Face yoga benefits: तरुण चेहरा दिसण्यासाठी चेहऱ्याचाही करावा लागतो व्यायाम; जाणून घ्या चेहऱ्याचे दोन व्यायाम आणि फायदे..

0

Face yoga benefits: सौंदर्य खुलवण्यासाठी अनेकजण विविध सौंदर्य प्रसाधनांचा (Cosmetics) वापर करतात. मात्र तरी देखील त्यांना हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. विविध कंपन्यांच्या अनेक प्रॉडक्टचा वापर करून देखील चेहऱ्याच्या सौंदर्यात काही भर पडत नसल्याचा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. वास्तविक पाहता सौंदर्यप्रसाधनाचा वापर करून सुंदर आणि मुलायम त्वचेचं आपण नुकसानच करतो. निरोगी आहार (Healthy diet) त्याचबरोबर नियमितपणे व्यायाम (Exercise regularly) आणि आनंदी जीवनावर (On a happy life) आपले सौंदर्य (Your beauty) नेहमी अवलंबून असते. शहरातील प्रत्येक अवयवांसाठी विशेष व्यायाम असतो, तसेच चेहऱ्याच्या निरोगी सौंदर्यासाठी (Healthy beauty) देखील चेहऱ्याचा व्यायाम (Facial exercise) असतो. natural remedies for glowing skin

चेहऱ्याचा देखील व्यायाम असतो हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खर आहे. या संदर्भात अनेकांना माहिती देखील असेल, शरीरातील प्रत्येक भागाचा ज्या पद्धतीने व्यायाम केला जातो, त्याचप्रमाणे चेहरा नेहमी तरुण ठेवण्यासाठी देखील चेहऱ्याचा व्यायाम नियमितपणे केला जातो. चेहऱ्याचे सौंदर्य खुलून ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या आहारामध्ये अनेक उपयोगी गोष्टी ॲड करतात. मात्र डाइट (diet) बरोबरच तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर आणि तरुण (Beautiful and young) बनवायचा असेल तर चेहऱ्याचा योगा देखील करणे आवश्यक आहे. आज आपण अशाच दोन चेहऱ्याच्या योगासना विषयी जाणून घेणार आहोत. ज्याचे फायदे वाचून देखील तुम्हाला धक्का बसू शकतो. importance of face yoga

चेहऱ्याचा योगा करण्याचे फायदे

जर तुम्ही नियमितपणे व्यायाम आणि निरोगी आहार घेत नसाल, तर तुम्हाला लठ्ठपणाला सामोरे जावे लागते. हा लठ्ठपणा फक्त शरिरासाठीच मर्यादित राहत नाही, तर तुमचा चेहरा देखील सुजलेला दिसतो. चेहऱ्यावर चरबी जमा होत असते. साहजिकच यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य चरबीमध्ये गुंडाळलं जातं. चेहरा तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी तुम्हाला चेहऱ्याचा योगा नियमितपणे करणं फार आवश्यक आहे. चेहऱ्याचा योगा केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलून तुमचा चेहरा तरुण दिसू लागतो. जर तुम्ही नियमितपणे फेस योगा केला, तर चेहऱ्याच्या त्वचावरील रक्ताभिसरणाचे प्रमाण देखील वाढले जाते. आणि चमक यायला सुरुवात होते. आता आपण चेहऱ्याच्या योगा विषयी सविस्तर जाणून घेऊ.

फिश फेस पोझ 

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी आणि चेहरा नेहमी तरूण ठेवण्यासाठी ‘फिश फेस पोझ’ हा योगा खूप उपयुक्त ठरतो. अनेकांना हा योगा करण्याची पद्धत माहिती नसेल, तर आम्ही या संदर्भात देखील सविस्तर माहिती देत आहोत. ‘फिश फेस पोझ’ योगा करण्यासाठी तुम्हाला तुमचे ओठ त्याचबरोबर गाल आत मध्ये ओढून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओठ आणि गाल आतमध्ये ओढून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर, तुमच्या ओठाचा फक्त काही भाग पाहायला मिळेल. आणि तुमच्या गालावर अढी देखील पडेल. ही क्रिया तुम्हाला 15 ते 20 सेकंद करायची आहे. हा व्यायाम तुम्ही वारंवार देखील करू शकता. यामुळे तुमच्या गालाचे त्याचबरोबर ओठांचे स्नायू देखील मजबूत होण्यास मदत होते आणि गालावरील चरबी कमी होते.

माऊथ वॉश पोझ 

माऊथ वॉश पोझ हा व्यायाम देखील चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. माऊथ वॉश पोझ हा चेहऱ्याचा व्यायाम नियमित केल्याने, तुमच्या हनुवटीच्या खालचा भाग त्याचबरोबर गालाची चरबी देखील नाहीशी होते. जर तुम्हाला चेहऱ्याचा हा व्यायाम कसा करायचा हे माहीत नसेल, तर आम्ही याविषयी देखील सविस्तर देत आहोत. पाण्याची आपण तोंडामध्ये ज्याप्रमाणे चूळ भरतो, त्याप्रमाणे तुमचे गाल हवेच्या माध्यमातून फुगवायचे आहेत. तोंडात पाणी घेऊन आपण ज्या पद्धतीने चूळ भरतो, त्याच पद्धतीने आपले गाल जोर जोरात हलवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा व्यायाम तुम्ही पंधरा ते वीस सेकंद सुरू ठेवायचा आहे. सेम प्रोसेस तुम्ही पाच ते सहा वेळा नियमितपणे करणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा Navratri vrat: नवरात्रीत उपवासाला भगर खात असाल तर पहिल्यांदा ही बातमी वाचा; भगरी विषयी जाणून घ्या या गोष्टी अन्यथा.. 

Lifestyle: विसाव्या वर्षात चुकूनही करू नका हे काम; अन्यथा आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार..

Women Psychology: सेक्स करताना महिलांच्या डोक्यात सुरू असतो हा अजब विचार; जाणून उडतील होश..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Ways To Impress A Girl: या पुरुषांना मिळवण्यासाठी महिला कोणाचीही पर्वा न करता वाट्टेल ते करतात; जाणून तुम्हालाही येईल चक्कर..

Flipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Mahindra Thar: महिन्यांत तब्बल ५ हजाराहून अधिक विक्री; का एवढी लोकप्रिय झालीय थार? जाणून घ्या, किंमत,वैशिष्ट्ये, आणि बरंच काही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.