PM PRANAM Yojana:पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार हे जबरदस्त फायदे; जाणून घ्या या योजने विषयी सविस्तर..

0

PM PRANAM Yojana: कृषिप्रधान (agrarian) देश अशी भारत (india) देशाची ओळख आहे. आजही भारतातील ७०% पेक्षा अधिक लोकं शेतीवर अवलंबून आहे. परंतू शेतकर्‍यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होते आहे. नैसर्गीक संकटांमुळे शेती करणे कठीण झाले आहे. मात्र देशातील अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा असणारा वाटा लक्षात घेता सरकारकडून शेतकर्‍यांसाठी नवनविन योजना आणल्या जातात. जेणेकरुन शेतकरी या योजनांचा लाभ घेऊन भरघोस ऊत्पन्न घेऊ शकला पाहिजे. शेती ऊत्पादनांत वाढ झाल्यास अप्रत्यक्षरित्या त्याचा चांगला परिणाम अर्थव्यवस्थेवर बघायला मिळतो. त्यामुळे कृषी क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. असाच एक प्रयत्न म्हणून सरकर एक नविन योजना लॉन्च करत आहे. (Pm Pranam Yojana)

पीएम प्रणाम (Pm Pranam Yojana) असे या योजनेचे नाव आहे. शेतातील ऊत्पादन वाढवण्यासाठी विविध रासायनिक खतांचा वापर केला जातो. तसेच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता विविध औषधांची फवारणी केली जाते. यामध्ये रसायनांचे प्रमाण सर्वाधिक असते. ऊत्पादन वाढवण्याच्या नादात जमिनीवर अक्षरश: रासायनिक पदार्थांचा भडीमार केला जातोय. त्यामुळे ऊत्पादनात तात्पुरती वाढ जाणवत असली, तरी रसायनांच्या जास्त वापरामुळे जमिनीतला कस नाहीसा होतो. कालंतराने उपजाऊ असणारी जमीन ओस पडू लागते. त्यामुळे रासायनिक खतांचा मारा कमी होऊन, शेतकर्‍यांनी जैविक शेतीकडे वळावे. या हेतूने पीएम प्रणाम योजना लॉन्च करण्यात येते आहे.

ईंडियन एक्सप्रेस या ईंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार या योजनेवर काम करते आहे. यासाठी सल्लागार समित्या सुद्धा नेमण्यात आलेल्या आहेत. तसेच काही राज्यांकडून यावर प्रस्ताव मागवण्यात आलेले आहे. केंद्र सरकार योजनेची रुपरेषा आखून लवकरच ही योजना लॉन्च करण्याचा विचार करत आहे. केमीकल फर्टिलायझरवर सरकारकडून होणारा खर्च या योजनेमूळे टाळता येणार आहे. सरकारकडून मोठ्याप्रमाणात केमीकल्स फर्टीलायझरवर (chemical fertilizer) खर्च केला जातो. मोठ्याप्रमाणात सब्सीड्या दिल्या जातात. त्यामुळे या पीएम प्रणाम योजनेच्या सहाय्याने केंद्र सरकारवरील हे सब्सीडींचे ओझे कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कसा मिळेल योजनेसाठी फंड

ज्याप्रमाणे सरकारकडून कुठल्याही योजनेसाठी फंड दिला जातो, त्याप्रमाणे या योजनेसाठी कुठल्याही प्रकारचा फंड दिला जाणार नाही. दरवर्षी केमीकल फर्टीलायझर्सवर केंद्र सरकार प्रचंड पैसा खर्च करते. सब्सीडीच्या माध्यमाने दिला जाणारा हा पैसाच या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. या योजनेसाठी तंत्रज्ञान, ऊपकरणांवर खर्च केला जाणार आहे. या योजनेमुळे सरकारचा केमीकल फर्टीलायझरवर खर्च होणारा पैसा सुद्धा वाचेल. आणि शेतीला जैवविविधतेकडे वळवण्यासाठीच्या प्रयत्नांना सुद्धा बळ येईल.

