Boy impress girl: या मुलांकडे मुली होतात सर्वात जास्त आकर्षित; वैवाहिक जोडीदार निवडण्यासही असतात तयार..

0

Boy impress girl:  शाळेत शिकत असतांना किंवा कॉलेजमध्ये असतांना आपल्याला मित्रांप्रमाणेच पुष्कळ मैत्रिणी सुद्धा असतात. अनेकांना तर मित्रांपेक्षा मैत्रीणींमध्ये जास्त राहायला आवडते. कॉलेजमध्ये असतांना मग मैत्रीणींच्या सहाय्याने जिच्यावर आपलं मन आलेलं असतं तिच्याशी जुळवण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्याकरिता मैत्रीणी सुद्धा पूर्ण ताकद पणाला लावतात आणि दोघांचं जुळवुन देतात. बर्‍यापैकी मुलं अशाप्रकारे प्रेमात यशस्वी होतात. मात्र प्रत्येकाच्याच बाबतीत असं होत असेल असं बिल्कुल नाही. अनेकांना तर साधी एक मैत्रीण सुद्धा नसते. आपल्याशीच मुली का बर बोलत नसतील? आपल्याला मैत्रीणी का नाही? असा विचार करुन निराश होणारे सुद्धा आहेत. मात्र आता अशांना निराश होण्याची गरज नाही. कारण काही गोष्टींची काळजी घेतल्यास आणि काही सवयी अंगिकारल्यास तुम्ही कुठल्याही मुलीला अगदी सहज ईम्प्रेस करु शकाल.

‍आपण बघतो की, बर्‍याचदा मुलं त्यांना आवडत असलेल्या मुलीकडे लक्ष ठेऊन असतात. त्या कुठे जातात, काय खातात यांवर मुलांच लक्ष असतं. मात्र तुम्हाला माहितीये का? मुली सुद्धा मुलांकडे लक्ष देत असतात. मुलांच्या काही गोष्टी नोटीस करत असतात. मुली काही गोष्टींवरुन मुलांना जज सुद्धा करतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या काही सवयी बदलल्या आणि रोजच्या जिवनात थोड्याफार प्रमाणात काही बदल घडवले तर मुलींना तुमच्याकडे आकर्षित करणे फार काही कठिण नाही. आम्ही आज मुलांच्या त्याच गोष्टींबद्दल याठिकाणी सांगणार आहोत. ज्या मुलींना फार आवडतात आणि त्यामुळेच त्या मुलांकडे आकर्षित होतात.

आदर

मुल हे मुलींचा पाहिजे तेवढा आदर करत नाहीत. त्यामुळे बहुतांश मुलींना मुले आवडत नाही. याऊलट मुलींना योग्य आदर देणारे मुलं आवडतात. योग्य मान-सन्मान देणार्‍या मुलांसोबत वेळ घालवायला सुद्धा मुलींना आवडते. आदर देणार्‍या मुलांशी मुली स्वत:हून पुढाकार घेऊन मैत्री करतात. सर्व गोष्टी शेअर करतात. मुलींसोबतच ईतरांचा, मोठ्यांचा आदर करणारे मुले सुद्धा मुलींना आवडतात.

मोकळ्या मनाचे

आपल्या मित्रपरिवारात अनेक मित्र हे खुज्या बुद्धीचे असतात. विनाकारण काही गोष्टी लपवण्याचा किंवा आपल्याला न सांगण्याचा छंदच त्यांना असतो. मुलींना अशा मुलांचा फार राग येतो. याऊलट मोकळ्या मनाची मुलं, मुलींचं मन जिंकुन घेतात. जे काही ते सरळ-सरळ सांगून मोकळे होणे, स्पष्ट आणि तोंडावर बोलणार्‍या मुलांचा अंदाज मुलींना त्यांच्याकडे आकर्षित करतो. आपल्या मनातल्या भावना असोत, नातेसंबांधतले काही विषय असोत किंवा एखादी समस्या असो, सगळं काही मोकळ्या मनाने, मनात काहीही शंका कुशंका न ठेवता व्यक्त होणारे मुलं मुलींना प्रचंड आवडत असतात.

