Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

0

Aadhar card update: आधार कार्ड (Aadhar card) प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचे ओळखपत्र आहे. आपली संपूर्ण माहिती आधार कार्डशी जोडण्यात आलेली आहे. आधार कार्डमुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. आधार आज भारतातल्या प्रत्येक नागरिकाची ओळख झाले आहे. आधार कार्ड फक्त ओळखपत्र नसून प्रत्येकाच्या जीवनाचा विभाज्य घटक झाला आहे आधार कार्ड शिवाय आता अजूनही अशक्य होऊन बसले असल्यास आपल्याला मान्य करावे लागेल. अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे.

अनेक ठिकाणी आधार कार्डचा ऊपयोग ओळखपत्र म्हणून केला जातो. विविध शासकीय योजनांचा लाभ असो की विद्यार्थ्यांना शिष्युवृत्तीचा लाभ मिळवायचा असो आधार कार्ड आवश्यक झाले आहे. आधार कार्डशिवाय योजनांचा लाभ घेणे अशक्य आहे. यासोबतच आधार कार्ड बॅंक अकाउंटशी लिंक असणे सुद्धा जरुरी आहे. अन्यथा कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यास तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आधार कार्ड वरील सर्व माहिती योग्य आणि निर्दोष असणे जरुरी आहे. आधार कार्डवरील माहितीस काही चुक असल्यास भविष्यात तुमच्यासाठी ते अडचणीचे ठरु शकते. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अद्ययावत करण्यासाठी आधार कार्डमध्ये बदल केले जाऊ शकतात. याविषयीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आधारचे महत्व आज प्रचंड वाढलेले आहे. प्रत्येक ठिकाणी आधार मागितले जाते. त्यावरुन तुमची ओळख पटवली जाते. त्यामुळे आधार कार्डवरील तुमची सर्व माहिती खरी आणि योग्य असणे आवश्यक आहे. नावामध्ये स्पेलींगची चुक असल्यास सुद्धा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आधारवरील सर्व माहिती l नीट तपासून घ्या, काही चुक वाटल्यास आधार कार्ड अपडेट करण्याची सोय ऊपलब्ध आहे. जर तुम्हाला आधार कार्ड संबंधात कोणतीही चूक दुरुस्ती करायची असेल तर ते शक्य आहे.

प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड हे अनिवार्य करण्यात आल्यानंतर अनेकांनी आधार कार्ड बनवून घेतले. सहाजिकच तुम्ही आधार कार्ड खूप वर्षांपूर्वी बनवले असल्याने त्यावेळेसचा तुमचा फोटो तुम्हाला देखील ओळखता येत नसेल. ही समस्या अनेकांना जाणवत असेल. आधार कार्ड वरील फोटो लहाणपणीचा किंवा पुष्कळ जुना असल्यास या समस्या येऊ शकतात. त्यामुळे आधार वरील फोटो बदलणे जरुरी आहे किंवा तुम्ही बदलू इच्छित असाल तर अगदी सोप्या पद्धतीने कसा बदलायचा? याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर चला जाणुन घेऊया सविस्तर.

फोटो बदलण्याची प्रक्रिया

प्रत्येक शहरात सरकारच्या वतीने आधार नोदणी केंद्र उभारण्यात आले आहेत. आधार कार्ड संबंधीत कुठलीही समस्या असल्यास तुम्ही थेट या आधार केंद्रात जाऊन चौकशी करु शकता. नाव बदलणे असो, पत्ता बदलणे असो किंवा आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडणे असो, सगळं काही या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही करु शकता. मात्र फोटो बदलण्यासाठी सुरुवातीलाच आधार केंद्रावर जाण्याची गरज नाही. घरबसल्या काही सोप्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगत आहोत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही आधार कार्डवरील तुमचा फोटो अगदी सहजरित्या बदलु शकता.

जर घरी बसून मोबाईलवरच तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील फोटो बदलायचा असेल, तर काही सोप्या पद्धती आम्ही येथे सांगत आहोत. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमवर जा आणि आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://uidai.gov.in ही आधारची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन My Aadhar च्या पर्यायावर जा. त्यानंतर अनेक पर्याय तुम्हाला दिसू लागतील. यानंतर डाउनलोड विभागात जाऊन आधार नोंदनी किंवा अपडेट फॉर्मवर जा आणि तेथे सगळी माहिती भरा आणि जवळच्या आधार नोंदनी केंद्रात जमा करा. आधार नोंदनी कार्यालयात बायोमेट्रीक पडताळनीद्वारे तुमची सर्व माहिती तपासण्यात येईल. त्यानंतर तुमचा फोटो घेण्यात येईल आणि आधार कार्डमध्ये अपडेट केले जाईल.

आधार केंद्रात सर्व बायोमेट्रीकची पडताळणी झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत आधार कार्ड तुमच्या घरी येईल. पोस्टाने आधार कार्ड घरी पाठवले जाते. अपडेट केलेल्या आधार कार्डची तुम्ही ई-प्रिंट घेऊ शकता. त्यासाठी आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे अपडेटेड आधार कार्ड डाउनलोड करु शकता. आता लहाण मुलांचे आधार कार्ड असणे सुद्धा गरजेचे झाले आहे. त्यामुळे आपल्या लहाण मुलांचे आधार कार्ड बनवले नसल्यास किंवा त्यात काही बदल करायचे असल्यास, लगेच जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर संपर्क साधा.

हे देखील वाचा Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

PM PRANAM Yojana:पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार हे जबरदस्त फायदे; जाणून घ्या या योजने विषयी सविस्तर..

Heart Attack Symptoms: यामुळे हृदयविकाराचा झटका नेहमी सकाळीच येतो; ही लक्षणे जाणवल्यास वेळीच व्हा सावध आणि वाचवा जीव..

Hangover: हा पदार्थ खाल्ल्यास दारूची नशा उतरते एका मिनिटांत; जाणून घ्या सविस्तर..

RBI BRBNMPL Recruitment 2022: या उमेदवारांना रिझर्व बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशी केली जाणार निवड..

eyes colour describe nature: डोळ्यांच्या रंग सांगतो माणसाचा स्वभाव; या रंगाचे डोळे असतात प्रचंड धोकादायक..

Boy impress girl: या मुलांकडे मुली होतात सर्वात जास्त आकर्षित; वैवाहिक जोडीदार निवडण्यासही असतात तयार..

Book reading benefits: पुस्तकांचे वाचन केल्यास थेट मेंदूवर होतो हा परिणाम; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Chanakya Niti: या तीन गोष्टी तरुणांच आयुष्य करतात उध्वस्त; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी, आणि राहा दोन हात लांबच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.