Apple Side Effects: सफरचंद खाण्याची योग्य वेळ माहिती आहे? या वेळेत सफरचंद खाल्ल्यास येऊ शकतो हृदयविकाराचा झटका..
Apple Side Effects: सफरचंदाचे (Apple) फळांमध्ये एक वेगळे महत्व आहे. ईतर फळांच्या तुलनेते थोडे महाग असणारे सफरचंद आरोग्यासाठी प्रचंड लाभकारी आहेत. त्यामुळे बर्याचदा आपण बघतो की दवाखान्यात एखाद्या रुग्णांस भेटायला जातांना फळांमध्ये सफरचंद सोबत नेले जातात. बर्याचदा ऊपवास केला असल्यास फळांचा आहार घेतला जातो. ज्यामध्ये सुद्धा सफरचंदांचा समावेश सर्वाधिक असतो. यामागील कारण असे आहे की सफरचंदांना शक्तीवर्धक मानले जाते. शरीरात कमजोरी जाणवत असल्यास किंवा अशक्त वाटत असल्यास सफरचंदाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. सफरचंदामधील घटक शरीरातील कमजोरी किंवा अशक्तपणा नाहीसा करते. (Side effects of apple in your body)
सफरचंदाचे आरोग्याच्या दृष्टीने पुष्कळ फायदे असले तरि सफरचंद खाण्याच्या काही वेळा आहेत. काही अभ्यासकांच्या मते योग्य वेळी सफरचंदाचे सेवन केल्यास ते अधिक लाभकारी आहे. याऊलट काही वेळा अशा सुद्धा असतात, ज्यावेळी सफरचंद खाणे तुमच्यासाठी धोक्याचे सुद्धा ठरु शकते. परंतू नेमक्या अशा कुठल्या वेळा आहेत, ज्यावेळी सफरचंद खाल्ले पाहिजे किंवा त्यावेळी न खाल्ल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात. सफरचंदांच्या फायद्यासोबतच या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत.
कॉलेस्ट्रॉल कमी करते
कॉलेस्ट्रॉल वाढणे हे थेट जिवावर बेतु शकते. ज्याच्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. त्यांस हार्ट अटॅक येण्याची शक्यता सर्वाधिक असते. कॉलेस्ट्रॉलमुळे हृदयास रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयाशी संबंधित विकार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रीत ठेवण्यासाठी औषधं सुद्धा घेतली जातात. या औषधांसोबतच सफरचंदाचे सेवन केल्यास शरीरातील कॉलेस्ट्रॉलची मात्रा कमी होण्यास मदत होते. रोज एक सफरचंद खाणे सुद्धा याकरिता पुरेसे ठरते.
गॅस-बद्धकोष्ठतेपासून आराम
अनेकांना गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या असते. पचनक्रिया बिघडली असल्यामुळे तसेच आहारामध्ये संतुलन न ठेवल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या जडतात. बद्धकोष्ठतेमुळे तुम्हाला ईतरही विकार होण्याची शक्यता बळावते. यासोबतच गॅसमुळे आपण कायम दडपणात असतो. सफरचंद गॅस व बद्धकोष्ठतेवर प्रभावी आहे. सफरचंदामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळु शकतो. बद्धकोष्ठता अथवा गॅसचा त्रास असल्यास नियमित एक सफरचंद खाल्ल्यास सुद्धा आराम मिळु शकतो.
मधुमेहावर आहे प्रभावी
सफरचंद हे चविस गोड असतात. त्यामुळे मधुमेहावर सफरचंद कसे काय प्रभावी असु शकतात असा प्रश्न तुम्हाला पडु शकतो. मात्र सफरचंदातले काही घटक मधुमेहावर प्रभावी आहे. सफरचंदामधील पेक्टिन हा घटक महत्वाचा मानला जातो. पेक्टिनमुळे पित्ताचा त्रास सुद्धा होत नाही. यासोबतच ते शरीरात ईन्सुलीनचे काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी सफरचंद खाणे फायदेशीर आहे.
एनीमियापासून बचाव, दमासाठी सुद्धा प्रभावी
सफरचंदामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. त्यामुळे रोजही काहीप्रमाणात सफरचंदाचे सेवन करण्यास हरकत नाही. सफरचंदामध्ये लोहाचे मुबलक प्रमाण असते. यासोबतच शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत करण्याचे कामदेखील संफरचंदामधील काही घटक करतात. त्यामुळे सफरचंद ऍनिमियापासून आपले रक्षण करते. लोह शरीराला शक्ती प्रदान करते. सफरचंद दमाच्या रुग्णांसाठी सुद्धा खुप फायदेशीर आहे. दमाच्या रुग्णांनी सुद्धा सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. यामुळे दमाचा झटका येण्याची शक्यता नाहीशी होते.
कधी खावे सफरचंद
सफरचंद काही ठरसविक वेळेदरम्यान खाल्ल्यास शरीराला त्याचा प्रचंड लाभ मिळु शकतो. काही अभ्यासकांच्या मते त्याचवेळी सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. याऊलट अवेळी सफरचंद खाल्ल्यास ते अपायकारी सुद्धा ठरु शकते. संफरचंदातले काही घटक हे अवेळी खाल्ल्यास नुकसानदायक ठरु शकते. त्यामुळे नेमके कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात सफरचंद खाल्ले पाहिजे, जेणेकरुन आरोग्य सुदृढ ठेवण्यात त्याचा ऊपयोग होईल. याबद्दल तज्ज्ञांनी काही सल्ले दिले आहेत, ज्याबद्दल आपण येथे जाणुन घेणार आहोत.
दुपारच्या जेवनानंतर किमान १ ते २ तासांनी सफरचंद खाल्ले पाहिजे. जेवनानंतर लगेच सफरचंद खाऊ नये, त्याऐवजी १ ते २ तासांनी खाल्ल्यास ते शरीरासाठी फायदेशीर ठरते. रिकाम्या पोटी कधीच सफरचंद खाऊ नये असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास ते अपायकारक ठरु शकते. खुप वेळपासून चिरुन ठेवलेल्या सफरचंद फोडी खाणे सुद्धा अपायकारी ठरु शकते. सफरचंदांच्या फोडी बर्याचवेळापासून चिरुन ठेवल्यास त्यावर हवेतील जिवजंतु बसु शकतात. त्यामुळे पुष्कळ वेळेपासून चिरुन ठेवलेल्या फोडी खाणे सहसा टाळले पाहिजे. सफरचंदामध्ये फायबरचे प्रमाण पुष्कळ असते. फायबर जास्तप्रमाणात शरीरात गेल्यास पचन्यास जड जाते. फायबर रात्रीच्यावेळी सहसा पचत नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते रात्रीच्यावेळी सफरचंद खाणे टाळावे. अन्यथा अपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास..
अनेकांना सवय असते उठल्यानंतर रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याची. अनेकांचा असाही समज आहे सकाळी नाश्त्याला सफरचंद खाल्ल्याने वजनावर नियंत्रण राखता येते. कोणतेही धरणा सबसे चुकीची असून यामुळे तुम्ही हृदयविकारासारख्या भयानक आजाराला निमंत्रण देत आहात याची तुम्हाला कल्पना देखील नाही. होय रिकाम्या पोटी सफरचंद कधीही खाऊ नये असा सल्ला तज्ञ देतात सफरचंदामध्ये खूप मोठ्या प्रमाणे ग्लुकोज त्याचबरोबर फ्रुक्टोज हे घटक खूप मोठ्या प्रमाणात असतात. ग्लुकोज हे आपल्या रक्तामध्ये मिसळून देखील जाते. मात्र फ्रुक्टोज हे असं घटक आहे, जे खूप काळ आपल्या शरीरामध्ये साचून राहिल्यास ट्रायग्लिसेराइड यासारखी चरबी मोठ्या प्रमाणात साचते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा weight loss without exercise: या 6 भाज्यांचा आहारात करा समावेश; व्यायाम न करता महिन्यांत उतरेल तब्बल इतके किलो वजन..
Pashu Adhar Card: आता जनावरांचे आधार कार्ड बनवणे अनिवार्य, केंद्र नोंदणीकृत जनावरांसाठी देणार he लाभ
Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम