Teeth Whitening: हे चार घरगुती उपाय केल्यास पिवळसर दात होतात पांढरे शुभ्र..
Teeth Whitening: चेहऱ्याच्या सौंदर्यात (beauty of the face) भर घालण्यात दातांचा teeth) देखील मोठा वाटा आहे, हे तुम्ही देखील मान्य कराल. आपले पांढरे शुभ्र white (teeth) दात आपल्या सौंदर्यात अधिक भर घालतात. मात्र हेच दात जर पिवळसर असतील, तर सुदंर चेहरा विद्रूप दिसू लागतो. पिवळसर दातांमुळे फक्त सुंदर चेहऱ्याचे सौंदर्यच गायब होते असं नाही, तर पिवळसर दातांमुळे आपण आपल्या कॉन्फिडन्स देखील गमावत असतो. दररोज ब्रश करून देखील जर तुमचे दात पिवळसर असतील, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. पिवळसर दाताला तुम्ही घरगुती चार उपाय करून चमकदार आणि पांढरे शुभ्र बनवू शकता, जाणून घेऊया सविस्तर.
बाजारात विविध कंपनीच्या अनेक टूथपेस्ट आहेत, ज्या दात सुंदर आणि चमकदार करण्याचा दावा देखील करतात. मात्र वर्षानुवर्ष या टूथपेस्ट वापरून देखील आपल्या दातावर काहीही परिणाम होत नाही, हे जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा आपण हैराण होतो. अनेक कंपनीच्या महागड्या टूथपेस्ट वापरूनही आपल्या दातावर काहीच परिणाम पडत नाही. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? पिवळसर दात पांढरे शुभ्र करण्यासाठी किंवा दाताच्या निरोगी आरोग्यासाठी तुमच्या शरीरामध्ये ‘विटामिन सी’ युक्त पदार्थांचा समावेश असणं आवश्यक असतं. तेव्हाच तुमचे दाट पांढरे आणि चमकदार होतात, हे तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे.
तोंडातून येणारी दुर्गंधी आणि दाताचा पिवळसरपणा नष्ट करून चमकदार दात बनवण्यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय करावे लागणार आहेत. दाताचा सौंदर्याशी थेट संबंध तर आहेच, मात्र दाताचा आपला कॉन्फिडन्स बरोबर देखील संबंध आहे. याचा अनुभव तुम्हाला देखील आला असेल. जर आपले दात पिवळसर असतील, आणि तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर समोरच्याशी बोलताना आपण कॉन्फिडन्सने बोलू शकत नाही. आणि म्हणून दाताची निगा राखणं फार आवश्यक आहे. आता आपण कोणत्या चार घरगुती उपायांनी त्याचा पिवळसरपणा आणि दुर्गंधी मुळासकट नष्ट करू शकतो जाणून घेऊया सविस्तर
स्ट्रॉबेरी: स्ट्रॉबेरी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते. हे तुम्हाला माहिती देखील असेल. स्ट्रॉबेरी या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट त्याचबरोबर विटामिन सी ही जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळतात. स्ट्रॉबेरीचं नियमित सेवन केल्याने दाताचा पिवळसर पणा दूर होण्यास मदत होते. स्ट्रॉबेरीचे नियमित सेवन केल्यास पंधरा ते वीस दिवसांत तुमचे दात पांढरे शुभ्र पडू शकतात.
सफरचंद व्हिनेगर: सफरचंद हे आरोग्यासाठी किती उपयुक्त आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सफरचंद व्हिनेगर तुम्ही एका कपाच्या पाण्यात टाका. व्हिनेगर कपात टाकून ब्रशच्या मदतीने तुम्ही दात व्यवस्थित घासून घेतल्यानंतर तुमचे पिवळसर दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होते. त्याचबरोबर तोंडातून येणारी दुर्गंधी देखील कायमची दूर होते. दाताच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे घटक या फळांमधून मिळत असल्याने हा परिणाम होतो.
संत्री: संत्री देखील निरोगी आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. संत्रीच्या सेवनाने तुमच्या केसाचे त्याच बरोबर त्वचेचे देखील सौंदर्य खुलते. त्याचप्रमाणे संत्रीमुळे आपल्या दाताचे निरोगी आरोग्य देखील सुधारते. संत्र्याच्या नियमित सेवनाने संत्र्यामध्ये असणारा विटामिन सी हा घटक आपल्या शरीरात अनेक बदल घडवतो. पिवळसर असणारे दात संत्र्याच्या नियमित सेवनामुळे त्याचबरोबर संत्र्याची साल जर तुम्ही दाताला व्यवस्थित घासली, तर ठराविक दिवसानंतर दाताला चमक येते.
खोबरेल तेल: नारळाच्या पाण्याबरोबरच खोबरेल तेल देखील खूप उपयुक्त मानले जाते. नारळाच्या पाण्याप्रमाणेच खोबरेल तेलाचा देखील आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार खूप मोठा फायदा असल्याचे सांगितले आहे. खोबरेल तेल जर तुम्ही तोंडात घेऊन पाच मिनिटे गार्गल केले, तर तुमचे पिवळसर दात पांढरे शुभ्र होण्यास मदत होते. तर तुम्ही चार ते पाच वेळा हा उपाय नियमित केला, तर तुमचे पिवळसर दात आणि तोंडातून येणारी दुर्गंधी मुळासकट दूर होते.
हे देखील वाचा Health Tips: डेंग्यूचा डास फक्त याच लोकांना चावतो; डेंगू पासून दुर राहायचं असेल तर करा हे काम..
Health Tips: हे चार घरगुती उपाय केल्यास मानेवरचा काळसरपणा क्षणात होता दूर..
Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..
Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे सात गंभीर परिणाम..
Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..
Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..
Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.