eyes colour describe nature: डोळ्यांच्या रंग सांगतो माणसाचा स्वभाव; या रंगाचे डोळे असतात प्रचंड धोकादायक..

0

eyes colour describe nature: डोळे (eyes) आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. कारण डोळ्यांमुळेच आपण हे सुंदर जग बघू शकतो. जर डोळेच नसते तर जगण्याचा आनंदच आपण घेऊ शकलो नसतो. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. “डोळ्यांचे मुख्य काम हे बघणे आहे” हे आपल्याला माहिती आहे. अनेकांच्या डोळ्यांचा आकार वेगवेगळा असतो. एखाद्या वेळेला जेव्हा तोंडाने आपण काही बोलू शकत नाही, तेव्हा आपले डोळे बोलतात. डोळ्यांना हृदयाचा दरवाजा म्हटलं जाते. डोळ्यांवरुन एखाद्याचा स्वभाव सुद्धा ओळखला जाऊ शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? अनेकांचं उत्तर असेल नाही. मात्र आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Eye color describes the nature of a person)

अनेकांच्या डोळ्यांचा रंग वेगवेगळा असतो. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण तुम्हाला हे नक्कीच माहीत नसेल, डोळ्यांच्या रंगावरुन एखाद्याचे स्वभाव वैशिष्ट्य, त्याची वर्तणुक सुद्धा ओळखता येते. डोळ्यांच्या रंगावरुन कुणाच्या स्वाभावाचा अंदाज कसा काय घेता येऊ शकतो? एखाद्या व्यक्तीसोबत ठराविक वेळ घालवल्यानंतरच आपण त्याला जज करु शकतो. मात्र डोळ्यांच्या रंगावरुन त्याला जज करता येणे हे नवलच आहे. असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. मात्र डोळ्यावरून माणसाचा स्वभाव ओळखता येतो. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

काळे किंवा भुरे डोळे

काळा किंवा भुरा रंग असणार्‍या डोळ्यांचे व्यक्ती प्रचंड विश्वासू असतात. अशा व्यक्तींना स्वत:वर, स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असतो. तसेच ते दुसर्‍यांच्या विश्वासास देखील पात्र असतात. लोक अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. त्यांचा स्वभाव दयाळू असतो. इतरांप्रती ते फार दयाळू असतात. तसेच मेहनती सुद्धा असतात. कुठल्याही गोष्टीस साध्य करण्यासाठी पुष्कळ मेहनत घेण्याची त्यांची तयारी असते. तसेच तेवढी मेहनत सुद्धा या लोकांकडून घेतली जाते.

काळा आणि भुरा रंग असणार्‍या डोळ्यांची लोकं जिवनात प्रॅक्टीकल अप्रोच ठेवतात. कल्पोकल्पीत गोष्टींवर ते विश्वास ठेवत नाहीत. तसेच कल्पनांचे मनोरे सुद्धा ते बांधत नाही. जे काही आहे ते प्रत्यक्षात असले पाहिजे, यावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे ते कुठल्याही गोष्टीत प्रॅक्टीकल विचार करतात. तसेच अशा लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व गुण असतात. नेतृत्व करण्याची त्यांना फार हौस असते. त्यामुळे कुठलाही कार्यक्रम असो अशा लोकांचा पुढाकार तुम्हाला त्याठिकाणी दिसणारच.

मध्यम भुरे डोळे

जन्मजात मध्यम भुरे रंग असणार्‍या डोळ्यांचे व्यक्ती अतिशय प्रेमळ असतात. कुठल्याही गोष्टींना फार सहज आणि सोप्या पद्धतीने हाताळण्यात यांची हतोटी असते. कामासोबत गंमती-जंमती करणे अशा लोकांना फार आवडते. तसेच मित्र बनवण्याचा सुद्धा यांना छंद असतो. त्यामुळे अशा लोकांचे पुष्कळ मित्र असतात. दुसर्‍यांना स्वच्छ मनाने मदत करण्याचा यांचा स्वभाव अनेकांची मने जिंकुन घेतो. मध्यम भुरा रंगाचे डोळे असणारे व्यक्ती काळजीवाहू सुद्धा असतात. त्यांना आपल्या मित्रांची, परिवारातील ईतर सदस्यांची सतत काळजी लागलेली असते. वेळोवेळी दुसर्‍यांसाठी हे हजर असतात. दुसर्‍यांना मदत करता-करता त्यांचे स्वत:च्या काही गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष होते.

