big billion days: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करा निम्म्या  किंमतीत; जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर आहे ही ऑफर..

0

big billion days: धावपळीच्या जमान्यात प्रत्येकाला प्रत्यक्ष दुकानात जाऊन शॉपिंग करणे शक्य होत नाही. शिवाय अनेक दुकानांमध्ये आपल्याला पाहिजे तेवढा डिस्काउंट देखील मिळत नाही. वेळ बरोबर ऑफर्स या सगळ्या गोष्टींना आता पर्याय उपलब्ध आहे. आता अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर (e commerce website) ग्राहक इलेक्ट्रॉनिक (electronic) वस्तूंबरोबरच  अनेक उपयोगी वस्तू देखील खरेदी करू शकतात. दुकानात जा, तिथे शोधाशोध करा, माहिती घ्या या सर्व कटकटींपेक्षा थेट घरबसल्या तुम्हाला सगळं काही मिळते आहे. अनेक e कॉमर्स वेबसाईटमध्ये फ्लिपकार्टने ग्राहकांच्या मनात विश्वासार्हता निर्माण केली आहे. (Flipkart the big billion days sale)

नेहमी प्रमाणे फ्लिपकार्टने पुन्हा एकदा ‘बिग बिलीयन डेज सेल’ सुरु केलाय. यावर्षीच्या सेलची ही ९ वी आवृत्ती आहे. या सेल अंतर्गत फ्लिपकार्टने (Flipkart) अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. हा सेल सुरु होण्याअगोदर १ रुपये भरुन ईलेट्रॉनिक्स, त्याचबरोबर घर सौदर्यं, यांसारख्या विविध कॅटीगीरीच्या प्रोडक्टची ऍडवान्स बुकींग देखील तुम्ही करु शकता. तसेच २० हजारांखाली स्मार्टफोन्सवर तर विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत. मार्केटमध्ये येणारे नवनवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवनवीन फीचर्स स्मार्टफोनमध्ये येत असल्याने ग्राहक या स्मार्टफोनकडे अधिक आकर्षित होतात. जाणून घेऊया फ्लिपकार्टच्या या सेल विषयी सविस्तर.

फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार या सेलमध्ये आयसीआयसीआय बॅंक (ICICI Bank) आणि एक्सीस बॅंक (Axis Bank) यांच्याशी फ्लिपकार्टने भागिदारी केली आहे. त्यामुळे ग्राहकाला विक्रीदरम्यान केलेल्या सर्व खरेदीवर तत्काळ १०% सुट मिळेल. बिग बिलीयन डेज हा सेल ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच सुरु असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाई करण्याची गरज आहे. या बिग बिलीयन डेज सेलमध्ये स्मार्टफोन (smartphone) खरेदीवर विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत. अनेक महागडे स्मार्टफोन २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ऊपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोनची माहिती सांगणार आहोत. जे ‘बिग बिलीयन डेज’ सेलअंतर्गत २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ऊपलब्ध आहेत. जाणून घेऊया सविस्तर.

शाओमी 11 हायपरचार्ज 5G फोन (Xiaomi 11)

या स्मार्टफोनची मुळ किंमत २८ हजारांच्या जवळपास आहे. हा स्मार्टफोन बिग बिलीयन डेज सेलअंतर्गत केवळ १९ हजार ९९९ रुपयांत ऊपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. या फोनमध्ये 16 GB रॅम आणि 1TB पर्यंत विस्तार करता येणे शक्य आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेराचा विचार करायचा झाल्यास, या स्मार्टफोनचा कॅमेरा जबरदस्त देण्यात आलेला आहे. ब्लॉगर आणि रिलच्या या जमान्यात स्मार्टफोन खरेदी करताना अनेकजण कॅमेराला महत्त्व देतात. शाओमी 11 हायपरचार्ज 5G फोन ने देखील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन या स्मार्टफोनचा कॅमेरा तब्बल 108 MP प्रदान केला आहे.

या स्मार्टफोन कॅमेऱ्याविषयी विस्तृतपणे सांगायचं झालं तर, या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 108 MP त्याचबरोबर 8MP वाईड अँगल आणि 2MP डेप्त सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर या कॅमेऱ्याचा फ्रंट कॅमेरा देखील 16 मेगापिक्सलचा असणार आहे. एकूणच ग्राहकांना खूप कमी किमतीमध्ये जबरदस्त कॅमेरा फोन बिग बिलियन डेज सेलमध्ये खरेदी करता येणार आहे.

शाओमीच्या या स्मार्टफोनचा फक्त कॅमेराच उत्कृष्ट नाही, तर या स्मार्टफोनचा डिस्प्ले आणि बॅटरी बॅकअप देखील जबरदस्त देण्यात आला आहे. सोबतच या स्मार्टफोनचे प्रोसेस देखील भन्नाट आहे. शाओमीने कॅमेरा बरोबर बॅटरी देखील जबरदस्त दिली आहे. 4500 mAH ची ली-पॉलीमर बॅटरी दिली आहे. सोबतच 16.94 सेमीचा (6.67 ईंच) एचडी आणि AMOLED डिस्पे आहे देखील आहे. प्रोसेसर देखील Mediatek Dimensity दिला आहे.

OppoF19 PRO + 5G

२१ हजारांपेक्षा अधिक किंमत असणारा हा फोन केवळ १ हजार ९९० रुपयांत तुम्हाला फ्लिपकार्टव बिग बीलीयन डेज सेलअंतर्गत ऊपलब्ध आहे. या फोनची वैशिष्ट्ये बघुयात: कॅमेर्‍याचं म्हणाल, तर या फोनमध्ये 48MP क्वाड कॅमेरा (48MP मुख्य + 8MP वाइड अँगल मॅक्रो + 2MP पोर्ट्रेट मोनो लेन्स + 2MP मॅक्रो मोनो लेन्स) आहे. यासोबतच 16MP फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. चार्जींग पावर जास्तवेळ टिकण्याची आवश्यकता असणार्‍यांसाठी तर हा फोन प्रचंड फायदेशीर आहे. कारण यामध्ये 50W फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानासह 4310 mAH लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. ज्यामुळे चार्जींग जास्तवेळपर्यंत टिकते. आणि फास्ट देखील होते.

MOTO G82 5G

२१ ते २३ हजार दरम्यान असणारा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरील या सेलदरम्यान केवळ १८ हजार ४९९ रुपयांत ऊपलब्ध आहे. या स्मार्टफोन विषयी जाणुन घेऊयात सविस्तर. MOTO G या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना जबरदस्त कॅमेरा मिळणार आहे. जर तुम्ही कॅमेराफोनच्या शोधात असाल, तर तुमचा शोध या ठिकाणी पूर्ण होत आहे. स्मार्टफोनच्या खरेदीवर पन्नास एमपी त्याचबरोबर 8MP + 2MP यासोबतच 16MP फ्रंट कॅमेरा देखील मिळणार आहे.

या स्मार्टफोनची बॅटरी 5000 mAh लिथियम देण्यात आली आहे.8 जीबी रॅम त्याचबरोबर 128 जीबी स्टोरेज या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला मिळत आहे. तुम्ही 1 TB पर्यंत देखील वाढवू शकता. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा विचार करायचा झाल्यास या स्मार्टफोनला 16.76 सेंटीमीटर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले फुल एचडी प्लस असणार आहे. याच्या प्रोसेसरचा विचार करायचा झाल्यास क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G देण्यात आला आहे.

हे देखील वाचा flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

Saffron Milk Side effect: मूल गोरं व्हावं म्हणून गरोदरपणात केशर युक्त दूध पिताय? जाणून घ्या याचे बाळाच्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात..

Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

Using Phone in Toilet: शौचालयामध्ये स्मार्टफोन वापरण्याचे दुष्परिणाम जाणून तुम्ही देखील बंद कराल ही जीवघेणी सवय..

Ration Card: रेशन दुकानदार पावती, नियमानुसार धान्य देत नाही? फक्त या नंबरवर कॉल करा लगेच उठेल दुकानदाराचा बाजार..

Urine Colour Chart: लघवीच्या रंगावरुन समजते आजाराचे स्वरूप; जाणून घ्या लघवीच्या विविध रंगांविषयी..

Chanakya niti: नैराश्यात आहात, चिंताग्रस्त आहात? काळजी करू नका; चाणाक्य नितीमधील या 3 गोष्टी बदलून टाकतील तुमचे आयुष्य..

Dangers Of Using GB WhatsApp: GB WhatsApp वापरण्याचे फायदे कदाचित तुम्हाला माहितही असतील, पण हे खतरनाक धोके जाणून तुम्हीही कराल त्वरीत बंद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.