पुढाकार घेणारे

कही मुलांना कुठल्याही गोष्टीत पुढाकर घेण्याची सवय असते. कॉलेजमधला सांस्कृतिक कार्यक्रम असो, कॉलेजची ट्रीप असो, कुणाचा वादविवाद असो किंवा कुणाला मदत असो, स्वत:हून पुढाकार घेऊन ती गोष्ट करण्याची सवय त्यांना असते. मुलींना असे मुलं फार आवडतात. जे कुणिही न सांगता स्वत:हुन पुढाकार घेतात आणि कुठलिही गोष्ट करण्यासाठी तयार असतात. अशावेळी सगळी जवाबदारी ते स्वत:च्या खांद्यावर घेऊन नेतृत्व करण्यास तत्पर असतात. असे नेतृत्व करणारे मुलं मुलींवर आपली विशेष छाप सोडतात. परिणामी मुली त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि त्या सुद्धा स्वत:हून अशा मुलांशी मैत्री करण्यासाठी पुढाकार घेतात.

रोमॅंटीक तरुण

मुलींना रोमॅंटीक मोडमधील मुलं विशेष आवडतात. अनेक मुलं असे असतात, जे कायम फिल्मी अंदाजात वावरतात. अतिशय गोड आणि रोमॅंटीक बोलत असतात. मुलींना असे गोड आणि रोमॅंटीक बोलणारे मुलं फार आवडतात. याशिवाय मुलींना वेळ देऊन त्यांना छान फिरायला नेणारे, एखाद्या रोमॅंटीक जागी घेऊन जाऊन प्रेमाने बोलणारे, हसत-खेळत गंमत घेणारे, मजा ऊडविणार्‍या मुलांकडे मुली लवकर आकर्षित होतात.

चुकांचा स्विकार करणारे

बर्‍याचदा आपल्या हातून चुक घडते. पण आपण ती चुक मान्य करण्यास तयार नसतो. रिलेशनशीपमध्ये असतांना सुद्धा असे होते. कदाचित ती चुक आपणच केली असे सांगितल्याने आपली जोडीदार आपल्याला सोडून जाईल अशी भिती आपल्याला असते. त्यामुळे आपण चुक कबुल करत नाही. मात्र याऊलट चुक स्विकारणारे मुलं, मुलींना आवडता. जी काही चुक झाली असेल ती व्यवस्थितपणे सांगुन, माफी मागितल्यास मुलगी तुम्हाला सोडून जाणार नाही तर याऊलट तुम्ही पूर्वीपेक्षाही जास्त तिच्या मनात घर कराल. चुका स्विकारणारे आणि त्या चुकीची माफी मागणारे मुल, मुलींना आवडत असतात.

कौतूक करणारे

मुलगी असो अथवा एखादी महिला असो कौतूकाच्या भुकेल्या असतात. त्यामुळे कायम मुलीचे कौतूक करत राहा. तिच्या दिसण्यावरुन, तिच्या ड्रेसवरुन तिचे तोंडभरुन कौतूक करा. कौतूक करतांना थोडे रोमॅंटीक व्हा, तिच्या केसांचे, डोळ्यांचे कौतूक करा. त्यानंतर तिच्या सवयी, तिचा स्वभाव, तिची वर्तणुक या सगळ्या गोष्टींचे कायम तोंडभरुन कौतूक करत राहा. बघा ती मुलगी तुमची फॅन झाल्याशिवाय राहणार नाही. मुलींना मुलांकडून कौतूकाची फार अपेक्षा असते. त्यामुळे कौतूकाची एकही संधी सोडू नका.

हे देखील वाचा Book reading benefits: पुस्तकांचे वाचन केल्यास थेट मेंदूवर होतो हा परिणाम; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Chanakya Niti: या तीन गोष्टी तरुणांच आयुष्य करतात उध्वस्त; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी, आणि राहा दोन हात लांबच..

Railway requirement 2022: या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये निघाली मेगा भरती; परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

big billion days: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करा निम्म्या  किंमतीत; जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर आहे ही ऑफर..

Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..

Who has Seen My Facebook Profile या सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमची Facebook profile कोण-कोण पाहतंय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.