तांबूस पिंगट रंगाचे डोळे असणारे व्यक्ती

तांबूस पिंगट रंग असणार्‍या डोळ्यांच्या व्यक्तींना आव्हाने खुप आवडतात. ते प्रत्येक गोष्टीस आव्हानासारखे घेतात. अशा लोकांना जिवनाचा पूर्ण आनंद घ्यायचा असतो. त्यामुळे ते कायम मजा-मस्तीच्या मुडमध्ये असतात. जिवनाच‍ पुरेपुर आनंद अशा व्यक्ती घेतात. अशांना फिरण्याचा सुद्धा छंद असतो. याशिवाय प्रचंड सकारात्मकता अशा लोकांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अशा लोकांमधला एक गुण मात्र कायम त्यांच्या पदरी निराशा घेऊन येतो. यांना राग फार लवकर येतो आणि रागाच्या भरात ते काहीतरी ऊलट-सुलट करुन बसतात. त्यामुळे यांची नाते लवकर तुटतात.

ग्रे रंग असणाऱ्यांच्या स्वभाव

ग्रे रंगाचे डोळे असणारी व्यक्ती गंभीर स्वभावाची असते. ते कायम गंभीर अवस्थेत असतात. प्रत्येक गोष्टीस ते फार गंभीरतेने घेतात. बाहेरुन अशा व्यक्ती फार कठोर असतात, मात्र तेवढ्याच त्या आतून कोमल असतात. अशा व्यक्ती पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला कधीच एकत्र येऊ देत नाही. यांना यांचे ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आनंदाच्या क्षणांमध्ये विघ्न आणण्यात सुद्धा यांचा वाटा असतो.

हिरवा रंग

तुम्ही म्हणाल हिरव्या रंगाचे डोळे कुठे असतात का? तर हो हिरव्या रंगाचे डोळे नक्कीच नसतात. पण अनेकांच्या डोळ्यात थोडाफार हिरवा रंग बघायला मिळतो. अशा लोकांना नविन गोष्टी शोधण्यात खुप मजा वाटत असते. अशी लोकं मजबुत होण्यासोबतच काळजीवाहू सुद्धा असतात. यांना कायम तरुण राहायला आवडते. टापटीप राहणे यांचा जिवनाचा एक भागच असतो. अशी लोकं जळक्या वृत्तीची असतात. त्यांना ईतरांचे यश किंवा चांगले होतांना जास्त बघवले जात नाही. अर्थातच यांस अपवाद असतात.

नीळा रंग

डोळ्यांचा निळा रंग असणार्‍या व्यक्ती प्रचंड ऊर्जावान असतात. तसेच बुद्धीमान सुद्धा असतात. अशा डोळ्याची लोकं आपल्या भावना सगळ्यांसमोर मांडत नाही. तर कायम भावना लपवण्याचा प्रयत्न करतात. यांचा स्वभाव शांत असतो. त्यांची बुद्धी प्रचंड तल्लख असते. त्यामुळे ते जिवनात चांगल्या पदापर्यंत पोहचतात. निळ्या रंगाचे डोळे असणारे लोक दिसायला खुप सुंदर असतात. त्यामुळे ईतरांना आकर्षित करण्याचा गुण त्यांच्यामध्ये असतो.

हे देखील वाचा Boy impress girl: या मुलांकडे मुली होतात सर्वात जास्त आकर्षित; वैवाहिक जोडीदार निवडण्यासही असतात तयार..

Book reading benefits: पुस्तकांचे वाचन केल्यास थेट मेंदूवर होतो हा परिणाम; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Chanakya Niti: या तीन गोष्टी तरुणांच आयुष्य करतात उध्वस्त; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी, आणि राहा दोन हात लांबच..

Railway requirement 2022: या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये निघाली मेगा भरती; परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

big billion days: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करा निम्म्या  किंमतीत; जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर आहे ही ऑफर..

Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

Saffron Milk Side effect: मूल गोरं व्हावं म्हणून गरोदरपणात केशर युक्त दूध पिताय? जाणून घ्या याचे बाळाच्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात..

Ration Card: रेशन दुकानदार पावती, नियमानुसार धान्य देत नाही? फक्त या नंबरवर कॉल करा लगेच उठेल दुकानदाराचा बाजार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.