USSD Code: ‘हा’ कोड वापरून मोबाईल नंबर ट्रॅक झाला आहे, की नाही हे चेक करा; हरवलेला मोबाइल देखील करू शकता ट्रॅक..
USSD Code: तत्रज्ञानच्या (technology) जमान्यात कशाचाही शोध लागू शकतो. हे अनेकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या असल्या, तरी तंत्रज्ञान धोकादायक देखील तेवढंच आहे. तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या असल्या, तरी त्याचा धोका देखील आहे. तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे (technology and internet) अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या असल्या तरी, तंत्रज्ञानाविषयी अधिक गंभीर देखील होण्याची आवश्यकता आहे. बाजारात असे अनेक ॲप उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही मोबाइल नंबर ट्रॅक (mobile number track) करू शकता. आणि म्हणून आम्ही तुम्हीला या विषयी अधिक जागरूक करण्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे.
मोबाईल ट्रॅक करण्याची अनेक साधने आहेत, तशीच आपला नंबर कोणी ट्रॅक केला आहे का? या विषयी देखील जाणून घेण्यासंदर्भात ॲप उपलब्ध आहेत. आज आपण या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसे पाहायला गेलं, तर परवानगी शिवाय कोणाचाही नंबर ट्रॅक केला, तर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, मात्र तरी देखील अनेक हॅकर्स अनेकांचे नंबर ट्रॅक करताना पाहायला मिळतात. मात्र तुम्ही तुमचा नंबर ट्रॅक झाला आहे, का नाही? हे USSD code वापरून जाणून घेऊ शकता. याबरोबरच तुमच्या अँड्राईड मोबाइलचा डाटा इतर कोणत्या नंबरकडे वळवला आहे, हे देखील जाणून घेऊ शकता.
डायल करा *#२१# आणि जाणून घ्या..
तुमच्या अँड्राईड मोबाइल फोन वरून तुम्ही *#२१# डायल करून तुमचा नंबरचे मेसेज, कॉल तसेच मोबाईलचा डाटा देखील इतर कोणत्या नंबरवर वळवला आहे, हे जाणून घेऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर इतर कोणत्या नंबरवर ड्रायव्हर्ड झाला असेल, तरी देखील तुम्ही *#२१# हा नंबर डायल करून जाणून घेऊ शकता. साहजिक यामुळे भविष्यातील धोक्यापासून तुम्ही सुरक्षित होऊ शकता.
*#६२# हा कोड वापरा आणि..
तुमचा फोन नंबर लागत नेसल, नो सर्विस, नो एरर, नो अँन्सर अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या जाणवत असतील, तर तुम्ही तुमच्या मोबाईल वरून *#६२# हा नंबर डायल करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही तुमचा नंबर कोणाच्या नंबरवर रिडायरेक्ट झाला आहे, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ आहे. अलीकडच्या काळात या समस्या अधिक जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता या समस्येवर पर्याय उपलब्ध झाला आहे.
##४६३६## हा कोड वापरा आणि..
हा नंबर तुम्ही तुमचा फोन बुक मधून डायल करून तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, मोबाईलमध्ये बॅटरी किती व्होल्टेजची आहे. हे देखील जाणून घेऊ शकता. या बरोबरच तुमच्या मोबाईल फोनचे रॅम देखील तुम्ही जाणून घेऊ शकता. या बरोबरच तुम्ही नेटवर्क विषयी देखील सविस्तर माहिती घेऊ शकता.
हा कोड वापरून हरवलेला मोबाइल शोधा
हरवलेला मोबाईल नंबर शोधण्यासाठी तुमच्याकडे IMEI नंबर असणे आवश्यक आहे. हा नंबर शोधायचा असेल, तर तुम्हाला *#०६# हा कोड डायल करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या फोन मधून हा कोड डायल केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरचा आय एम आय नंबर मिळेल. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन सीआयआर या वेबसाईटवर जाऊन, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचे लोकेशन पाहू शकता. विशेष म्हणजे, या प्रक्रियेमुळे तुम्हाला तुमचा स्मार्टफोन बंद असला तरी देखील ट्रॅक करता येणार आहे.
हा कोड वापरून तुम्ही सर्व फॉरवर्ड करू शकता बंद
##००२#
तुम्ही तुमच्या मोबाईल वरून हा कोड वापरून तुमच्या मोबाईलवर असणाऱ्या काही समस्या, जसे की तुमचा फोन नंबर कोणत्या मोबाईल नंबरवर फॉरवर्ड केला गेला आहे, बरोबरच तुमचा मोबाईल नंबर कोणत्या मोबाईल नंबरवर डायव्हर्ड आहे, तो तुम्ही बंद करू शकता.
हे देखील वाचा Viral video: वाघाच्या तीन बछड्यांना माकडाने दूध पाजून सांभाळलं, पण बछड्यांनी..
Kiss आरोग्यासाठी रामबाण उपाय; किस करण्याचे हे आहेत 10 आश्चर्यकारक फायदे..
Today Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..
healthy food: जाणून घ्या भिजवलेले बदाम खाण्याचे आठ आश्चर्यकारक फायदे..
Married Life Problem: हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..
Vastu Tips: चुकूनही घराजवळ लावू नका ही चार झाडे, अन्यथा होईल सत्यानाश..
Belly Fat : खरंच उभं राहून पाणी पिल्यामुळे पोटाची चरबी वाढतेय का? लगेच जाणून घ्या नाहीतर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.