Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त ‘इतक्या’ हजारात..

0

Electric Scooter: सध्या आपल्याकडे ई-कॉमर्स साइटवरुन खरेदी करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे बाजारात सुद्धा नवनवीन ई-कॉमर्स वेबसाइट येत असल्याचे बघायला मिळते आहे. अगदी कपडे वगैरेंपासून ते घरातल्या इतर काही वस्तूंपर्यंत काहीही खरेदी करायची असल्यास ई-कॉमर्स साइटला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे या साइटसनी सुद्धा आता भारतीय लोकांची मानसिकता ओळखली आहे. त्यामुळे सण-उत्सवांचा काळ येताच, या साइटवर ऑफरची अक्षरश: उधळण केली जाते, त्यामुळे खरेदीचे प्रमाण अधिकच वाढते. सध्या फ्लिपकार्ट आणि एमेझॉन या दोन साइट प्रचंड धुमाकूळ घालत आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच आणि इतरही इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर अनेक ऑफर दिल्या जात आहेत. मात्र एमेझॉनने तर आता यात अधिक भर घातली आहे. एमोझॉन इलेक्ट्रिक गॅझेटसह आता स्कूटर सुद्धा बाजारात उतरवणार आहे.

 

सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) खरेदीचा काळ असल्याचे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. इंधनाचे वाढते दर अनेकांचे खिसे रिकामे करत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे दर सुद्धा खूप आहेत. तसेच येणारा काळ हा इलेक्ट्रिक (EV) वाहनांचाच असणार आहे. सरकार सुद्धा त्याच प्रयत्नांत असल्याचे पाहायला मिळते. केवळ दुचाकीच नाही तर चारचाकी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे शहरात फिरण्यासाठी मोठ्याप्रमाणार इलेक्ट्रिक स्कुटर घेतल्या जात आहे. ऍमेझॉनने हेच लक्षात घेता थेट त्यांच्या साइटवरुन इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च केली आहे. त्यामुळे आता एमेझॉनवरुन घर बसल्याच इलेक्ट्रिक स्कुटर घेता येणार आहे.

 

ओकाया नावाच्या इलेक्ट्रिक स्कुटर (Okaya Electric Scooter) कंपनीशी एमेझॉनने याकरिता भागिदारी केली आहे. त्यामुळे ओकाया स्कुटरची खरेदी करायची असल्यास कुठल्याच शोरुमला जाण्याची गरज नाही. मोबाईल किंवा इलेक्ट्रिक गॅझेटप्रमाणे या स्कुटरची आता एमेझॉनवर खरेदी करता येणार आहे. ओकाया ClassIQ (Okaya ClassIQ), ओकाया Faast F4 (Okaya Faast F4)आणि ओकाया FREEDUM (Okaya Freedom) या स्कुटर एमेझॉन शॉपींग साइटवरुन खरेदी करता येणार आहे. ज्याप्रमाणे कुठलीही ऑर्डर ऍमेझॉनकडून घरपोच पोहचवली जाते, त्याप्रमाणेच या स्कुटरची ऑर्डर सुद्धा मिळणार आहे. ऍमेझॉनचा दावा आहे की, ऑर्डर केल्याच्या १५ दिवसांच्या आत गाडी तुमच्या घरी पोहचवली जाईल.

 

काय आहेत ऑफर?: ऍमेझॉनवर (Amazon) या स्कुटरच्या खरेदीसाठी काही ऑफर सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. ऍमेझॉनवरुन ओकायाच्या (Amazon Electric Scooter) या इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी केल्यास केवळ 6,041 रुपयाच्या मासिक इएमआयवर तुम्ही ही गाडी खरेदी करु शकता. याशिवाय हा इएमआय नो कॉस्ट असणार आहे. ज्यामुळे कोणतेही अतिरिक्त व्याज देण्याची गरज नाही. तसेच तुम्ही पूर्ण पेमेंट केल्यास तुम्हाला 2000 रुपयापर्यंतची सूट मिळेल. स्कुटरची खरेदी करतांना ऍमेझॉन पे आयसीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अतिरीक्त 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ऍमेझॉनवर ओकाया इलेक्ट्रिक स्कुटरच्या विक्रीसाठी काही बॅंक ऑफर सुद्धा चालवल्या जाणार आहे.

 

कशी कराल गाडीची खरेदी?: सर्वप्रथम ऍमेझॉनच्या (Amazon) साइटवर जा आणि तिथे तुमचे आवडत्या इलेक्ट्रिक स्कुटरच्या मॉडेलची निवड करा. त्यानंतर तेथे बुक नाऊ किंवा फुल पेमेंटचा पर्याय दिसेल. तुमच्या सोयीनुसार तुम्ही पर्याय निवडा. बुक नाऊच्या पर्यायामध्ये तुम्हाला थेट 10,000 रुपये भरावे लागणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 2000 रुपयापर्यंतची त्वरित सुट उपलब्ध असेल. तुम्हाला चाचणी राईडचा (Test Ride) पर्याय सुद्धा दिलेला असेल, ज्यावर तुम्ही चाचणी राईड बुक करु शकता. चाचणी राईड बुक केल्याच्या 24 तासांच्या आत अधिकृत डिलर तुमच्याशी संपर्क साधेल. यामध्ये काही पेमेंट प्लान आहेत. तुम्हाला सोयीस्कर ठरणार्‍या प्लॅननुसार डिलरला पैसे द्यावे लागेल आणि कागदपत्रं जमा करावी लागतील.

 

कागदपत्रांची पूर्तता होताच तुमची ऑर्डर पाठवली जाईल. एका गोष्टीकडे मात्र येथे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. ऑर्डर पाठवेपर्यंतच तुमच्याजवळ यामध्ये कुठलेही बदल करण्याची संधी आहे. एकदा कंपनीकडून ऑर्डर पाठवल्यानंतर ऑर्डर रद्द करता येणार नाही. विमा, RTO वगैरेसाठी ग्राहकाचे केवायसी केले जाईल. आता तुमच्या ई-स्कुटरच्या वितरणासाठी तुम्हाला अपॉइनमेंट घ्यावी लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार पिकअप किंवा होम डिलीव्हरीचा पर्याय निवडू शकता. होम डिलीव्हरीचा पर्याय निवडल्यास त्यांनी दिलेल्या तारखेपर्यंत गाडी तुमच्या दारात उभी असेल.

हेही वाचा: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offers चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..या

पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत.. 

Viral video: एका मुली समोरच या दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.