health: बाहेर जाताना दही साखर खाल्ल्याने दिवस चांगला जातो असं पूर्वज का म्हणायचे? शास्त्रीय कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
health: घरातून ऑफिसला किंवा कामावर कुठे बाहेर जाताना अनेकजण नेहमी दही (curd)आणि साखर (sugar) खात असतात. दिवस चांगला जाण्यासाठी किंवा आपल्या कामात काही अडचणी येऊ नये म्हणून, दही साखर (curd sugar) खायची असते, असे आपले पूर्वज म्हणत होते. आणि हीच परंपरा आपल्या वडीलधार्या माणसांनी देखील जोपासली आहे. आता आपण देखील हेच करत आहोत. मात्र हे याचे ठोस कारण नाही. दही आणि साखर खाण्याला एक शास्त्रिय कारण आहे. हे अनेकांना माहीत नाही. आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत.
समाजात अशा अनेक समजुती पूर्वीपासून, चालत आल्या आहेत, ज्या आजही पाळल्या जातात. खरंतर ही एक अंधश्रद्धाच आहे. विशेष म्हणजे, या समजुतीला अनेक उच्च शिक्षित लोकं देखील बळी पडताना पाहायला मिळतात. हे जरी असंल, तरी या समजुती आपल्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र या समजुतीचे अनेक फायदे आहेत, आणि याला शास्त्रीय कारणे देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला याच विषयी माहिती सांगणार आहोत.
दही आणि साखर खाल्याने खरंच दिवस चांगला जातो?
घरातून बाहेर जाताना दही आणि साखरेचे सेवन केल्याने दिवस चांगला जातो, किंवा एखाद्या आखलेल्या कामामध्ये काहीही अडचण येत नाहीत, अशी अनेकांची धारणा आहे. आपले पूर्वज तसेच वडीलधारी मंडळी देखील हेच सांगत आली आहेत. मात्र यात काहीही तथ्य नाही. परंतु दही आणि साखरेचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी (health) हे खूप फायदेशीर आहे. दही आणि साखर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे पूर्वजांना माहीत होतं, आणि याच्यातछ शास्त्रीय कारण दडलेलं आहे. जाणून बुजून आपल्या पूर्वजांनी दही खाल्ल्याने दिवस चांगला जातो, आणि आखलेलं काम देखील उत्तमरित्या पार पडतं, हे जाणून-बुजून समाजात पसरवलं. अनेकांना प्रश्न पडला असेल, पूर्वजांनी असं का केलं असेल? तर याला देखील कारण आहे. आता आपण आपले पूर्वज दही साखर खाल्ल्याने दिवस चांगला जातो, असं का म्हणत होते? हे जाणून घेऊ.
दही आणि साखर खाल्ल्याने दिवस चांगला जातो, असं आपले पूर्वज का म्हणायचे?
दही आणि साखरेचे सेवन करणे, हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे आपल्या पूर्वजांना देखील माहीत होते. मात्र जर आपण दही आणि साखर आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असं म्हटले असतं, तर याचे सेवन कोणी करेल की नाही याबाबत शंका होती. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी, आणि लोकांनी घाबरून आपण जो सल्ला देत आहे त्याचं पालन करावं, हा याचा मूळ उद्देश असावा. यासाठी घरातून बाहेर पडताना दही आणि साखरेचे सेवन केल्याने, तुमचे काम होण्यास काहीही अडचण येणार नाही, तसेच दिवस चांगला जाईल. अशी भीती घातली गेली असल्याचं बोललं जातं. मात्र आता दही आणि साखरेचे सेवन केल्यास, आपल्या आरोग्यास नक्की काय फायदा होतो, याचे शास्त्रीय कारण काय आहे? विषयी सविस्तर जाणून घेऊया.
यामुळे घरातून बाहेर जाताना खातात दही आणि साखर
दही हे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत आहे. आपण खाल्लेलं कुठलेही अन्न पदार्थ दही पचवण्यासाठी मदत करते. दह्यामध्ये अतिरिक्त पाणी, तसेच प्रथिने देखील पाहायला मिळतात. आणि म्हणून, दही सकाळी खाल्याने दिवसभर आपल्या शरीरातील पाणी आणि प्रथिने नियंत्रणात राहते. त्याचबरोबर साखरेमध्ये ग्लुकोजचे प्रमाण असतं, त्यामुळे हे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. घरामधून बाहेर जाताना आपण अनेक ठिकाणी फिरत असतो, सहाजिकच त्यामुळे तणाव निर्माण होत असतो. अशा वेळी दही आणि साखर खाल्ल्याने आपला तणाव नियंत्रणात राहण्यास मदत होते.
दही आणि साखर खाल्याने त्यामधून पाणी, प्रथिने, व्हिटॅमिन सी, चरबी, कर्बोदके, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, ग्लुकोज,कॅल्शियम इद्यादी अनेक प्रकारची जीवनसत्त्वे मिळतात. दही आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतं. आता आपण दही आणि साखर या पदार्थाचे सेवन केल्याने नक्की काय फायदे होतात, हे जाणून घेऊ
दही साखर खाण्याचे हे आहेत फायदे
आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जर प्रतिकारशक्ती असेल, तर तुम्ही अनेक रोगांवर सहज विजय प्राप्त करू शकता. दही आणि साखरेचे सेवन केल्याने आपली प्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी देखील मदत करते, यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. आपले शरीर निरोगी ठेवण्यास देखील साखर आणि दही मदत करते. मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी देखील दही आणि साखरेचे सेवन महत्त्वपूर्ण ठरतं. आयुर्वेदानुसार दही आणि साखरेचे नियमित सेवन केल्याने, माणसांमधील स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील वाढण्यास मदत होते.
यामुळे घरातून बाहेर जाताना नियमित दही आणि साखर सेवन करण्याचा सल्ला आपल्या पूर्वजांनी देखील दिला होता. मात्र त्यांनी याची कारणे वेगळी सांगितली होती, अर्थातच आपण ती पाहिली. आजही आपण अनेकदा ऐकतो, पूर्वी लोकं खूप हुशार होती. त्यांना अनेक गोष्टीचा ज्ञान होतं. पूर्वी दवाखान्यांची संख्या फार कमी होती, आणि म्हणून आरोग्य निरोगी राहावं यासाठी ते नेहमी काळजी घ्यायचे. कदाचित अशा अनेक बाबी लक्षात घेऊन पूर्वजांनी माणसांमध्ये भीती घातली, आणि याचं पालन आजही लोकं करतात. मात्र आजही अनेक जण दही आणि साखर खाल्ल्याने दिवस चांगला जातो, आणि कामे होतात, असे समजतात. याचे मूळ आणि शास्त्रीय कारण वेगळे आहे ते आपण पाहिले.
हे देखील वाचा Lifestyle: पुरुषांच्या या चार गोष्टींवर महिला टाकतात जीव ओवाळून; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम