Chanakya Niti: या तीन गोष्टी तरुणांच आयुष्य करतात उध्वस्त; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी, आणि राहा दोन हात लांबच..

0

Chanakya Niti: तारुण्य (youth) हा मानवी जीवन प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे. तरुण म्हणजे शक्तीशाली (Young means strong)तरुण म्हणजे बुद्धीमान (Young means intelligent) तरुण म्हणजे प्रचंड ऊर्जाशक्ती (Youth means great energy) अशा कितीतरी शब्दांमध्ये तारुण्याच्या व्याख्या केल्या जाऊ शकतात. भारतातील महान व्यक्तीमत्वांनी सुद्धा तारुण्याचे तोंडभरून कौतूक केले आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, ऊद्याचा सामर्थ्यवान भारत हा तरुणांच्या खांद्यावर ऊभा असणार आहे. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात, या देशाला जगात एक नंबर बनवण्यात या देशातील तरुणांचे फार मोठे योगदान असणार आहे. परंतू याच तरुण वयात काहींनी सावधानता बाळगण्याचे सुद्धा सांगितले आहे. आचार्य चाणाक्य म्हणतात, तारुण्यातले काही मार्ग चुकले तर संपूर्ण आयुष्यभर त्याचा पश्चाताप करावा लागतो. (These three things ruin the lives of young people..)

आचार्य चाणाक्य ज्यांना विष्णुगुप्त किंवा कौटिल्य या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यांनी तारुण्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी नमूद करुन ठेवलेल्या आहेत. जेणेकरुन प्रत्येक तरुणांस त्याचा ऊपयोग व्हावा. तरुण वय हे ज्याप्रमाणे क्रांती घडवता येईल एवढं प्रतिभावान आणि शक्तीशाली असतं, त्याचप्रामणे तरुण वय हे वादळी सुद्धा असतं. जे तुमचं संपूर्ण आयुष्य बर्बाद करु शकतं. त्यामुळे तरुण वयात काही विशेष गोष्टींवर लक्ष देण्याची गरज असते. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगण्याची वेळ आपल्यावर आल्या शिवाय राहत नाही.

माणसाला आपण कायम तरुणच असायला हवे असे वाटत असते. कारण या वयामध्ये अनेक बदल आपल्या शरीरात होत असतात. हार्मोनल्स बदलांचा प्रभाव थेट आपल्या स्वभावावर सुद्धा होतो. आपल्याला ते जाणवत नाही, मात्र शरीराबरोबरच आपल्यात काही मानसिक बदल सुद्धा यादरम्यान घडत असतात. शरीरामध्ये प्रचंड ऊर्जा असते. बुद्धीचा संचय हळूहळू वाढत असतो. अनुभवांची शाळा आपल्याला रोज काही ना काही नवे शिकवत असते. परंतू आचार्य चाणाक्य यांच्या चाणाक्य नितीनुसार, त्या ऊर्जेचा, बुद्धीचा आणि अनुभवाचा ऊपयोग हा योग्य ठिकाणी न झाल्यास तीच ऊर्जा तुमच्यासाठी पश्चातापाचे आणि उध्वस्ताचे सुद्धा कारण ठरू शकते.

आचार्य चाण‍क्य हे भारतातील महानतम व्यक्तीमत्वांपैकी एक होते. योग्य राज्यकारभार कसा चालवायला? राज्यकाराभाराचे कायदे काय असायला हवेत? याबरोबरच योग्य व्यक्तीमत्व कसे घडवायचे? कुठल्या गोष्टींपासून माणसाने सावधान राहिले पाहिजे? या सगळ्यांबाबत आचार्य चाणाक्य यांनी विस्तृतपणे लिहून ठेवलेले आहे. त्यापैकीच त्यांनी अशा ३ गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या गोष्टींपासून तरुणांनी कायम दुर राहणेच फायदेशीर ठरु शकते. तर या ३ गोष्टी नेमक्या आहेत काय? हेच आपण याठिकाणी जाणुन घेणार आहोत.

