Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

0

Marriage Tips: लग्न झाल्यानंतर पती आणि पत्नी दोघांनाही काही नविन गोष्टींना सामोरे जावं लागते. लग्नानंतर अचानक दोघांच्याही रोजच्या जिवनात एक मोठा बदल झालेला असतो. त्यामुळे दोघांनाही एकमेकांना सांभाळून पुढे जात राहावे लागते. मात्र लग्न झाल्याच्या काही दिवसांतच पुरुषांवर काही डोकेदुखी ठरणार्‍या गोष्टींचा सामना करण्याची वेळ येते. त्यापैकीच एक बायकोची चिडचिड असते. बायकोला आनंदी आणि खुश ठेवणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण बायकांना कशावरून राग येईल, हे काही सांगता येत नाही. किरकोळ कारणावरून देखील महिला दुर्गाचं रूप धारण करतात. किरकोळ कारणावरून बायको नेहमी चिडचिडेपणा करत असल्याच्या समस्या अलीकडच्या काळात अधिक होत असल्याचे समोर आले आहे. तुम्ही देखील बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

सर्व काही सुरळित सुरु असताना अचानक बायकोची चिडचिड वाढून जाते. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींवरुन वाद व्हायला लागतात. अशावेळी दोघांपैकी एकानेही समजुतदारपणा न दाखवल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी सहसा पुरुषांनी माघार घ्यावी, व समजुतदारपणा दाखवावा. कारण काही कारणास्तव लग्नानंतरच्या काही दिवसांतच महिलांमध्ये चिडचिड करण्याचे प्रमाण वाढते. परंतू असे नेमके कशामुळे होते आणि चिडचिड कमी करण्यावर पर्याय काय ठरु शकतात? याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ.

अनेकांवर या समस्येचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. लग्नानंतर काही दिवस जाताच अचानक बायकोची चिडचिड वाढते. त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जिवनावर सुद्धा याचा परिणाम होतो. रोजचा बाहेरच्या कामाचा ताण आणि घरी येताच, बायकोची चिडचिड त्यामुळे तुमची मानसिक स्थिती खराब होऊ शकते. शिवाय रोजच्या कटकटीमुळे तुम्हाला सुद्धा चिडचिड होऊ शकते. ज्यामुळे दोघांमध्ये टोकाचे वादविवाद होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अशावेळी पुरुषांनी समजुतदारपणा दाखवणे फायदेशीर ठरु शकते. कारण लग्नानंतर काही कारणास्तव महिलांची चिडचिड होणे साहजिक असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला येथे महिलांची चिडचिड होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत.

एकटेपणामुळे होते चिडचिड

आता एकत्र कुटुंबव्यवस्था हळूहळू नाहीशी होत आहे. कामामुळे बहुतांश मुले मोठ्या शहरात राहतात. त्यांची कुटुंबे गावाकडेच असतात. लग्नानंतर पत्नी मोठ्या शहरांमध्येच आपल्या पती सोबत राहू लागते. अशावेळी घरातला पुरुष म्हणजेच तुम्ही दिवसभर ऑफीस निमीत्त बाहेर असता. घरी तुमची पत्नी एकटीच असते. बर्‍याचदा एकटेपणा हे सुद्धा चिडचिड होण्याचे कारण ठरु शकते. दिवसभर एकटे असल्याचे अनावश्यक विचार डोक्यात येत राहतात. त्याचे रुपांतर चिडचिड करण्यात होते. त्यामुळे पुष्कळदा तुम्ही घरी येताच, पत्नीचा चेहरा उतरलेला असल्याचे तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. ऑफीसच्या कामासाठी बाहेर असाल, तरी फोनवर तिच्याशी बोला आणि कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा.

जबाबदार्‍यांचे ओझे

अनेकदा असं होतं की, पत्नीला जबाबदार्‍यांच्या ओझ्याखाली आपण दबलो आहोत, असं जाणवायला लागतं. धावपळ आणि स्पर्धेच्या युगात असं होतं. कारण आपण ईतरांशी विनाकारण तुलना करत असतो. बर्‍याचदा काही जबाबदार्‍या असतात, ज्यांना आपल्या खांद्यावर घ्यावचं लागतं. पुरुष मंडळी सहसा कामानिमीत्त बाहेर असतात, मित्रांचा गोतावळा त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे त्यांना याचा फारसा त्रास जाणवत नाही. परंतू महिलांच्या बाबतीत असे नसते. जबाबदार्‍यांचे ओझे वाढले की, त्यांचे मन कामात लागत नाही, आणि त्यामुळे चिडचिडपणा वाढू लागतो. अशावेळी पत्नीस वेळ देऊन दोघे मिळून सर्व जबाबदार्‍या पार पाडण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही देखील अनेक संकटांमध्ये पत्नीबरोबर आहात याची तिला जाणीव करून द्या.

ऑफिसच्या कामामुळे होते चिडचिड

आजकालच्या वाढत्या महागाईमुळे काही प्राथमिक गरजा भागवणे सुद्धा कठिण झाले आहे. त्यामुळे सहसा पती आणि पत्नी दोघेही काम करतात. पुरुषांना बाहेरचीच कामे असतात. मात्र महिलांना बाहेरचे काम सांभाळून घरातली कामे सुद्धा करावी लागतात. अशावेळी ऑफिसच्या कामाचा दबाव वाढल्यास महिलांच्या चिडचिड करण्याचे प्रमाण वाढू शकते. अशावेळी तुम्ही घरकामात पुढाकार घेण्याची गरज असते. घरकामात थोडा जरी हातभार लावला आणि पत्नीसोबत गप्पा गोष्टी मारत कामे केल्यास पत्नीचा चिडचिडपणा कमी होऊ शकतो.

घरातील रोजचे काम

रोज सकाळी उठल्यापासूनच घरातील महिलांच्या कामांना सुरुवात होते. सकाळी उठणे, मुलांना तयार करणे, तुमचा डबा आणि घरातल्या ईतरांकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते. पुरुष कामानिमीत्त बाहेर जात असल्यामुळे त्यांच्या रोजच्या जिवनात थोड्याफार प्रमाणात तरी विविधता असते. परंतू महिलांच्या बाबतीत असे नसते. रोजच्या त्याच-त्या कामांमुळे त्यांना कंटाळा येतो. त्यांच्या रोजच्या जिवनात तेच-ते पुन्हा घडत असल्यामुळे त्यांना त्या रोजच्या जिवनाचा कंटाळा यायला लागतो. त्यामुळे सुद्धा महिलांची चिडचिड होते. अशावेळी तुम्ही वेळ काढून पत्नीस बाहेर फिरायला नेले पाहिजे. तिच्याशी नवनविन गोष्टींची चर्चा केली पाहिजे. ज्यामुळे पत्नीची चिडचिड कमी होऊ शकतो.

हे देखील वाचा Post Recruitment 2022: आठवी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

India vs Australia: बुमराहच्या यॉर्करवर स्वतःची दांडी गुल होऊनही अरॉन फिंचने उभा राहून वाजवल्या टाळ्या; पाहा व्हिडिओ..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

Amazon Great Indian Festival: आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

Sexual ability: या चार पदार्थांचा आहारात करा समावेश; शुक्राणूंची संख्या वाढून लैंगिक क्षमता होईल द्विगुणित..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.