शेतकर्‍यांना होणार फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैविक शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. यासाठी अनेक उपाय योजना देखील करण्यात येत आहेत. अनेक भाषणांमध्ये, जाहीर व्याख्यानामध्ये त्यांनी याचा ऊल्लेख केलेला आहे. भारतातील शेतकरी हा जास्तीत जास्त प्रमाणात जैवक शेतीकडे वळावा. हा या योजनेमागील ऊदात्त हेतु आहे. केमीमल फर्टीलायझरसाठी देण्यात येणार्‍या सब्सीडीतून वाचणारे पैसे या योजनेवर खर्च केले जाणार आहेत.

त्यापैकीच ३०% पैश्यांचा ऊपयोग शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी केला जाणार आहे. शेती ऊत्पादक संघटना, स्वयं सहायता समुह, पंचायत यांना याअंतर्गत पैसे दिले जाणार आहेत. या पैश्यांचा ऊपयोग शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यासाठी केला जाईल. रासायनिक खतांचे दुष्परिणाम आणि जैविकतेचे फायदे याबाबत शेतकर्‍यांना सांगण्यात येईल. तसेच जैविक खतांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहिक करण्यात येईल. त्यामुळे शेतकरी सुद्धा जैविक शेतीकडे वळतील. तज्ज्ञांच्या मते जैविक शेतीचे दीर्घ फायदे शेतकर्‍यांना होऊ शकतात.

सरकारला होणार फायदा

पीएम प्रणाम योजनेचे दुहेरी फायदे आहेत. आतापर्यंत शेतकर्‍यांसाठीच्या योजना फायदेशीर असल्या, तरी सरकारी तिजोरीवर त्याचा भार जाणवत होता. मात्र पीएम प्रणाम योजनेचे तसे नाही. शेतकर्‍यांसोबतच सरकारला सुद्धा या योजनेचा फायदा होणार आहे. दरवर्षी रासायनिक खतांच्या मागनीत प्रचंड वाढ होते आहे. परिणामी सरकारचा सब्सीडींवरचा खर्च सुद्धा वाढतो आहे. पीएम प्रणाम योजनेमुळे त्यावर मर्यादा येईल. व जमिनींवर रासायनांचा भडिमार होण्यापासून सुद्धा रोखता येईल. सरकारने सर्व राज्य सरकारांना या योजनेबद्दल सुचित केले आहे. या योजनेच्या सर्वांगीन बाबी तपासून तज्ज्ञांशी सल्ला मसलत करुन काही दिवसांतच सरकारकडून ही योजना लागू करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा Heart Attack Symptoms: यामुळे हृदयविकाराचा झटका नेहमी सकाळीच येतो; ही लक्षणे जाणवल्यास वेळीच व्हा सावध आणि वाचवा जीव..

Hangover: हा पदार्थ खाल्ल्यास दारूची नशा उतरते एका मिनिटांत; जाणून घ्या सविस्तर..

Heart Attack Symptoms: यामुळे हृदयविकाराचा झटका नेहमी सकाळीच येतो; ही लक्षणे जाणवल्यास वेळीच व्हा सावध आणि वाचवा जीव..

RBI BRBNMPL Recruitment 2022: या उमेदवारांना रिझर्व बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशी केली जाणार निवड..

eyes colour describe nature: डोळ्यांच्या रंग सांगतो माणसाचा स्वभाव; या रंगाचे डोळे असतात प्रचंड धोकादायक..

Boy impress girl: या मुलांकडे मुली होतात सर्वात जास्त आकर्षित; वैवाहिक जोडीदार निवडण्यासही असतात तयार..

Book reading benefits: पुस्तकांचे वाचन केल्यास थेट मेंदूवर होतो हा परिणाम; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Railway requirement 2022: या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये निघाली मेगा भरती; परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Saffron Milk Side effect: मूल गोरं व्हावं म्हणून गरोदरपणात केशर युक्त दूध पिताय? जाणून घ्या याचे बाळाच्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतात..

Ration Card: रेशन दुकानदार पावती, नियमानुसार धान्य देत नाही? फक्त या नंबरवर कॉल करा लगेच उठेल दुकानदाराचा बाजार..

Urine Colour Chart: लघवीच्या रंगावरुन समजते आजाराचे स्वरूप; जाणून घ्या लघवीच्या विविध रंगांविषयी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.