Viral Video: या’ कारणामुळे ‘म्हशी’ने सिंहाला ताणून ताणून बेजार केलंय, व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा पहाच..

0

जंगलाचा राजा सिंह का असतो, हे कोणालाही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सिंहाला (lion) कोणी पाहिले तरी तो आपला जीव वाचवण्यासाठी धूम ठोकतो. सिंहाबरोबर कोणीही दोन हात करायचं धाडस करत नाही. मात्र खोड केल्यावर मुंगीसुद्धा गप बसत नाही, ही म्हण आपण अनेक वेळा ऐकलीच असेल. असंच एका म्हशीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्रास देणाऱ्या सिंहाला या म्हशीने (buffalo) ताणून ताणून बेजार केलं आहे. (Buffalo attack lion)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही, अलिकडच्या काळात सोशल मीडिया अधिक प्रभावशाली झाल्याने, एकही घटना लपून राहत नसल्याचं पाहायला मिळतं. कुठल्या ना कुठल्या कॅमेऱ्यात ती कैऊ होतेच. सोशल मीडिया जितका प्रभावी आहे, तितकाच घातक देखील असल्याचं अनेक वेळा बोललं जातं. मात्र सोशल मीडियावर म्हशीचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, लाखों जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

सोशल मीडियावर म्हशीचा आणि सिंहाचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला असून, हजारो जणांनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. म्हशीने सिंहाची केलेली दयनीय अवस्था पाहून, अनेक जण या व्हिडिओची मजा घेत असून, शेअर देखील मोठ्या प्रमाणात करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सिंह खूप ताकतवान प्राणी असल्याचा आपण लहानपणापासून ऐकत आलोय. मात्र जर एखाद्याच्या मनात आलं तर तो काहीही करू शकतो, याचं जिवंत उदाहरण या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे.

काय घडलं नेमकं

त्याचं झालं असं, शिकारीला निघालेल्या सिंहाने एका म्हशीला टार्गेट केलं. ही म्हैस देखील सिंहाला पाहून प्रचंड घाबरलेली व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा सिंह आता आपल्याला ठार मारेल या भीतीने ही म्हैस देखील पुढे पळताना पाहायला मिळत आहे. मात्र तेवढ्यात दुसरी एक म्हैस मध्ये आली, आणि सिंहाला क्षणात आपल्या शिंगावर घेऊन उचलून फिरवून फेकून दिलं. या म्हशीचे एवढ्यावर समाधान झालं नाही, तर पुन्हा एकदा तिने सिंहाला आपल्या शिंगावर घेऊन, जोरदार जमिनीवर आपटलं.

म्हशीचा हा पराक्रम पाहून हा सिंह देखील आश्चर्यचकित झाला, आणि वेदनेने विव्हळत सुटला. मात्र ही म्हैस सिंहाचा चांगलाच धुरूळा करायच्या उद्देशाने आल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत असून, पुन्हा एकदा या म्हशीने सिंहाला जोरदार धडक दिल्याचे, व्हिडिओत पाहायला मिळत आहे. जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहाची या म्हशीने केलेली अवस्था पाहून नेटकरी, चांगलीच व्हिडिओची मजा घेताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या, तर तुम्ही दिवसभर हसत बसाल.

म्हशीने सिंहाची पळताभुई केल्याचा, हा व्हिडिओ animal videos या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ २०१९चा असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र हा व्हिडिओ पुन्हा एकदा ट्रेंडिंग झाला असून, नेटकऱ्यांनी या व्हिडिओची चांगलीच मजा घेतल्याचं दिसत आहे. या व्हिडिओला कमालीचे लाइक्स मिळाले असून, अनेकांनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.

         काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून, अनेक नेटकऱ्यांनी खूपच मजेशीर कमेंट केल्याचं पाहिला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स म्हणाले, सोये हुए शेर को मत जगा, नहीं तो हड्डी फसली एक हो जाएगी! दुसर्‍या एका युजर्सने म्हटलं आहे, विनाकारण एखाद्याला त्रास दिला तर, तुम्हाला तुमचा जीव वाचवणं देखील मुश्कील होऊन जाईल.

या व्हिडिओवर कमेंट करताना आणखी एका युजर्सने म्हटलं आहे, एकीचे बळ काय असते, हे आम्ही लहानपणी शिकलो. मात्र आज खऱ्या अर्थाने त्याचे प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळालं. फक्त एकच म्हैस मदतीला आली, तर सिंहाची ही अवस्था झाली. बऱ्याच म्हशी आल्या असत्या तर, सिंह जंगल सोडूनच गेला असता. माणूस अनेक वर्ष म्हैस सांभाळतो आहे, मात्र एकीचे बळ खूप मोठं असतं, हे तिच्याकडून अजूनही शिकला नाही. अशाही मजेशीर कमेंट युजर्सने केल्याचं पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा हंबरडा फोडणाऱ्या आजोबांचं एकाने नाही ऐकलं; उसाचा क्रेशर बुलडोजरने तोडून टाकला; डोळ्यातून पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल..

सेल्फी काढायला गेलेल्या सुंदर तरुणीचा चेहरामोहरा ऊंटाने टाकला बदलून; नक्की काय घडलंय? पहा व्हायरल व्हिडिओ..

घरकुलासाठी अर्ज केलाय? घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ‘अशी’ पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची नावे

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

पहा व्हायरल झालेला हा व्हिडिओ.

इतर पुरुषासोबत ‘से ‘क्स’ करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ‘ही’ धक्कादायक अट..

योगींच्या पोलिसांकडून दलित महिलांवर अत्याचार; ‘त्या’ ठिकाणी केली गुरां-ढोरासारखी मारहाण, व्हिडिओ व्हायरल..

Xiaomi चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.