IND vs SL: केएल राहुलचा व्हाईट बॉलमधून सुपडा साप; हार्दिकच्या नेतृत्वात भारतीय टीमचा बदलला चेहरा मोहरा..

0

IND vs SL: अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवत बीसीसीआयने (BCCI) आता आगामी काळासाठी संघ बांधणी वेगाने सुरू केली आहे. यासाठीच पहिले पाऊल श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी (India vs Sri Lanka series) निवडलेल्या संघापासून सुरुवात केली आहे. सीनियर आणि जूनियर असा भेदभाव न करता मेरिटवर अंतिम अकरामध्ये खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचं स्पष्ट केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडताना सिनियर खेळाडूंना एकप्रकारे इशारा देखील दिला आहे.

आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकसाठी (T20 World Cup) आत्तापासूनच संघ बांधणी करायला सुरुवात केली असून, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya T20 captain) नेतृत्वाखाली भारत आगामी टी-ट्वेंटी क्रिकेट खेळणार असल्याचं आता BCCI कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली (Virat kohli) केएल राहुल (KL Rahul) ऋषभ पंत (Rishabh pant) यासारख्या तगड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत आता याशिवाय आम्ही नवीन खेळाडूंसोबत जाणार असल्याचं देखील निवडलेल्या संघावरून स्पष्ट केलं आहे.

रोहित शर्माचा (Rohit Sharma) फॉर्म आणि फिटनेस, केल राहुलचा फॉर्म आणि अप्रोच, ऋषभ पंचचा फॉर्म या सगळ्यांचा विचार करून या तिघांनाही T20 क्रिकेट (T20 cricket) मधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आगामी T20 क्रिकेटसाठी विराट कोहलीचा (Virat kohli) विचार केला जाणार आहे. मात्र विराट आयपीएलमध्ये (IPL) कशी कामगिरी करतो, यावर सगळं काही अवलंबून असणार आहे. विराट कोहलीचा फॉर्म आणि फिटनेस लक्षात घेता, तो आणखीन एक दोन वर्ष T20 क्रिकेट देखील उत्तम खेळू शकतो. आणि म्हणूनच त्याला पूर्णपणे टी ट्वेंटीतून बाजूला केलं नाही. मात्र टी20 क्रिकेटमध्ये त्याला पर्याय खेळाडू तयार करायला सुरुवातही केली आहे.

रोहित शर्मानंतर उपकर्णधार असणाऱ्या राहुलला भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद देण्यात येईल, अशी शक्यता अनेकांना व्यक्त केली होती. मात्र त्याच्या खेळाचा अप्रोच आणि फॉर्म या गोष्टी विचारात घेऊन, हार्दिक पांड्याची आगामी T20 क्रिकेटसाठी भारतीय संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली. केएल राहुलची T20 क्रिकेट मधून हकालपट्टी करण्यात आली. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदावरून देखील राहुलला बाजूला करत BCCI ने इशारा दिला आहे.

2014 मध्ये केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण केलं. मात्र तेव्हापासून आतापर्यंत त्याने एकही महत्त्वाची इनिंग खेळली नसल्याने, त्याला आता साईडलाईन करायला BCCI ने सुरुवात केली आहे. या संदर्भात बीसीसीआयने पहिलं पाऊल श्रीलंके विरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडून उचललं आहे. केएल राहुलची T-20 संघातून हकालपट्टी केली. या शिवाय उपकर्णधार या पदावरून देखील हटवलं असल्याने आता केएल राहुलचा व्हाईट बॉल मधून सुपडा साप झाला आहे. कारण एकदिवसीय संघात श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन या सगळ्यांचा फॉर्म पाहता त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळणं खूप कठीण आहे.

एकदिसिय क्रिकेट संघाचे उपकर्णधार पद आता हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. 2023 मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंत रोहित शर्मा भारतीय एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल. त्यांनतर एकदिवसीय क्रिकेट संघाचे नेतृत्व हार्दिक पांद्याकडे देण्यात येणार आहे. T20 क्रिकेटचे उपकर्णधार आता सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे. सोबतच कसोटी संघाचे उपकर्णधार पद देखील चेतेश्वर पुजाराकडे देण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार आगामी काळात कसोटी संघाचा कर्णधार म्हणून ऋषभ पंतकडे पाहिलं जात आहे.

हे देखील वाचा India Squad SL Series: टी-ट्वेंटीत हार्दिकचे राज्य सुरू, विराट रोहित राहुल पंतला बाय बाय; हकालपट्टीचं कारण BCCI कडून स्पष्ट..

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

IND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

Salman Khan Sangeeta Bijlani: सलमान खानने एक्स गर्लफ्रेंडला सगळ्यांसमोर किस केल्याने सगळेच झाले अवाक्; पाहा व्हिडिओ..

Relationship Tips: संबंध करताना या गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.