IPL 2022 Final GT vs RR: रॉयल विजयासह राजस्थान आज १४ वर्षानंतर जिंकणार आयपीएल ट्रॉफी; जाणून घ्या कारण..

0

IPL 2022 Final GT vs RR: आयपीएल 2022 चा अंतिम सामना (IPL 2022 finale) आज नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद Narendra Modi cricket stadium Ahmedabad) मैदानावर खेळविण्यात येणार आहे. आयपीएलच्या स्पर्धेत (ipl tournament) पहिल्यांदाच खेळणाऱ्या गुजरात टायटन्सचा (gujrat Titan) सामना आज आयपीएलच्या पदार्पणात स्पर्धा जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) संघाशी रंगणार आहे. Gujarat Titan vs rajsthan royals) क्रिकेट चाहत्यांना आज आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामाचा विजेता पाहायला मिळणार आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कोणता संघ बाजी मारेल, हे कोणी सांगू शकत नाही. मात्र या स्पर्धेतील कामगिरीचा विचार करायचा झाल्यास, गुजरात टायटन्स संघाची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. साहजिकच यामुळे क्रिकेट चाहत्यांना हा संघ आयपीएल २०२२ विजेता होईल असं वाटतं आहे. मात्र गुजरात संघाला या सामन्यात प्रभावाचा सामना करावा लागणार असल्याची दाट शक्यता आहे. (Gujarat Titan loss)

हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल, मात्र याची ठोस करणे देखील आहेत. या सामन्यात नक्की कोणाचे पारडे जड असणार आपण यावर एक नजर टाकुया. या हंगामासाठी मेगा ऑक्शन झाल्यानंतर, अनेक क्रिकेट दिग्गजांनी गुजरातचा संघ इतर संघाच्या तुलनेत खूपच कमकुवत असल्याचे म्हंटले. मात्र सगळ्याचा अंदाज चुकवत या संघाने साखळी सामन्यांत चौदा पैकी दहा सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांक फटकावला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात या संघातील प्रत्येक खेळाडूने उत्तम कामगिरी केली. हा संघ कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नसल्याचे पाहायला मिळते. या संघाच्या प्रत्येक खेळाडूने विजयात योगदान दिले आहे. आणि हीच या संघाची ताकद आहे.

दुसरीकडे राजस्थान संघाचा विचार करायचा झाल्यास, हा संघ गुजरात संघापेक्षा अधिक बलशाली आहे. पर्पल कॅप आणि ऑरेंज दोन्हीं कॅप राजस्थान संघाकडे आहे. एवढच नाही, तर या संघातील इतर गोलंदाज देखील उत्कृष्ट कामगिरी करत आहे. ‘पॉवर प्ले’ मध्ये ट्रेंड बोल्ट प्रतिस्पर्धी संघाची मोठी डोके दुखी ठरू शकतो, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. भलेही पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रसिद्ध कृष्णाला तीन चेंडूत तीन षटकार खेचण्यात डेव्हिड मिलरला यश आले असले तरी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात प्रसिद्ध कृष्णाने कमबॅक केला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या यादीत संयुक्तरीत्या युझवेंद्र चहल अव्वल स्थानावर आहे. तर जोस बटलर सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या सामन्यात एखाद्या खेळाडूची असामान्य इनिंग आली तर समोरचा संघ सामन्यातून बाहेर फेकला जातो. धोकादायक फलंदाजांच्या यादीत जोस बटलर संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर यासारखे अनेक खेळाडू राजस्थान संघाच्या ताफ्यात आहेत. दुसरीकडे गुजरात संघात एक्स्ट्राऑर्डनरी इनिंग कोणी खेळेल असं वाटतं नाही. डेव्हिड मिलर, हार्दिक पांड्या हे खेळाडू मोठी इनिंग खेळू शकतात. मात्र या फलंदाजांची देखील खूप कमजोरी आहे. शुभमन गिलमध्ये मोठी आणि एक्स्ट्राऑर्डनरी इनिंग खेळण्याची क्षमता आहे. मात्र तो या स्पर्धेत फॉर्ममध्ये नसल्याने हा संघ अडचणीत येऊ शकतो.

महत्वाच्या सामन्यात नेहमी मोठ्या खेळाडूकडून संघाला अपेक्षा असतात. कारण अशा सामन्यात प्रचंड मोठं प्रेशर असतं. साहजिकच हा तणाव अनेक खेळाडू झेलू शकत नाहीत. गुजरात संघाकडे तारांकित खेळाडू नसल्याने, साहजिकच याचा मोठा फटाका या संघाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं असलं तरी, महत्वाची बाब म्हणजे, याचा खूप मोठा फटाका राजस्थान संघाला देखील बसू शकतो. कारण हा संघ जोस बटलरवर जास्त प्रमाणात अवलंबून आहे. जर गुजरात संघाने बटलरला स्वस्तात बाद केले, तर राजस्थान संघ अडचणीत देखील येऊ शकतो.

संघात अनेक स्टार आणि मोठे खेळाडू असल्याचा जेवढा फायदा असतो, तेवढंच त्याचे नुकसान देखील असते. कारण असा संघ कˈलॅप्स् होण्याची शक्यता जास्त असते. कारण अशा संघाचे स्टार खेळाडू स्वस्तात बाद झाले तर, संघातले इतर खेळाडू प्रेशरमध्ये येण्याचे चांसेस इतर संघाच्या तुलनेत जास्त असतात. मात्र राजस्थान संघामध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. शिवाय सर्वच खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये देखील आहेत. साहजिकच यामुळे गुजरात संघाच्या फलंदाजीपेक्षा राजस्थान संघाची फलंदाजी खूप बलशाली आहे.

आयपीएल २०२२च्या हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी राजस्थान संघाकडे आहे. फलंदाजी प्रमाणेच अनेक तारांकित गोलंदाज राजस्थान संघाकडे आहेत. युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंड बोल्ट, रविचंद्रन अश्विन, यासारखे स्टार गोलंदाज राजस्थान संघाकडे असल्याने या सामन्यात राजस्थान संघ अधिक उजवा वाटतोय. मात्र असे असले तरी, मैदानावर जो संघ तणाव पेलू शकेल, आणि चांगल्या खेळाचे प्रदर्शन करू शकेल तोच संघ बाजी मारेल.

हे देखील वाचाLifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..

Lifestyle: दररोज से क्स केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर

Viral video: रानडुकराला वाघाने पकडलं जबड्यात, तेवढयात मगरीनेही केला वाघावर हल्ला; पहा हा थरारक व्हिडीओ.. 

Fundamental rights: लॉजवर जाऊन जोडप्यांना पोलिसांनी त्रास दिल्यास होणार मोठी कारवाई; रूम नाही दिली तर हॉटेलवरही कारवाई..

Ration Card: आता या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद! सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

PM kisan Update: मोठी बातमी! अकरावा हप्ता आलेल्या लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; अशी चेक करा यादी..

PM Mudra Yojana: व्यवसाय सुरू करायचाय पण पैसे नाहीत? चिंता करू नका, केंद्र सरकार देतय हमीशिवाय दहा लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या सविस्तर..

health: बाहेर जाताना दही साखर खाल्ल्याने दिवस चांगला जातो असं पूर्वज का म्हणायचे? शास्त्रीय कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

beauty vibes: मेकअप पेक्षाही सुंदर आणि मुलायम दिसेल चेहरा, फक्त लावा हा फेसलेप लग्नाला जाताना तर हमखास लावा सगळ्यांच्या नजरा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.