Heart Attack Symptoms: यामुळे हृदयविकाराचा झटका नेहमी सकाळीच येतो; ही लक्षणे जाणवल्यास वेळीच व्हा सावध आणि वाचवा जीव..

0

Heart Attack Symptoms: हृदयविकार (heart attack)आणि हृदयविकाराचा झटका आज सामान्य बाब झाली आहे. पूर्वी एका निश्चित वयानंतर हृदयविकाराचा झटका येणे किंवा हृदयविकार संबंधित व्याधी जडणे ग्राह्य धरले जायचे. मात्र आता याला वयाची मर्यादा राहिलेली नाही. बहुतांश तरुणांना हृदयविकार असल्याचे बघायला मिळते. तसेच तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. रोजची होणारी धावपळ, आहारातील असमतोलपणा, कामाचा ताण आणि वाढती व्यसनाधीनता या सर्व कारणांमुळे हृदयविकारांमध्ये वाढ होते आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका कुठल्याही वयात येऊ शकतो. (heart attack can occur at any age)

हृदयविकाराचा झटका येण्याची वेळ बहुधा सकाळची असते. सकाळी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त आहे. डॉक्टरांनी सुद्धा हे मान्य केले आहे. काही संशोधनातून सुद्धा ही माहिती समोर आली आहे. सकाळच्या वेळेस शरीरामध्ये काही महत्वाचे बदल होत असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हृदयविकार किंवा हृदयाशी संबंधीत काहीही त्रास असणार्‍यांनी सकाळच्या वेळी काही खबरदार्‍या घेणे जरुरी आहे, तसेच सावधानता सुद्धा बाळगली गेली पाहिजे. मात्र सकाळी असे नेमके काय होते? की यादरम्यानच झटका येण्याची शक्यता वाढते? जाणून घेऊया सविस्तर.

सकाळच्यावेळी आपले शरीर काही हार्मोन्स सोडत असते. त्यापैकीच सायटोकिनीन हे एक महत्वाचे हार्मोन आहे. सायटोकिनीन खासकरून सकाळी ४ च्या सुमारास शरीरात जास्त एक्टीव्ह होते. त्यामुळे सकाळी ४ च्या दरम्यान झोपेतच अटॅक येण्याची शक्यता असते. आपण बघतो की झोपेतच अटॅक येण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते दिवसभर आपले शरीर सक्रीय असते. आपल्या शरीरात ऊर्जेचा प्रवाह प्रचंड असतो. मात्र रात्री आपले शरीर प्रचंड थकलेले असते.

त्यामुळे शरीराला विश्रांतीची आणि झोपेची आवश्यकता असते. पहाटे आपल्या शरीरातील रक्तदाब अचानक काहीसा वाढलेला असतो, त्यामुळे हृदयाची गती सुद्धा वाढते. अशावेळी रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा होण्यास अडचणी येतात. आणि अटॅक येण्याची शक्यता असते. सामान्य माणसात सहसा याचा प्रभाव दिसून येत नाही. मात्र हृदयविकार असणार्‍यांना याचा त्रास होऊ शकतो व अटॅक सुद्धा येऊ शकतो.

सर्केडियन रिदम असु शकते जवाबदार

तज्ज्ञांच्या मते सर्केडियन रिदम सुद्धा सकाळच्या वेळी अटॅक येण्यास जवाबदार ठरु शकते. सर्केडियन रिदम ही एकप्रकारची शारीरीक प्रक्रिया आहे. शरीराचे घड्याळ सुद्धा सर्केडियन रिदमला म्हटले जाते. अंधार आणि प्रकाशाच्या सहाय्याने सर्केडियम रिदम काम करत असते. सर्केडियन सिस्टम सकाळच्या वेळी PAI-1 पेशी सोडते. या पेशींचे प्रमाण वाढल्यास रक्ताच्या गुठळ्या पाहिजे त्या प्रमाणात फुटत नाहीत. किंवा पातळ होत नाहीत. रक्ताच्या गुठळ्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या धमन्यांमध्ये शिरल्यास हृदयाला सुरळीत रक्तपुरवठा होत नाही. हृदयला होणारा रक्ताचा पुरवठा असंतुलित झाल्यास पुन्हा हार्ट अटॅकचा धोका अधिक होत जातो.

सकाळी ४ ते १० च्या दरम्यान येतो अटॅक

सकाळच्या वेळी आपले शरीर संथ काम करत असते. रक्तातील प्लेटलेट्स चिकट असतात. सकाळच्या वेळी त्यांच्यातला चिकटपणा जास्त असतो. त्यामुळे एड्रेनाईल ग्रंथींतून एड्रेनाईलचा स्त्राव वाढतो. परिणामी एड्रेनाईलच्या अतिरिक्त स्त्रावामुळे कोरोनरी धमन्यांमध्ये प्लेक तुटतो. आणि त्यामुळे हार्ट अटॅक येण्याच्या संभावना अधिक हित जाते. त्यामुळेच सकाळी व्यायाम करण्याचा किंवा सकाळी फिरायला जाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात असतो. सकाळी व्यायाम केल्याने शरीरात ऊर्जा संचारते, त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सचा चिकटपणा कमी होतो. व हृदयाला होणार्‍या रक्तपुरवठ्यात कुठल्याही अडचणी येत नाहीत.

यामुळे वाढतो हृदयविकाराचा धोका

माणसांचे शरीर रोगीष्ट होण्यामागे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे बदलेली जिवनशैली आणि आहार आहे. त्यामुळे धावपळीच्या या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. योग्य प्रमाणात व्यायाम आणि सकस आहार यांना आपल्या रोजच्या जिवनात समाविष्ट करुन घेणे फार गरजेचे आहे. ऊच्च रक्तदाब आणि मधुमेह, हृदयविकाराचा झटका येण्याचे महत्वाचे कारण ठरु शकते. याशिवाय अनेक तज्ज्ञांकडून बदलेल्या जिवनशैलीवरच भाष्य करण्यात आलेले आहे. कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, शरीरातील स्थुलता यांसारखी अनेक कारणे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात.

हे देखील वाचा Hangover: हा पदार्थ खाल्ल्यास दारूची नशा उतरते एका मिनिटांत; जाणून घ्या सविस्तर..

RBI BRBNMPL Recruitment 2022: या उमेदवारांना रिझर्व बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशी केली जाणार निवड..

eyes colour describe nature: डोळ्यांच्या रंग सांगतो माणसाचा स्वभाव; या रंगाचे डोळे असतात प्रचंड धोकादायक..

Boy impress girl: या मुलांकडे मुली होतात सर्वात जास्त आकर्षित; वैवाहिक जोडीदार निवडण्यासही असतात तयार..

Boy impress girl: या मुलांकडे मुली होतात सर्वात जास्त आकर्षित; वैवाहिक जोडीदार निवडण्यासही असतात तयार..

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.