Post Recruitment 2022: आठवी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Post Recruitment 2022: नोकरी(nokari) सध्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे आज प्रत्येक तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. कोरोनाने अनेकांचे रोजगार (unemployment) हिरावून घेतले. त्यात महागाईने (inflation) सुद्धा डोके वर काढले आहे. अशावेळी आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी तरी एखादी चांगली नोकरी (Job) असणे फार आवश्यक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणांची स्थिती तर जास्तच कठीण आहे. नोकरी मिळेल या आशेने कसेतरी पैश्यांची जुळवाजुळव करुन शिक्षण घेतले जाते. मात्र चांगले शिक्षण घेणारे सुद्धा आज घरी बसलेले आहेत. अशावेळी काही कारणास्तव शिक्षण मध्येच सोडलेल्यांनी किंवा कमी शिक्षण घेतलेल्यांनी काय करावे? हा प्रश्न तुमच्यासमोर नक्कीच असेल. मात्र आता अशा उमेदवारांसाठी देखील सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही देखील अशा नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Golden opportunity for Govt job for 8th pass candidates)

आपण पाहतो, खाजगी नोकरी आज बेभरवशाची झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांचा कल हा सरकारी नोकरीकडे आहे. परिणामी सरकारी नोकरींमध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा वाढली आहे. परंतू भारतीय पोस्ट तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी घेऊन आले आहे. भारतीय पोस्टमध्ये विविध पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. नुकतीच तशी अधिसूचना पोस्ट विभागाकडून जारी करण्यात आलेली आहे. कमी शिक्षण झालेले असल्यास सुद्धा तुम्हाला या नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया भारतीय पोस्टमधील या नोकरीविषयी.

भारतीय पोस्ट ही भारत सरकार द्वारा चालवण्यात येणारी एक सरकारी यंत्रणा आहे. विविध बदलांना स्विकारत भारतीय पोस्ट विभाग दिवसेंदिवस प्रगत होत आहे. तसेच रोजगाराच्या नवनविन संधी भारतीय पोस्ट विभागाकडून ऊपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यापैकीच मेकॅनिक, ईलेक्ट्रीशियन, पेंटर, वेल्डर आणि सुतार अशा विविध पदांसाठी ही भर्ती काढण्यात आलेली आहे. ८ वी पास असणार्‍यांना सुद्धा यामध्ये संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर काही कारणास्तव तुमचे शिक्षण थांबलेले असेल किंवा तुम्ही केवळ ८ वी ऊत्तीर्ण असाल तरीसुद्धा तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकता. तर चला जाणून घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया.

अर्ज कसा कराल

भारतीय पोस्ट विभागाकडून काढण्यात आलेल्या या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. पोस्ट विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेत याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या नमुन्यात अर्ज भरायचा आहे. या अर्जामध्ये ‘ द मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, सीटीओ कंपाउंड, तल्लाकुलम, मदुराई-625002’ या पत्त्यावर हा अर्ज पाठवायचा आहे. स्पीड पोस्ट किंवा नोंदनीकृत पोस्टाद्वारे हा अर्ज पाठवता येणार आहे. https://www.indiapost.gov.in या लिंकवर भेट देउन तुम्ही या भरतीची अधिसूचना पाहू शकता. व अधिक माहिती घेऊ शकता.

पगार कसा असेल?

भारतीय पोस्ट विभागाने आपल्या कर्मचार्‍यांची विशेष काळजी घेणार असल्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना चांगला पगार पोस्ट विभागाच्या नोकर्‍यांमध्ये मिळतो आहे. भरती काढण्यात आलेल्या या पदांसाठी देखील चांगला पगार मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतनश्रेणी आयोगाच्या लेव्हल २ पे मॅट्रीक्स अंतर्गत पगाराचे प्रावधान करण्यात आलेले आहे. त्यामुळे या नोकरीसाठी निवड झाल्यास 19000 ते 63200 रुपये प्रतिमहिना मिळणार आहे.

कोणत्या पदासाठी आहे जागा?

भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये भरण्यात येणाऱ्या जागांसाठी ज्या जागा भरण्यात येणार आहेत त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ. पोस्ट ऑफिस विभागामध्ये भरण्यात येणाऱ्या जागांमध्ये मॅकेनिकसाठी १, ईलेक्ट्रीशियनसाठी २, पेंटरसाठी १, वेल्डरसाठी १ आणि सुतार यासाठी २ अशा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही आयटीआय केलेले असेल किंवा वरील ट्रेडमधील प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल, तर ही नोकरी तुमच्यासाठीच आहे. विशेष म्हणजे अपघातासाठी तुम्हाला तो पैसा ६० हजारापर्यंत दरमहा पगार मिळणार आहे.

पात्रतेचे निकष आणि वयोमर्यादा

पोस्ट विभागातील या भरतीसाठी काही पात्रतेचे निकष ठरवून देण्यात आलेले आहे. वयोमर्यादेचे प्रावधान यामध्ये ठेवण्यात आलेले आहे. या पदांसाठी UR आणि EWS साठी १ जुलै २०२२ पर्यंत वयाची अट 18 ते 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या सूचना आणि निर्देशांनुसार सरकारी कर्मचार्‍यांना ४० वर्षे वयाची अट देखील यामध्ये ठेवण्यात आली आहे. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ट्रेडमधील प्रमाणपत्र, किमान १ वर्षाचा अनुभव आणि ८ वी पासची मार्कशीट असणे आवश्यक आहे. तसेच मोटर व्हेईकल मेकॅनिक पदासाठी ड्रायव्हींग लायसन्स अनिवार्य देखील करण्यात आले आहे.

हे देखील वाचा India vs Australia: बुमराहच्या यॉर्करवर स्वतःची दांडी गुल होऊनही अरॉन फिंचने उभा राहून वाजवल्या टाळ्या; पाहा व्हिडिओ..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Hangover: हा पदार्थ खाल्ल्यास दारूची नशा उतरते एका मिनिटांत; जाणून घ्या सविस्तर..

Menstrual cycle: मासिक पाळी येणं नेमकं केव्हा थांबतं? मासिक पाळीत होणारे बदल जाणून बसेल धक्का..

RBI BRBNMPL Recruitment 2022: या उमेदवारांना रिझर्व बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशी केली जाणार निवड..

Railway requirement 2022: या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये निघाली मेगा भरती; परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.