Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! ‘ही’ आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर; ‘असं’ करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..
ration card: रेशन रेशन कार्ड कशाला म्हणून लागत नाही. कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम रेशन कार्ड हे तुमच्याकडे असणे आवश्यकच आहे. अन्यथा सरकारी योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सरकार देखील रेशन कार्ड धारकांना अनेक योजनांचा लाभ देत असतं, रेशन कार्डधारकांना सरकारने आता पुन्हा एकदा एक खुशखबर दिली असून, सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. आज आपण सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी, त्याचबरोबर आधार कार्डला रेशनकार्ड कसं लिंक करायचन हे देखील पाहणार आहोत.
रेशन कार्ड लाभार्थ्यांनी अजूनही, तुमचे रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक केलं नसेल, तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. रेशनधारकांना सरकारने आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक करण्याची तारीख आता वाढवून दिली आहे. सरकारने 30 जून 2022 पर्यंत रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आता तुम्हाला रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची आणखी संधी मिळाली आहे. अनेकांनी आधारशी रेशन कार्ड लिंक केलं असेल, मात्र अजूनही ज्या रेशनकार्ड धारकांनी अजूनही आपल्या आधारशी रेशन कार्ड लिंक केलं नाही, अशांसाठी आम्ही लिंक कसं करायचं, हे देखील सांगणार आहोत.
रेशन कार्डमुळे मिळतात हे फायदे
रेशन कार्डधारकांना दर महिन्याला खूप कमी दरात धान्य मिळतं. राज्य सरकारबरोबर आता केंद्र सरकारने देखील रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य वाटप करायला सुरुवात केली आहे. मोफत धान्य वाटप योजना ही मार्चपर्यंत असल्याचं बोलण्यात येत आहे. मात्र याविषयी अधिकृत अशी कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आली नाही. रेशन कार्डचा हा एक फायदा सर्वांनाच माहीत आहे. मात्र या व्यतिरिक्त देखील तुमच्या आयुष्यात असे खूप फायदे आहेत, जे रेशन कार्डमुळे शक्य होणार आहेत.
केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन’ ही देखील योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत देशातल्या लाखो गरीबांना लाभ मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तुमचं रेशन कार्ड तुम्ही तुमच्या आधार कार्डशी लिंग केल्यानंतर ‘वन नेशन वन रेशन’ या योजनेअंतर्गत देशातल्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानातून रेशन खरेदी करू शकता. जर तुम्ही अजूनही, तुमचे रेशन कार्ड आधार लिंक केलं नसेल, तर खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि तुमचं रेशन आधारशी लिंक करूण घ्या
रेशनकार्ड आधारशी असं करा लिंक
जर तुम्ही अजूनही, तुमचं रेशन कार्ड आधार कार्डशी लिंग केले नसेल, आणि ते तुम्हाला करायचं असेल, तर सर्वप्रथम तुम्ही, क्रोम किंवा गुगलवर, uidai.gov.in असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ‘अन्न व नागरी पुरवठा’ यांची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करायचं आहे. इथपर्यंत सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा पत्ता, दिलेल्या रकान्यामध्ये भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला ‘Ration Card Benefit’ या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. Ration Card Benefit या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक पेज ओपन झालेलं दिसेल. या रकान्यांमध्ये तुम्हाला आधार कार्ड क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, ई-मेल एड्रेस आणि मोबाईल क्रमांक अशी माहीती भरावी लागणार आहे.
ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता, त्यावर एक ओटीपी आलेला दिसेल, आलेला OTP तुम्हाला समोर दिसणाऱ्या रकान्यात टाकायचा आहे. यानंतर
तुम्हाला स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज आलेला पाहायला मिळणार आहे. याचाच अर्थ तुमचं वेरिफिकेशन झालं आहे, असं होतो. आणि तुमचं रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक झालं आहे, असं स्पष्ट होतं.
ऑफलाईनही करू शकता लिंक
ऑफलाइन पेक्षा ऑनलाईन प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि लगेच परिणाम देणारी आहे. मात्र तरीदेखील तुम्हाला ऑनलाइन रेशनकार्ड आधार लिंक करायला जमलं नाह, तर तुम्ही ऑफलाईन देखील करू शकता. याची देखील प्रक्रिया आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत.
अशी करा ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण
ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला, तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स काढणं आवश्यक आहे. सोबत तुमचा रेशन कार्डची देखील झेरॉक्स काढणे गरजेचे आहे. तसेच रेशन कार्ड वरील कुटुंबप्रमुखाचा एक पासपोर्ट साईज फोटो देखील तुम्हाला लागणार आहे. वरील सर्व डाक्युमेंट तुम्हाला रेशन कार्ड केंद्रावर जाऊन जमा करावी लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करत असताना, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या डॉक्यूमेंटची सही शिक्क्याची एक प्रत तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. याप्रमाणे तुम्ही तुमच्या रेशनकार्ड केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशन करू शकता.
हे देखील वाचा Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर ‘असा’ पहा ‘फेरफार उतारा’ अगदी सोप्या भाषेत..
आयपीएल पाण्यासाठी आता हॉटस्टारची आवश्यकता नाही!इथे पहा मॅच घ्यायला.
Viral video:चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम