Ration Card: रेशन दुकानदार पावती, नियमानुसार धान्य देत नाही? फक्त या नंबरवर कॉल करा लगेच उठेल दुकानदाराचा बाजार..
Ration Card: रेशनकार्ड आज प्रत्येकासाठीच फार महत्वाचे आहे. कोरोना दरम्यान रेशन कार्डवर मिळणार्या धान्याने अनेकांची भूक भागवली. रोजगार बंद असतांना खायचे काय? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. परंतू पंतप्रधान गरिब कल्याण योजनेमुळे या कठिण दिवसांत अनेकांना दिलासा मिळाला. शिधापत्रिका केवळ धान्य घेण्यासाठीच ऊपयोगाची नाही, तर शिधापत्रिकेचे विविध फायदे आहेत. त्यामुळे तुमच्याकडे शिधापत्रिका असणे फार गरजेचे आहे. अनेक ठिकाणी पुरावा म्हणून शिधापत्रिकेचा ऊपयोग केला जातो. शिधापत्रिकेचे महत्व लक्षात घेता, आजच तुमची शिधापत्रिका शोधून जपुन ठेवा. नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..
विविध शासकीय योजना असो किंवा विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती असो शिधापत्रिका कागदपत्रांमध्ये द्यावीच लागते. जागांचे व्यवहार करायचे असोत, किंवा बॅंकेचे कर्ज घ्यायचो असो, कागदपत्रांमध्ये शिधापत्रिका मागितली जाऊ शकते. शिधापत्रिकेकडे महत्वाचे कागदपत्र म्हणून बघितले जाते. कुटुंबाची स्थिती पडताळण्यासाठी शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी योजनांसाठी अर्ज करायचा असल्यास, अर्जासोबतच्या कागदपत्रांमध्ये शिधापत्रिका द्यावीच लागते. परंतू अनेकदा शिधापत्रिका असून देखील, रेशन दुकानदार तुम्हाला धान्य देण्यास टाळाटाळ करतात. पण अशावेळी तुम्ही रेशन दुकादाराची रितसर तक्रार करु शकता, केवळ एक नंबर डायल करून. जाणून घेऊया सविस्तर. आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
देशातल्या प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकावर ऊपाशी राहण्याची वेळ येऊ नये, याकरिता सरकारने रेशन कार्डची व्यवस्था करुन ठेवलेली आहे. मात्र ग्राहकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन काही रेशन दुकानदार ग्राहकांना फसवतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन त्यांना विनाकारण नाहक त्रास देतात. तुमचा रेशन दुकानदार सुद्धा तुमच्याशी तुसडेपणाने वागत असेल. तुमच्याकडे रेशन कार्ड असून, तुम्ही लाभार्थी असून देखील तुम्हाला धान्य देण्यास टाळाटाळ करत असेल, किंवा नियमानुसार धान्य देत नसेल, तर तुम्ही त्याला चांगलीच अद्दल घडवु शकता. रेशन दुकानदाराची तक्रार करुन तुम्हाला मिळणार्या योजनेचा लाभ, व्यवस्थितरित्या मिळावा याचे प्रावधान सरकारने करुन ठेवलेले आहे.
अनेकवेळा शिधापत्रिका असून देखील रेशन दुकानदार शिधा देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. परंतू रेशन दुकानदारांचा हा प्रकार शासनाच्या लक्षात आलाय. त्यामुळे ग्राहकांना त्रास देणार्या रेशन दुकानदारावर आता कठोर कारवाईचे प्रावधान करण्यात आलेले आहे. याशिवाय ग्राहकास तक्रार करण्याचे विविध माध्यम ऊपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. जेणेकरुन ग्राहकास अगदी सहजतेने आणि सोप्या पद्धतीने रेशन दुकानदाराची तक्रार करता यावी व त्यास मिळत असलेल्या योजनेचा लाभ त्यांना मिळावा. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या रेशन दुकानदाराची तक्रार करण्याच्या विचारात असाल तर, याठिकाणी आम्ही तुम्हाला तक्रार कशी करायची याबाबतच सांगणार आहोत.
ऑनलाईन करु शकता तक्रार
ग्राहकांना तक्रार करण्यासाठी त्रास होऊ नये, याकरिता सरकारने विविध प्रावधान करुन ठेवलेले आहेत. कारण कुठलाही लाभार्थी त्याला मिळणार्या लाभापासून वंचित राहू नये. हा सरकारचा मुख्य हेतु आहे. मात्र रेशन दुकानदारांच्या वागणुकीमुळे बर्याच जणांवर लाभांपासून वंचित राहण्याची वेळ येते. रेशनचे धान्य घेणारा वर्ग मोठ्याप्रमाणात अशिक्षित असल्यामुळे तक्रार वगैरेंसारख्या गोष्टी त्यांना कळत नाही. मात्र त्यांच्या सोयीकरता ऑनलाईन तक्रारीचे प्रावधान सरकारने केले आहे. त्यामुळे कुठल्याही सेतु सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमच्या रेशन दुकानदाराची ऑनलाईन तक्रार करु शकता. प्रत्येक राज्य सरकारने त्याकरिता ई-मेल आयडी सुद्धा जारी केलेले आहेत.
टोल फ्री क्रमांकावर सुद्धा होते तक्रार
कोरोनात अनेकांवर रोजगार गमावण्याची वेळ आली. हातावर पोट असणार्यांची दोन वेळच्या खाण्याची सोय होणे सुद्धा कठिण झाले होते. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अन्न सुरक्षा योजना सुरु केली. मात्र अनेक ठिकाणी रेशन दुकानदार धान्य देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या घटना समोर येत होत्या. जर तुमचा रेशन दुकानदार सुद्धा तुम्हाला धान्य देण्यास टाळाटाळ करत असेल, तर तुम्ही थेट राज्य पुरवठा आणि नियंत्रण कक्षाकडे त्याची तक्रार करु शकता. याकरिता संबंधीत राज्य सरकारांनी टोल फ्री क्रमांक जारी केलेले आहेत. महाराष्ट्रात 1800-180-2087, 1800-212-5512 या क्रमांकावर फोन करुन तुम्ही संबंधीत रेशन दुकानदाराची तक्रार करु शकता.
तहसिल कार्यालयात होते तक्रार
रेशन दुकानदार जर वारंवार लहाण-सहाण गोष्टींवरुन तुम्हाला त्रास देत असेल. शिधापत्रिका असून देखील धान्य देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा तुम्हाला धान्यच कमी देत असेल, तर अशावेळी तुम्हाला रेशन दुकानदाराविरोधात तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्ही थेट तहसिल कार्यालयात जाऊन तुमच्या रेशन दुकानदाराची लेखी तक्रार करु शकता. तहसिल कार्यालयात लेखी अर्ज करुन त्यात तक्रार कशा संबंधीत आहे व कशासाठी आहे? याचा ऊल्लेख करावा. त्यानंतर तहसिल कार्यालयात तुम्हाला त्यासंबंधीत काही सुचना केल्या जातील.
हे देखील वाचा Urine Colour Chart: लघवीच्या रंगावरुन समजते आजाराचे स्वरूप; जाणून घ्या लघवीच्या विविध रंगांविषयी..
Social media side effects: सोशल मीडियाचा वापरामुळे होतायत हे गंभीर शारीरिक आणि मानसिक आजार..
Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम