wheat chapati side effects: गव्हाची चपाती खात असाल तर त्वरीत करा बंद; चपाती खाण्याचे हे आहेत दुष्परिणाम..
wheat chapati side effects: पूर्वी जेवणामध्ये मोठ्याप्रमाणात ज्वारीच्या भाकरीचा (bhakri) ऊपयोग केला जायचा. आपले आजी-आजोबा आपल्याला नेहमी सांगतात की बर्याचदा आमच्यावर ठेचा भाकरी खाण्याची वेळ आलीय. पूर्वी नाश्तामध्ये सुद्धा दुधासोबत (milk)भाकरी कुचकरुन खाल्ली जायची. बहुतांश कुटुंबे शेतीवरच ऊदरनिर्वाह करत असल्यामुळे शेतातल्याच ज्वारीचा ऊपयोग ते करत असत. परंतू जेवणातल्या ज्वारीची जागा कधी गव्हाच्या पिठाच्या चपातीने (chapati) घेतली हे कुणाला कळले सुद्धा नाही. आता रोजच्या जेवणात गव्हाच्या पिठाची चपाती आपण खातो. याऊलट एखाद्यावेळेला स्पेशल मेनु म्हणून ज्वारीची भाकरी करतो.
आज गव्हाच्या पिठाच्या चपातीला फार महत्व आले आहे. रोजच्या जेवणात वरण-भात,(dal rice)भाजी आणि चपाती (dal rice and chapati) यांचा समावेश असतो. बर्याचदा जोराची भूक लागली आणि भाजी आवडत नाही किंवा भाजी शिल्लकच नाही अशावेळी फळांचा जाम किंवा लोंचासोबत चपाती खाऊन भूक भागवली जाते. गव्हाच्या पिठापासून बनणार्या चपातीस अचानक ऐवढे महत्व का प्राप्त झाले? हा एक वेगळा विषय आहे. मात्र तुम्ही रोजच्या जेवणात खात असणारी चपाती खरोखर तुमच्यासाठी व तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे किंवा नुकसानदायी आहे. याचा विचार तुम्ही कधी केलाय का? आम्ही याठिकाणी तुम्हाला याचीच माहिती देणार आहोत.
शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही घटक फार महत्वाचे असतात. यामध्ये व्हिटामीन्स, मिरनर्ल्स, फॅटी ऍसीड, कार्ब्स हे शरीराला निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका निभावत असतात. हे सर्व घटक आहाराच्या सहाय्याने आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे निरोगी शरीर ठेवण्यासाठी सर्वप्रथम योग्य आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आपण घेत असलेल्या आहारामधून खरोखरच शरीराला आवश्यक असणार्या सर्व घटकांची पूर्तता होते का? हे जाणुन घेणे महत्वाचे ठरते. त्यामुळे गव्हाची चपाती खरेच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. गव्हाच्या पिठाची चपाती शरीरासाठी बिल्कुलच ऊपयोगाची नाही असे म्हणने सुद्धा योग्य ठरणार नाही. मात्र त्याऐवजी ज्वारीच्या पिठाच्या भाकरीचा समावेश यात केल्यास ते अधिक फायदेशीर ठरु शकते.
हाडांचा त्रास असल्यास टाळा चपाती
वाढत्या वयानुसार हाडांची झीज होते. त्यामुळे बहुतांश वृद्धांना गुडघे दुखण्याचा त्रास असल्याचे आपण बघतो. तसेच हाडांची झीज झाल्यामुळे शरीरातील विविध भागांत दुखायला लागतं. हाडांचा त्रास असणार्यांसाठी गव्हाच्या पिठाची चपाती काहीही ऊपयोगाची नाही. हाडांना आवश्यक असणारे सर्व घटक हे भाकरीमध्ये असतात. हाडे मजबुत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस या घटकांची आवश्यकता असते. ज्यांचा भाकरीमध्ये समावेश असतो. मात्र गव्हाच्या पिठापासून बनणार्या चपातीत या घटकांचा समावेश नसतो. त्यामुळे हाडाचा त्रास असणार्यांनी तसेच वयोवृद्धांनी सुद्धा चपातीपासून थोडे लांब राहत त्यास पर्याय म्हणून भाकरीचा समावेश आपल्या दैनंदिन आहारात करायला हवा, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
पचनक्रियेवर परिणाम
आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी पचनक्रिया सुरळीत ठेवणे फार गरजेचे आहे. पचनक्रिया बिघडल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर दिसायला लागतो. पचनक्रिया बिघडल्यास पोटासंबंधीत विविध आजार जडण्याची शक्यता सर्वाधिक असते. तसेच बद्धकोष्ठता वगैरे सुद्धा होऊ शकते. गव्हाच्या चपातीत ग्लुटनची मात्रा अधिक असल्यामुळे बर्याचदा चपाती पचायला जड जाते. अन्न पचवण्यासाठी आवश्यक असणार्या ऍसीडवर सुद्धा ग्लुटनचा परिणाम होतो. ज्यामुळे सुरळीत सुरु असलेल्या पचनक्रियेवर थेट परिणाम होतो. याऊलट भाकरी पचायला हलकी असते. त्यामुळे चपातीला पर्याय म्हणून भाकरीचा ऊपयोग आहारात करण्याचा सल्ला अनेकदा डॉक्टरांकडून दिला जातो.
चपाती ऐवजी भाकरी शरीरासाठी ऊपयुक्त
चपाती आता आपल्या रोजच्या जेवनातला एक महत्वाचा भाग बनली आहे. परंतू चपातीऐवजी ज्वारीची भाकरी शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात येते. आपल्या शरीरावर आहाराचे ज्याप्रमाणे चांगले परिणाम होतात, त्याचप्रमाणे काही दुष्परिणाम सुद्धा होतात. अनेकदा अतिशय सुक्ष्म परिणाम शरीरात होत असल्याने आपल्याला ते जाणवत नाही. चपातीचे असेच सुक्ष्म परिणाम असतात. त्यामुळेच चपातीला योग्य पर्याय हा भाकरी आहे.
अनेक सुक्ष्म वाटणार्या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी भाकरी ऊपयोगी असते. पचनक्रिया सुरळीत ठेवणे, वजन वाढण्यावर प्रतिबंध आणने, पोट फुगणे यांच्यावर भाकरी अतिशय योग्य पर्याय आहे. मधुमेहांच्या रुग्णांसाठीदेखील गव्हाच्या पिठाची चपाती धोकादायक ठरु शकते. भाकरीच्या तुलनेत चपातीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना सुद्धा चपातीला, भाकरी पर्याय लाभदायी ठरु शकतो.
हे देखील वाचाFirst love also remember: या कारणांमुळे पहिलं प्रेम राहतं कायम लक्षात; ब्रेकअप झाल्यानंतर होतो भयंकर त्रास..
Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..
NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम