Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..

0

Extra Marital Affairs: लग्न (marriage) हे खूप पवित्र नातं असून, माणसाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येकाला आपला वैवाहिक जोडीदार (Spouse) सुंदर आणि प्रेमळ (beautiful and lovely) असावा असं वाटत असतं. मुलगी असो किंवा मुलगा दोघांनाही आपल्या वैवाहिक जोडीदार सुंदर प्रेमळ, आपल्याला समजून घेणारा असावा, असं वाटत असतं. याविषयी अधिक सांगण्याची गरज नाही. लग्न हे प्रेमाचं विश्वासाचं आणि एकनिष्ठतेचं नातं असतं. (Marriage is a relationship of love, trust and loyalty) लग्न झाल्यानंतर दोघेही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. लग्न या सुंदर कल्पनेत दोघे अडकल्यानंतर, साहजिकच एकमेकांच्या विश्वासाला, प्रेमाला आणि निष्ठेला तडा जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. मात्र लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडपं एकमेकांप्रती एकनिष्ठ राहीलच असं अजिबात होत नाही.

प्रत्येक नात्यांमध्ये वाद-विवाद भांडणे होत असतात. मात्र काही नात्यांमध्ये इतका दुरावा निर्माण होतो, की आपला वैवाहिक जोडीदार आपल्या पार्टनरला फसवत विवाहबाह्य संबंध देखील ठेवतो. या विषयी देखील अधिक सांगण्याची गरज नाही. मात्र आपल्या वैवाहिक जोडीदारावर विवाहबाह्य संबंध ठेवण्याची वेळ का येते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कोणत्या कारणांमुळे आपला जोडीदार विवाहबाह्य संबंध ठेवतो? जाणून घेऊया सविस्तर.

भावनिक संबंध

विवाहबाह्य संबंध हे नवीन विषय नाही. आपल्या आसपास देखील अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आता तर सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंध गुन्हा होऊ शकत नाही, असा निर्णय देत, या संदर्भातले कलम 497 रद्द देखील केले. मात्र विवाहबाह्य संबंध नक्की का ठेवले जातात. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे अनेक कारणे आहेत. जोडीदाराने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे, ही समस्या उद्भवते.

भावनिक संबंधामुळे देखील आपला पार्टनर आपल्याला फसवून इतर पुरुषासोबत संबंध ठेवतो. हा प्रकार खास करून ऑफिसमध्ये पाहायला मिळतो. आपली पत्नी एखाद्या ऑफिसमध्ये कामाला असेल, तर ऑफिसमधील एखाद्या पुरुषासोबत भावनिक नातं निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. साहजिकच यामुळे नकळत आपला जोडीदार या भावनिक नात्यात गुरफटला जातो. आणि मग नंतर भावनिकतेतून विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात.

रोमँटिक अफेअर्स 

विवाहबाह्य संबंधांमध्ये रोमँटिक अफेअर हा प्रकार देखील पाहायला मिळतो. हा प्रकार जास्त करून लग्नापूर्वी एखाद्या महिलेचं अफेअर असेल, तर अर्थात ती आपलं पूर्वीच प्रेम पूर्णपणे विसरली आहे की नाही, यावर अवलंबून असते. लग्नापूर्वीच्या अनेक सुंदर आठवणी लग्नानंतर देखील ती गिरवत असेल तर, किंवा आपलं पहिलं प्रेम पूर्णपणे विसरू शकली नसेल, तर विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची शक्यता असते. लग्नापूर्वी तिच्या पद्धतीने तीने आपले नातेसंबंध जोपासलेले असतात. त्याच पद्धतीने लग्नानंतर जर रोमँटिक वातावरणाची निर्मिती झाली नाही तर विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता कमी असते.

एक नाईट स्टँड

विवाहबाह्य संबंधांमध्ये हा देखील प्रकार पाहायला मिळतो. अशा प्रकरणांमध्ये जोडीदार भावनिकरीत्या जोडला जात नाही. मात्र आपल्या वैवाहिक जीवनातील निराशा दूर करण्यासाठी तो काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतो. अशात विवाहबाह्य संबंध देखील ठेवण्यासाठी पुढे सरकतो. अशी देखील माहिती सर्वेतून समोर आली आहे. या प्रकारात तो विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत अजिबात अटॅचमेंट नसल्याचं देखील पाहायला मिळते.

