Milk farming: पशुखाद्यामध्ये या पदार्थांचा करा समावेश; निरोगी रोग्याबरोबरच गाई म्हशी दूधही देतील दुप्पट..

0

Milk farming: निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे पुर्णत: शेतीवर अवलंबून राहणे शेतकर्‍यांसाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी शेतीसोबतच पशुपालनाला महत्व देतात. यामध्ये मेंढीपाळ, शेळीपालन, गायी व म्हशी देखील पाळल्या जातात. अंड्यांची वाढती मागनी बघता, काही शेतकरी आपल्या शेतात पोल्ट्री फार्मसुद्धा ऊभा करतात. निसर्गाने ऐनवेळी धोका दिल्यास, हे पशुधनच शेतकर्‍याचा ऊदनिर्वाह भागवते. तसेच यातुन मिळणार्‍या ऊत्पन्नावर शेतकरी त्याच्या बर्‍याच गरजा भागवतो. याशिवाय पशुपालन हे जास्त खर्चिक सुद्धा नाही. शेतातील काही माल पशुधनास खाद्यपदार्थ म्हणून सुद्धा वापरला जातो. त्यामुळे कमी खर्चात मुबलक ऊत्पादन देणारा व्यवसाय म्हणून सुद्धा याकडे बघितले जाते.

पशुपालन करतांना शेतकर्‍यांना बर्‍याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण आपण बघतो की, अचानक एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होतो, ज्यामध्ये जनावरं मरण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे नियमित लसीकरण करणे, यासोबत जनावरं जिथे बांधण्यात येतात, त्या गोठ्याची नियमित साफसफाई करुन स्वच्छता ठेवणे. अशा बारीकसारीक बाबींकडे लक्ष द्यावे लागते. अन्यथा जनावरं आजारी पडल्यास त्यांच्या ऊत्पादनापेक्षा अधिक खर्च त्यांना बरे करण्यात लागतो. यानंतर आजारी जनावरं पाहिजे तसे ऊत्पादन सुद्धा देत नाहीत. त्यामुळे जनावरं आजारी पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी पशुधनाच्या खाद्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. कारण आजारी पडण्यापासून बचाव आणि भरघोस ऊत्पादन या दोन्हींवर ऊत्तम आहार हाच पर्याय आहे.

जनावरांच्या आहारामध्ये काही पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. जेणेकरुन जनावरं भरघोस उत्पादन देऊ शकतात. शिवाय पोषक घटकांचा त्यांच्या आहारात समावेश असल्यास विविध आजारांशी लढण्याची प्रतिकारशक्ती त्यांच्यात निर्माण होते. पशुखाद्याची व्यवस्थित माहिती घेतल्यास व त्याचा योग्य ऊपयोग केल्यास कमी खर्चात पोषक पशुखाद्य आपण जनावरांपर्यंत पोहचवु शकतो. त्यामुळे कमी खर्चात जास्त प्रभावी पशुखाद्य कोणते असु शकते? हे जाणुन घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या लेखात करणार आहोत.

पानकोबी

पशुखाद्यामध्ये पानकोबीचा ऊपयोग प्रचंड फायदेशीर आहे. त्यामुळे जे शेतकरी पानकोबीचे ऊत्पादन घेतात, त्यांनी तर आवर्जुन आपल्या जनावरांच्या खाण्यात काही प्रमाणात पानकोबीचा समावेश करावा. जेणेकरुन पानकोबीतले विशीष्ट पोषक घटक जनावरांना विविध आजारांपादून दुर ठेवण्यात मदत करतात. जीवनसत्व “अ”जिवनसत्व “सी” बी आणि कॅल्शिअमचे प्रमाण कोबीमध्ये पुष्कळ असते. या घटकांचा आहारात समावेश असल्यास जनावरांचे आरोग्य निरोगी राहते. कोबीमधील इंडोल, आयसोथियोसायनेट्स आणि डायथिओलथिओन्स हे घटक कर्करोगाविरोधात लढण्याची शक्ती देतात. कोबीच्या पानांमध्ये लोहाची मात्रा प्रचंड असतो. याशिवाय कोबीमध्ये पाण्याचे प्रमाणसुद्धा पुष्कळ असते. त्यामुळे ऊन्हाळ्यात पशुखाद्यामध्ये कोबीचे महत्व अधिकच वाढते.

फ्लॉवर

फ्लॉवरमध्ये प्रथिनांचा समावेश पुष्कळ असतो. त्यामुळे फ्लॉवरचा पशुखाद्यांत आवर्जुन समावेश करायला हवा. प्रथिनांचे शरीरातील प्रमाण हे पशुस निरोगी ठेवण्यास मदत करते. रोगप्रतिक शक्तीमध्ये वाढ होते. त्यामुळे आजारांच्या प्रभावाची तीव्रता कमी होते. फ्लॉवरचा अनावश्यक भाग अधिक फायदेशीर असतो. त्यामुळे जो भाग आपल्या ऊपयोगाचा नसतो, तो फेकण्याऐवजी जनावरांना देण्यास हरकत नाही. त्यामुळे आपला दुहेरी फायदा होऊ शकतो. फ्लॉवरमध्ये जिवनसत्व “क”, जिवनसत्व बी ६, पॅटोथेनिक ऍसिड, पोटॅशियम यांचा समावेश असतो. थायमीन, रिबोफ्लेविन आणि फॉस्परस हे सुद्धा फ्लॉवरमधून मिळणारे घटक आहेत. त्यामुळे फ्लॉवर हे पशुखाद्यांमध्ये समाविष्ट करण्यासारखे आहे.

