Sexual ability: या चार पदार्थांचा आहारात करा समावेश; शुक्राणूंची संख्या वाढून लैंगिक क्षमता होईल द्विगुणित..

0

Sexual ability: आजच्या धावपळीच्या युगात माणसाचे आरोग्याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तरुण वयातच आजारांचे प्रमाण सुद्धा वाढते आहे. आहारातील असमतोल, जंक फुडचे सेवन, कामाचा ताण, वाढती व्यसनाधीनता यामुळे तरुणांमध्ये शारीरीक कमजोरीचे प्रमाण वाढत आहे. याचा थेट परिणाम लैंगिक आयुष्यावर होतो. काही तज्ज्ञांच्या मते पुरुषांमधील शुक्राणुंची संख्या कमी होण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शुक्राणुंची संख्या कमी झाल्याने वैवाहिक जिवनाच्या आनंदापासून तर मुकावेच लागते. मात्र याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर सुद्धा होतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण पाहतो, लग्न होऊन बराच काळ उलटून सुद्धा मुल न होण्याचे प्रमाण जोडप्यांमध्ये पाहायला मिळते.

एक दीड दशकापूर्वी लग्न झाल्यानंतर वर्षाच्या आत नवदापत्याकडून शुभ वार्ता ऐकायला मिळायची. मात्र अलीकडच्या काळात हे प्रमाण कमी झाल्याचे पहायला मिळते. लग्न होऊन चार ते पाच वर्षांचा काळ उलटला तरी मूल होत नसल्याचे पाहायला मिळते. अशावेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा लागतो. या विषयाच्या तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर, आपला लक्षात येते, शुक्राणूंच्या कमतरतेमुळे आपल्याला या समस्येला सामोरे जावे लागत आहे. आता आपण याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तर, याची कारणे देखील खूप सामान्य असल्याचे पाहायला मिळते. बदलेली जिवनशैली आहे, कामाचा ताण, वेळेवर निरोगी आहार न मिळणे,अशी काही सामान्य लक्षणे आपल्याला माहीत पडतात. या साध्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे याचे परिणाम आपण लैंगिक आयुष्यात भोगतो.

कामाचा तान बदललेली जीवनशैली वेळेवर निरोगी आहार न घेतल्याने आपण या गंभीर समस्येला समोर जातो. बहुतांश पुरुषांची लैंगिक क्षमता याच कारणांमुळं खालावलेली आहे. सहाजिकच शुक्राणुंची संख्या कमी झाल्याने मुल न होण्यासारख्या समस्या ऊद्भवतात. समस्येपासून जर मुक्ती हवी असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरासाठी पोषक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला निरोगी आहार मिळाला शेरास आवश्यक असणारे घटक मिळाले तर तुम्ही या समस्या पासून दोन हात लांब राहता शिवाय तुमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद देखील तुम्ही अधिक प्रमाणात घेता. आज आपण अशाच काही पदार्थांविषयी बोलणार आहोत, ज्याचा तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्यानंतर, तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद द्विगुणित होऊ शकतो. आणि शुक्राणू सारख्या समस्येपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तर चला जाणुन घेऊयात शुक्राणुंची संख्या वाढवण्यासाठी काय करावे?

लसूण

शुक्राणुंची संख्या वाढवण्यात लसूण सर्वात प्रभावी मानला जातो. त्यामुळे शुक्राणुंच्या समस्यांनी त्रस्त असणार्‍यांनी रोज जेवणात लसणाचा समावेश ठेवावा. लसणातील काही घटक लैंगिक क्षमता वाढवण्यास सुद्धा सहाय्य करते. शारीरीक संबंधाची ईच्छा वाढवण्यासाठी तर लसणाला औषध म्हणून संबोधले जाते. लसणातील ऍलीसीन नावाचे कंपाउंड शुक्राणुंची संख्या वाढवते. तसेच लसणामधील सेलेनियम हा घटक शुक्राणुंची चपळता वाढवण्यात मदत करते. शक्य झाल्यास लसण कच्चे खाल्ल्यास अधिक प्रभावी ठरते.

अश्वगंधा

पुरुषांमधील शुक्राणुंची संख्या वाढवण्यासाठी अश्वगंधा सुद्धा ऊपयुक्त आहे. रोज अर्धा चमचा अश्वगंधा दुधात मिसळून, रोज दोनवेळा घेतल्यास शुक्राणुंची संख्या वाढते. लैंगिक संबंधीत काही डॉक्टर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा अश्वगंधा घेण्याचा सल्ला देतात. तसेच अश्वगंधामुळे शारीरीक कमजोरी सुद्धा कमी होते. त्यामुळे शरीराशी संबंधीत ईतर व्याधींवर सुद्धा अश्वगंधा प्रभावी आहे.

डाळिंब आणि केळी

रोजच्या आहारामध्ये काही फळांचा सुद्धा समावेश असला पाहिजे. फळांमध्ये शरीरास आवश्यक असणारे अनेक पोषक घटक असतात. तसेच प्रथिनांची मात्रा सुद्धा मुबलक प्रमाणात असते. पुरुषांच्या शुक्राणुंची संख्या वाढवण्यासाठी देखील काही फळे प्रचंड ऊपयुक्त आहेत. शुक्राणूसंबंधीत समस्या सोडवण्यासाठी डाळिंब आणि केळी यांचे सेवन केले पाहिजे. डाळिंबामुळे प्रजननक्षमता सुधारते. तसेच वीर्याची गुणवत्ता वाढीस लागते. केळातील ब्रोमोलिन नावाचे एन्झाईम पुरुषांसाठी फार ऊपयुक्त आहे. यामुळे लैंगिक क्षमता सुद्धा वाढते तसेच शुक्राणुंची संख्या वाढण्यास सुद्धा सहाय्यक ठरते.

मासे आणि अंडी

मांसाहारी पदार्थ सुद्धा शरीरासाठी प्रचंड उपयोगी असतात. मांसाहारी पदार्थांमधून सुद्धा शरीराला पोषक तत्वे मिळतात. शरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठी डॉक्टर मांसाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. काही मांसाहारी पदार्थ लैंगिक क्षमतेवर सुद्धा सकारात्मक परिणाम करतात. यामध्ये मासे आणि अंडी प्रभावी आहे. मासे आणि अंड्यामधील काही घटक शुक्राणुंच्या वाढीस मदत करतात.

नियमित व्यायाम

शरीराला पोषक आहार फार गरजेचा असतो. मात्र आहाराप्रमाणेच शरीराला व्यायामाची सुद्धा आवश्यकता असते. आजच्या धावपळीच्या जीवनात व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे कठीण आहे. मात्र निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी व्यायाम फार आवश्यक आहे. आहाराप्रमाणाचे रोजच्या रुटीनमध्ये व्यवस्थित व्यायाम केल्यास देखील शुक्राणुंची संख्या वाढण्यास मदत होते. व्यायामामध्ये योगा फार प्रभावी आहे. तसेच घरी सुद्धा हल्का-फुल्का व्यायाम तुम्हाल फायदेशीर ठरु शकतो. याशिवाय रोज फिरायला जाणे सुद्धा फायद्याचे आहे.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Women’s views on sex: लैंगिक संबंधाचा आनंद घेताना महिलांचं देखील असतं हे मत; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

PM PRANAM Yojana:पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार हे जबरदस्त फायदे; जाणून घ्या या योजने विषयी सविस्तर..

Heart Attack Symptoms: यामुळे हृदयविकाराचा झटका नेहमी सकाळीच येतो; ही लक्षणे जाणवल्यास वेळीच व्हा सावध आणि वाचवा जीव..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.