बदला घेण्यासाठी

विवाह बाह्य संबंध ठेवण्यासंदर्भातला हा प्रकार खूप धोकादायक समजला जातो. हा प्रकार अशा लोकांबरोबर घडतो, जो कोणताही विचार न करता आपलं पूर्वीचं नातं विसरण्यासाठी लग्न करतो. अशा महिला वैवाहिक जीवनाला गांभीर्याने घेत नाहीत. नेहमी आपल्या सोबत घडलेल्या गोष्टींचा बदला घेण्याचा ते प्रयत्न करतात. साहजिकच यामुळे हा प्रकार खूप धोकादायक समजला जातो. लग्नापूर्वी रिलेशनमध्ये जर त्यांच्यासोबत काही धोका झाला असेल, तर अशा व्यक्ती लग्नानंतर देखील पुरुषांचा बदला घेण्याच्या मनस्थितीत असतात.

सेक्‍स एडिक्‍ट अफेयर

विवाहबाह्य संबंधामधील हा प्रकार देखील खूप धोकादायक समजला जातो. हा प्रकार बेसिकली सेक्स एडिक्‍ट लोकांसोबत सर्वाधिक घडताना पाहायला मिळतो. ज्या लोकांना सेक्सचे व्यसन जडलेले असते, अशा लोकांना आपल्या वैवाहिक जोडीदाराची फसवण करणं अवघड वाटत नाही. आपल्या पाठीमागे ते सहज फसवून करून विवाहबाह्य संबंध ठेवण्यास तयार होतात. वैवाहिक जीवनामध्ये अशी मंडळी जर आनंदी नसतील, तर ते विवाहबाह्य संबंध ठेवताना मागे पुढे पाहत नाहीत. एवढेच नाही, तर आपल्या जोडीदाराची ती जाणून बुजून फसवणूक देखील करतात.

एग्जिट स्‍टरेटजी अफेयर

एखाद्या व्यक्तीला जर वैवाहिक जीवनातून बाहेर पडायचं असेल, तरीदेखील आपल्या रणनीतीनुसार या व्यक्ती विवाहबाह्य संबंध ठेवतात. जेणेकरून आपल्या विवाहबाह्य नात्यासंबंधाविषयी माहिती मिळावी. वैवाहिक जीवनामध्ये आनंदी नसलेल्या व्यक्तींबरोबर हा प्रकार सातत्याने पाहायला मिळतो. वैवाहिक संबंध तोडण्याच्या भावनेनेच महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात.

लव एडिक्‍ट अफेयर 

विवाहबाह्य संबंधांमध्ये लव एडिक्‍ट अफेयर हा देखील प्रकार पाहायला मिळतो. अशा व्यक्तींना आपल्याला नेहमी प्रेमाची वागणूक मिळायला हवी, असं वाटत असतं. अशा व्यक्ती खूप ‘पझेसिव्ह’ असतात. कुणीतरी आपली सातत्याने काळजी करत राहावं, असं त्यांना वाटत असतं. आपल्यासोबत वारंवार गप्पा मारत राहावं, असं वाटत असतं. जीवनात त्यांना त्यांच्या पद्धतीनुसार वागणूक किंवा प्रेम मिळालं नाही, तर अशा व्यक्ती विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी पुढे कशाचाही विचार करत नाहीत.

हे देखील वाचा Face yoga benefits: तरुण चेहरा दिसण्यासाठी चेहऱ्याचाही करावा लागतो व्यायाम; जाणून घ्या चेहऱ्याचे दोन व्यायाम आणि फायदे..

Navratri vrat: नवरात्रीत उपवासाला भगर खात असाल तर पहिल्यांदा ही बातमी वाचा; भगरी विषयी जाणून घ्या या गोष्टी अन्यथा.. 

Lifestyle: विसाव्या वर्षात चुकूनही करू नका हे काम; अन्यथा आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार..

Women Psychology: सेक्स करताना महिलांच्या डोक्यात सुरू असतो हा अजब विचार; जाणून उडतील होश..

Ways To Impress A Girl: या पुरुषांना मिळवण्यासाठी महिला कोणाचीही पर्वा न करता वाट्टेल ते करतात; जाणून तुम्हालाही येईल चक्कर..

Flipkart Jobs: फ्लिपकार्टमध्ये निघाली मेगा भरती! या पद्धतीने करता येणार वर्क फ्रॉम होम; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Extra Marital Affair: पती किंवा पत्नी दुसऱ्यासोबत रंगेहाथ पकडली तर कायदा काय सांगतो? जाणून सरकेल पायाखालची जमीन..

Amazon flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offers’s चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

Maruti Suzuki Jimny: महिंद्रा थारचा Maruti Suzuki Jimmy ने उठवला बाजार; जाणून घ्या या कारची वैशिष्ट्य फीचर आणि किंमत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.