केळीसुद्धा आहेत फायदेशीर

पशुखाद्यांमध्ये केळीचा समावेशसुद्धा फायदेशीर ठरु शकतो. परंतू अनेकांना हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही, की केळींचे भाव बघता त्यांचा समावेश पशुखाद्यात करणे, खिशाला परवडणारे ठरेल का? तर हा प्रश्न पडणे संयुक्तिक आहे. मात्र आपण जी केळी खाण्यात वापरतो ती दर्जेदार केळी जनावरांना बिल्कुल टाकायची नाहीये. त्याऐवजी बाजारपेठेत विक्रीयोग्य नसलेली केळी, कच्ची केळी, केळीची साले, पाने यांचा समावेश पशुखाद्यांमध्ये ठेवावा. केळी मनुष्याचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात, त्याप्रमाणेच मनुष्याच्या निरुपयोगी असणारी केळी व केळीचे विविध भाग पशुंचे आरोग्य सुदृढ ठेवण्यात सुद्धा मदत करतात. त्यामुळे पशुखाद्यात केळी संबंधीत घटकांचा समावेश जास्त असावा.

हे पदार्थ कधीच देऊ नका

आपण बघितले की शेती व आपल्या रोजच्या जिवना संबंधीत पदार्थ जरी आपण जनावरांच्या खाद्यपदार्थात समाविष्ट केलीत तरीसुद्धा ते भरपुर फायदेशीर आहे. मात्र जनावरांचा रोगांपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यावी लागते. जनावरं असल्यामुळे बर्‍याचदा आपल्याला नको असलेले कुठलेही पदार्थ जनावरांना आपण देतो. जसे की घरात ऊरलेले शिळे अन्नपदार्थ, वास लागलेले काही पदार्थ. मात्र ते जनावरांसाठी आणि पर्यायाने तुमच्यासाठी सुद्धा धोक्याचे ठरु शकते. यामुळे जनावरावर एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम ऊत्पन्नावर होतो. शिळे अन्न कधीच जनावरांना देऊ नये. शिळे अन्न किंवा भाजी यामुळे जनावरांची सुद्धा पचनक्रिया बिघडु शकते. त्यामुळे याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच काडीकचरा सुद्धा त्यांच्या खाण्यात येऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. अनेकदा जनावरं बाहेर मोकाट फिरत असतांना अनावधानाने प्लास्टिक खाऊन घेतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर याचा दिर्घ प्रभाव जाणवण्याची शक्यता असते.

योग्य पशुखाद्याचे फायदे

शेतीसोबत पशुपालन हा एक प्रमुख जोडव्यवसाय झाला आहे. शेती ही दिवसेंदिवस अनिश्चित होते आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावरुन घेतल्याचा प्रकार शेतकर्‍य‍ांसोबत नेहमीच घडत असल्याचे आपण बघतो. त्यामुळे शेतीबरोबर जोडव्यवसाय ही काळाची गरज झाली आहे. योग्य नियोजन करुन पशुपालन केल्यास त्यातुन मुबलक नफा मिळवता येतो. यामध्ये पशुंच्या खाद्यपदार्थांची महत्वाची भूमिका असते. योग्य खाद्यपदार्थांचा समावेश पशुंच्या आहारात केल्यास ते दुपटीने ऊत्पादन देतात. म्हशीचे आणि गायीच्या दुधाची मागनी दिवसागणिक वाढते आहे. त्याकरिता अजैविक संसाधनांचा ऊपयोग करण्याऐवजी जैवक ऊपाय केल्याससुद्धा तुमच्या ऊत्पादनात भरघोस वाढ होते. त्यामुळे आपल्या मातीतले आपले ऊपाय आणि संयम बाळगणे गरजेचे आहे. वरील खाद्यपदार्थ अगदी सहजतेने कमी खर्चात ऊपलब्ध होणारे आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक नफासुद्धा याद्वारे मिळवता येतो.

हे देखील वाचा Asia Cup final: पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेने फायनलही जिंकला आणि रोहित शर्माचं तोंडही बंद केलं..

flipkart big billion days: स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, फ्रीजसह अनेक वस्तूंवर तब्बल 50% हून अधिक डिस्काउंट; जाणून घ्या कधी सुरू होतोय सेल..

Airtel vs Jio: एअरटेल की जिओ कोणतं सिम आहे बेस्ट? दोन्हीं कंपनींचे हे चार रिचार्ज प्लान पाहा, आणि तुम्हीच ठरवा..

Parenting Tips: मुलं मोठी झाल्यावर पालकांनी त्यांच्या सोबत झोपणे पडू शकते महागात, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

How to Attract Men: पुरुषांच्या या सवयींकडे स्त्रिया होतात आकर्षित; फक्त आकर्षितच नाही, आपलं सर्वस्व देण्यासही असतात तयार..

Bollywood: दिग्गजांना घायाळ करणारी कॅट, विक्कीच्या जाळ्यात कशी अडकली? वाचा विक्की-कॅटच्या लव्हस्टोरी मागची कहाणी..

Benefits of Eating Cashew: काजू खाण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम..

Pitru Paksh2022: कुटुंबात हे संकेत असतील तर समजून जा पूर्वज आहेत नाराज; या पितृपंधरवड्यात असा दूर करा पितृ दोष..

Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.