Good news for onion farmers: ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी; जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार कांदा..
Good news for onion farmers: संकट शेतकऱ्यांसाठी नवीन विषय नाही. अनेक संकटांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. कधी नैसर्गिक संकटांना समोर जावे लागते, तर कधी बाजारभावाला सामोरे जावे लागते. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे (heavy rain) नाहीसा होतो. हे देखील शेतकऱ्यांसाठी नवीन नाही. निसर्गाच्या लहरीत शेतकरी सातत्याने भरकटला जातो. हे संकट कमी की काय म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला देखील चांगला भाव मिळत नाही, (Onion Rates) अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदार झाल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळते. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ( onion farmers) दिलासादायक बातमी समोर आली आहे.
गेल्या दोन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. अचानक होणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्याचबरोबर अचानक पडणाऱ्या धुक्यामुळे गेल्या दोन वर्षापासून कांद्यावर (onion) खूप मोठ्या प्रमाणात रोग (disease) पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. साहजिकच यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट झाली. (Income decreased) याशिवाय त्याच्या शेतमाला चांगला भाव देखील मिळाला नाही. (Agricultural produce did not get good price) मात्र आता ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे दर प्रचंड वाढणार असल्याचे व्यापारी आणि तज्ञांकडून सांगण्यात आले येत आहे. जाणून घेऊया सविस्तर. (In the month of October, onion prices are going to increase tremendously)
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना जास्त फायदा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आयुष्य एका जुगारा सारखं असतं, असं नेहमी बोललं जातं. इतर पिकांच्या तुलनेत कांद्यावर निसर्गाचा देखील अधिक कोप होतो. कांद्याला कधी दर मिळेल, हेही काही ठोसपणे सांगता येत नाही. कमी दर असताना व्यापारी कांदा साठवून ठेवतात. आणि मग दर आला की बाहेर काढतात. साहजिकच यामुळे शेतकऱ्याचा माल बाजारात कमी भावाने विकला जातो. आता पुन्हा एकदा ऑक्टोंबरमध्ये कांद्याचे भाव वाढणार असल्याचे चित्र आहे. मात्र याचा सगळ्यात जास्त फायदा शेतकऱ्यांना नाही, तर व्यापाऱ्यांना होणार असल्याचे देखील बोलले जात आहे. (Traders will benefit)
खरीप पूर्व लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे संपुष्टात आल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळत आहे. साहजिकच यामुळे डिसेंबर जानेवारी दरम्यान बाजारात येणारा कांदा खूप कमी प्रमाणात येणार असल्याचे बोलले जात आहे. कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून, कांद्याचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे देखील बोलले जात आहे. आणि त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. रब्बी हंगामाची लागवड सप्टेंबरमध्ये केली जाते. हा कांदा बाजारात डिसेंबर ते जानेवारी या कालखंडामध्ये येतो. मात्र अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने, शेतकरी कांदा लागवड करण्याला उशीर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या कारणामुळे महागणार कांदा
यावर्षी कर्नाटक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालं आहे. महाराष्ट्रा नंतर कर्नाटकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र यावर्षी अवकाळी पावसाने कर्नाटकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरतून घेतला. कर्नाटक मधील शेतकऱ्यांच्या कांदा उत्पन्नात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे यावर्षी कर्नाटक मधील कांदा मार्केटमध्ये यायला उशीर होण्याची शक्यता असल्याने कांदा ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये तेजीत राहणार असल्याचं बोललं जात आहे.
दर वाढले तरी शेतकऱ्यांना फायदा नाहीच
कांद्याचे दर वाढणार असले तरी देखील शेतकऱ्यांना वाढलेल्या कांद्याचा फायदा होणार नसल्याचे देखील चित्र आहे. अवकाळी पाऊस आणि वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्च आणि औषध फवारणी, खतांचा मारा या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक होणार असल्याने, कांद्याचे दर वाढले तरी या दर वाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याचं शेतकरी सांगतात.
किती वाढणार कांद्याचे दर
कांदा दरवाढीचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर फारसा फरक पडणार नसला, तरी कांदा नक्की किती वाढणार याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता असते. ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये कांद्याचे दर 40 ते 45 रुपयांपर्यंत जाणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांसह अनेक तज्ञांनी देखील वर्तवली आहे. गणेश उत्सवानंतर दिवाळी त्याच बरोबर दसरा या सणासुदीच्या कालखंडामध्ये दरवर्षी कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र कर्नाटकसह इतर काही राज्यांमधील कांद्याच्या उत्पन्नावर अतिवृष्टी आणि सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम झाला आहे. कांद्याच्या मागणीनुसार पुरवठा होणार नसल्याने कांद्याचे दर तीन महिने तेजीत राहणार असल्याचं बोलले जात आहेत.
हे देखील वाचा Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..
SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम