Agneepath Scheme: अग्नीपथ योजनेअंतर्गत देशातील ‘या’ तरुणांना चार वर्ष करता येणार देशसेवा; 40 हजार पगारासह मिळणार अनेक सुविधा..

0

Agneepath Scheme: गेल्या अनेक वर्षांपासून सैन्य भरती रखडली असल्याने अनेक तरुणांनी वेळोवेळी संताप केल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय संरक्षण मंत्री (defence minister) राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांचे भाषण सुरू असताना उपस्थित तरुणांनी सैन्यभरती संदर्भात घोषणा देखील दिल्या होत्या. आता केंद्र सरकारने यासंदर्भात सकारात्मक पाऊल टाकल्याचे पाहायला मिळत आहे. तुमचं देखील सैन भरती होण्याचे स्वप्न असेल आणि देशसेवा करायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. भारतीय लष्कराने काल अग्निपथ योजनेची (Agneepath Yojana) घोषणा केली असून, या योजनेअंतर्गत देशातील जवानांना (Jawan) चार वर्ष देश सेवा करण्याची संधी मिळणार आहे. काय आहे ही योजना? या योजनेचा लाभ कसा मिळणार? या योजनेसाठी कोण-कोण अर्ज करू शकणार? या विषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.Second hand bike: जबरदस्त कंडिशन असणारी CB shine केवळ १८ हजारांत तर pulsar फक्त १५ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

काय आहे अग्निपथ योजना?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत काल अग्निपथ या योजनेची घोषणा करण्यात आली. यावेळी लष्कर दलाचे प्रमुख, तसेच हवाई दलाचे प्रमुख देखील उपस्थित होते. या योजनेअंतर्गत नोकरी बजावणाऱ्या तरुणांना अग्निविर म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील तरुणांची चार वर्षासाठी सैन्यात भरती केली जाणार आहे. अग्नीपथ योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही रेजिमेंटसाठी करू शकणार आहे. यासाठी तुम्हाला जात, धर्म, तसेच प्रदेश यासंदर्भात देखील माहिती देणे बंधनकारक नाही. second hand Hero Splendor Plus: दहा हजार किलोमीटर पळालेली hero-splendor-plus मिळतेय फक्त २१ हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

काय म्हणाले राजनाथ सिंह?

या योजनेची घोषणा करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, या योजनेमुळे येणाऱ्या काळात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांनी सेवा करत असताना आत्मसात केलेले कौशल्य, अनुभव विविध क्षेत्रांत नंतर रोजगार मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. भारतीय सशस्त्र दल हे देशाप्रमाणे तरुण असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे नक्कीच भारतीय सशस्त्र दलाला फायदा होणार आहे. अग्निपथ भरतीसाठी कोण-कोण पात्र असणार आहेत? तसेच या योजनेअंतर्गत तरुणांना पगाराबरोबरच कोणत्या सुविधा मिळतील? या विषयी सविस्तर माहिती घेऊ.

कोण कोण होऊ शकतं भरती?

अग्निपथ योजनेतील भरतीसाठी तरुणांचे वय १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे. भरती केल्यानंतर तरुणांना प्रशिक्षण कालावधीसोबतच एकूण 4 वर्षे सैन्य सेवेत काम करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय लष्कर आणि ठरवून दिलेल्या नियमानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

पगारासह या सुविधा दिल्या जाणार

या योजनेअंतर्गत सिलेक्ट झालेल्या जवानांना अग्निवीर म्हणून संबोधलं जाणार आहे. ४ वर्षानंतर अग्निविरांना सरकारने सेवानिवृत्त करणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. या योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुणांना पहिल्या वर्षी दरमहा 30 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. EPF/PPF च्या सुविधा पकडून भरती झालेल्या तरुणांना पहिल्या वर्षी 4.76 लाख रुपये पॅकेज असणार आहे. यानंतर चौथ्या वर्षापर्यंत हा पगार वाढून 40 हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. वार्षिक पॅकेजचा विचार करायचा झाल्यास 6.92 लाख रुपये अग्निवीरांच्या खात्यावर जमा होतील.

अग्निवीरांच्या वार्षिक पॅकेजबरोबरच अनेक भत्ते देखील मिळणार आहेत. ज्यामध्ये जोखीम तसेच त्रास, रेशन, ड्रेस, प्रवास भत्ता यांचा समावेश असणार आहे. सेवेदरम्यान काही घडल्यास आणि सेवा करण्यास असमर्थ असल्यास पूर्ण वेतन दिले जाणार आहे. अग्निवीरला पेन्शची सुविधा दिली जाणार नाही. मात्र चार वर्षानंतर सेवा संपल्यानंतर मात्र सेवा निधी म्हणून 11.7 लाख निधी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या ‘सेवा निधी’ला कोणत्याही प्रकारचा प्राप्तिकर आकारण्यात येणार नाही. याबरोबरच अग्निवीरांना 48 लाख रुपयांचा जीवन विमा देखील दिला जाणार आहे. याबरोबरच सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास सेवेत असणाऱ्या वर्षाचा पगार आणि एक कोटी रुपये त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे. MHA CEPI Recruitment 2022: गृह मंत्रालयात विविध पदांसाठी निघाली मेगा भरती! इच्छुक आणि पात्र उमेदवारांना असा करता येणार अर्ज..

प्रशिक्षणानंतर दिले जाणार प्रमाणपत्र

अग्नीपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या तरुणांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात तरुणांना विविध प्रशिक्षण प्रमाणपत्र दिली जाणार आहोत. यामध्ये कौशल्य प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शिस्त प्रमाणपत्र, शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र, नेतृत्वगुण प्रमाणपत्र, देशभक्तीचे प्रमाणपत्र, इत्यादी प्रमाणपत्रे तरुणांना या कार्यकाळात दिली जाणार आहेत. याबरोबरच अग्निवीरांना नागरी समाजात देखील समाविष्ट करण्यात येणार आहे. सहाजिकच त्याचा त्यांना भविष्यात जीवन जगण्यासाठी खूप मोठा फायदा होणार आहे. व्हायग्रा पुरुषांच्या लैंगिकतेवर असं करत काम; अतिसेवन झाल्यास होतात हे गंभीर दुष्परिणाम..

सेवा निधीमुळे आर्थिकदृष्ट्या तरुण होतील सक्षम

अग्नीपथ योजनेअंतर्गत चार वर्ष सेवा करण्याची संधी मिळणार आहे. मात्र चार वर्षानंतर या तरुणांनी कुठे जायचे? असा अनेकांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तरुणांना भविष्याच्या दृष्टीने सरकार 11 लाख 71 हजार रुपये सेवा निधी हा वीणा कर देत असल्याने, नवीन रोजगार करण्यासाठी त्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. या तरुणांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी देखील या निधीची मदत होणार आहे. याबरोबरच अग्निपथ योजनेअंतर्गत भरती करण्यात आलेल्या तरुणांपैकी २५ टक्के तरूणांना लष्कर सेवेत सामील करून घेतलं जाणार आहे.  शारीरिक संबंधांमध्ये अधिक अंतर पडल्यास, तुमच्या आरोग्यावर होतात हे सहा गंभीर परिणाम..

2023 मध्ये पहिली बॅच

अग्नीपथ योजनेची पहिली भरती ही पुढच्या तीन महिन्यांत सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अग्नीपथ योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी 2023 मध्ये येणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत फक्त गुंतवा 210 रुपये, आणि आयुष्यभर दरवर्षी मिळवा 60 हजार पेन्शन

What do Men Search the Most on Google: Google वर पुरूष सर्वाधिक सर्च करतात या गोष्टी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Xiaomi Battery Replacement Program: रेडमीने सुरु केला बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्राम; ग्राहकांना आता बॅटरी बदलून मिळणार केवळ..

MHA CEPI Recruitment 2022: गृह मंत्रालयात विविध पदांसाठी निघाली मेगा भरती! इच्छुक आणि पात्र उमेदवारांना असा करता येणार अर्ज..

Lifestyle: महिलांच्या या भागांवर केस असतील तर मानले जाते शुभ नवराही समजला जातो भाग्यवान..

Railway Jobs 2022: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! परिक्षेविना अशी केली जाणार निवड; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Flipkart End of Season Sale: Flipkart चा धूमधडाका! हे स्मार्टफोन खरेदी करता येणार निम्म्या किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.