे साहित्य असणारे स्टील तब्बल २० हजार प्रति टनने कमी झाले आहे. मागिल ४ महिन्याततील स्टीलच्या किंमतीतील ही सर्वात मोठी घसरण मानली जाते आहे. ४ महिन्यांअगोदर स्टीलचे भाव ८५ हजार रुपये प्रति टन होते. त्यामुळे स्टीलचे हे दर अनेकांच्या आवाक्याबाहेरचे होते. परिणामी अनेकांना आपल्या चालू बांधकामाला यामुळे ब्रेक लावाला लागला होता. मात्र आता स्टीलच्या दरामध्ये झालेली ही घसरण बांधकाम करु ईच्छिणार्‍यांसाठी खुशखबर घेऊन आलेली आहे. त्यामुळे यापेक्षा कमी होण्याच्या अपेक्षेवर विसंबुन राहण्यापेक्षा आत्ताच बांधकाम करण्याची ही योग्य वेळ मानली जाते आहे.

दर वाढण्याची कारणे

कोरोना सगळ्यांसाठीच एकप्रकारे कर्दनकाळ म्हणून अवतरला होता. अनेकांचे कधीही भरुन न निघणारे नुकसान कोरोनाने केले. अनेक ऊद्योजक, व्यावसायिकांवर तर अक्षरश: रस्त्यावर येण्याची वेळ आली. स्टील ऊद्योजकांना सुद्धा कोरोनाचा मोठा फटका बसला होता. याशिवाय कच्च्या माल‍ाच्या भावात वाढ झाली. त्यामुळे स्टील ऊत्पादकांनी स्टीलचे दर वाढवले होते. कोरोनाचा कहर संपत नाही तोच दोन देशाच्या भांडणाचे संपूर्ण जगाच्या पुरवठा मागनीवर परिणाम केला. आणि पुन्हा कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली. परिणामी ऊद्योजकांना सुद्धा भाव वाढवावे लागले.

यादरम्यानच केंद्र सरकारने सुद्धा निर्यात करावर वाढ केली. त्याचा थेट परिणाम निर्यातीवर बघायला मिळाला. भारताचे निर्यातीतील प्रमाण कमी झाले. त्यामुळे ऊद्योजकांना याचा मोठा फटका बसला. याचदरम्यान स्टीलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने स्टीलची मागनी अचानक कमी झाली. परिणामी ऊद्योजकांनी थेट ऊत्पादन कमी करुन निर्यात शुल्क कमी होण्याची वाट बघण्याचा निर्णय घेतला होता. आता हळूहळू स्टील ऊद्योगाची स्थिती पूर्वपदावर येत असल्याने ऊद्योगाला चांगले दिवस येणार असल्याची अपेक्षा ऊद्योजकांकडून व्यक्त केली जाते आहे.

दर कमी होण्याची कारणे

केंद्र सरकारने स्टील ऊद्योगाच्या निर्यातीवर लावलेला कर कमी केला. त्यामुळे स्टील ऊद्योजकांनी आता ऊत्पादनात वेगाने वाढ करण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरील या यु द्धा चा प्रभाव कमी झालाय. परिणामी मागनीमध्ये वाढ झाली आहे. केंद्राने निर्यात शुक्ल कमी केल्याने आता स्टीलची परदेशात निर्यात करणे सोयीस्कर झाले आहे. याशिवाय कच्च्या मालाची मागनी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे स्टीलच्या दरांमध्ये घसरण होते आहे. सध्या स्टीलचे दर कमी झाले असले तरी येणाऱ्या दोन तीन महिन्यांमध्ये हे दर पुन्हा गगनाला भिडणार असल्याचे देखील तज्ञांनी म्हटल आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर स्टीलचे साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे.

दर घसरण्याचे परिणाम

बांधकाम साहित्यामध्ये स्टील सगळ्यात महत्वाचे आहे. त्यामुळे बर्‍यापैकी स्टीलच्या दरावर बांधकामाचा खर्च निश्चित केला जातो. स्टील महाग होणे म्हणजे, पर्यायाने सर्वच साहित्य महाग होण्यासारखे आहे. त्यामुळे स्टीलचे भाव सातत्याने वाढत असल्याने अनेकांनी घराचे बांधकाम अर्ध्यावरच सोडून दिले होते. आता मात्र पुन्हा बांधकामास सुरुवात करता येणार आहे. मागील ४ महिन्यांतील स्टीलच्या दरांमधील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे आत्ताच स्टील खरेदी करुन घर बांधकामास चालना देणे योग्य ठरेल. याशिवाय रीयल ईस्टेटच्या व्यवसायातली बंद पडलेली कामे सुद्धा आता पुन्हा नव्या वेगाने सुरु होतील.

हे देखील वाचा Goat milk benefits: म्हशीचे नाही शेळीचे दूध आहे सर्वोत्तम! शेळीच्या दुधाचे हे 6 जबरदस्त फायदे पाहून तुम्हीही जाल चक्रावून..

Dangers Of Using GB WhatsApp: GB WhatsApp वापरण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितही असतील, पण हे खतरनाक धोके जाणून तुम्हीही कराल त्वरीत बंद..

RBI Rule On Torn Note: जळालेल्या फाटलेल्या नोटा आता कुठल्याही बँकेत मिळणार बदलून; जाणून घ्या RBI चा नवा नियम..

Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..

Astrology 2022: तब्बल ५९ वर्षांनी जुळुन आलाय हा योग; या राशींना होणार हे जबरदस्त फायदे..

Health tips: उभा राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम वाचून बसेल धक्का; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत..

Love addict Side effect: प्रेम रोगाचे दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; जाणून घ्या याची लक्षणं आणि उपाय..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Marriage Tips: एका वर्षानंतर मॅरेज लाईफ का होते बोरिंग? वैवाहिक जीवनात प्रेमाचा बहर फुलवत ठेवण्यासाठी फॉलो करा या 4 टिप्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.