राग (anger)

हार्मोनल्स बदलांमुळे शरीरासह काही मानसिक बदल सुद्धा होत असतात. एखाद्या लहाण मुलाचे जसे-जसे वय वाढत जाते तसा तसा त्याच्यातला रागीट स्वभाव वाढत जातो. बर्‍याचदा अशी तरुण मुलं आपल्याला बघायला मिळतात, जी खुप रागीट असतात. त्यांना जरा कुणी काही म्हटले की त्यांना लगेच राग येतो. रागाचा पारा ऐवढा चढतो की रागाच्या भरात ते काय करुन बसतात? त्यांचे त्यांना सुद्धा कळत नाही. परंतू आचार्य चाणाक्य म्हणतात, राग हा माणसाच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा ठरतो. क्रोध तुमची बुद्धी कमकुवत करतो. रागाच्या भरात घेतलेला तुमचा एखादा छोटासा निर्णय तुमचे संपूर्ण भविष्य खराब करु शकतो. त्यामुळे चाणाक्य म्हणतात. रागावर नियंत्रण मिळवणे शिका, ते तुमच्यासाठी फात फायदेशीर ठरु शकते.

आळस (laziness)

आळस हा माणसाचा शत्रु असतो. आचार्य चाणाक्य म्हणतात, तरुण वयात आळस जर तुमच्या अंगी असेल तर तुम्ही भविष्यात काहीही साध्य करु शकत नाही. तारुण्यात केलेले कष्ट म्हतारपणी ऊपयोगी येतात असे जुनेजानते लोक सांगत असतात. मात्र आळशी व्यक्तीला कष्टाचे मोल कधीच कळु शकत नाही. आळशी व्यक्ती ही हळूहळू मंद होत जाते. चाणाक्य म्हणतात आळसापेक्षा शिस्त अंगी भिनवली पाहिजे. वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. आळस तुम्हाला जिवनात काहीही देऊ शकत नाही. याऊलट सक्रीय व्यक्तीस यश कधी न कधी मिळतेच. त्यामुळे तरुणांनी आळसापासून स्वत:ला लांब ठेवले पाहिजे.

संगत (compatibility)

संगत मानवी जिवनाला प्रभावित करते. त्यामुळे आचार्य चाणाक्य यांनी सांगतीचे महत्व पटवुन दिले आहे. संगत चुकीची असल्यास वाईट कृत्ये करण्याचे विचार तुमच्या डोक्यात निर्माण होतात. हळूहळू डोक्यातले विचार तुम्ही प्रत्यक्षात आणता, ज्यामुळे तुमचेच नुकसान होते. त्यामुळे आचार्य चाणाक्य म्हणतात तरुणांनी योग्य संगत धरावी. नशा, सेक्स आणि भांडणे तारुण्यात यांच्यापासून जेवढे अंतर ठेवाल, तेवढे यशापासूनचे तुमचे अंतर कमी होत जाईल. चांगली संगत सकारात्मक विचारांना प्रोत्साहित करते, प्रेरीत करते. त्यामुळे आचार्य चाणाक्य म्हणतात तरुणांनी कायम चांगली संगत धरली पाहिजे. जेणेकरुन त्यांचे भविष्य ऊज्वल होते.

हे देखील वाचा Railway requirement 2022: या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये निघाली मेगा भरती; परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

big billion days: फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी करा निम्म्या  किंमतीत; जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनवर आहे ही ऑफर..

Bollywood News: दोन लग्नं, स्वत:च्याच मुलीसोबतच असे संबंध! दिग्दर्शक महेश भट्ट यांचा थक्क करणारा प्रवास वाचून जाल चक्रावून..

late night Sleep Side effect: तुम्हाला रात्री ऊशिरापर्यंत जागायची सवय आहे का? असेल तर आत्ताच बंद करा अन्यथा..

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.