Video: धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचा ‘तो’ प्रायव्हेट व्हिडिओ झाला व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ..

0

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (dhanajay Munde) यांच्या दुसऱ्या पत्नी करूणा शर्मा- मुंडे (Karuna Sharma) सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी कोल्हापूर (kolhapur) उत्तरमधून विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरला आहे. मात्र त्यांच्या निवडणूक लढविण्याची चर्चा होताना दिसत नाही, मात्र त्यांनी केलेल्या विधानांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या माध्यमाची हेडलाईन बनल्या असतानाच, आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा एक प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेला धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे प्रेम प्रकरण होतं, हे आता जवळपास सगळ्यांनाच माहित पडलं आहे. एवढंच नाही तर, धनंजय मुंडे यांनी देखील हे मान्य केले असून, या करुणा शर्मापासून आपल्याला मुलं देखील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता आपला घटस्फोट झाला असल्याचे, देखील त्यांनी जाहीर केले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे प्रकरण चांगलंच गाजलं होतं.

आता पुन्हा एकदा करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करताना धनंजय मुंडे यांना अनेक बायका आणि पाच ते सहा मुलं असल्याचा धक्कादायक खुलासा यांनी केला आहे. एवढंच नाहीतर पंढरपूरमध्ये पत्रकार परिषदेत संवाद साधताना करुणा शर्मा म्हणाल्या, काश्मीर फाईल्स या चित्रपटावर चर्चा होते, फार दुर्दैवी आहे. खरी चर्चा ही दिशा सालियन, पूजा चव्हाण, करुणा शर्मावर व्हायला हवी. आम्हाला कोणत्या परिस्थितीतून सामोरं जावं लागलं, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं.

धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर, तुम्हाला महाराष्ट्राचे राजकारण किती खालच्या थराला गेलंय, आणि इथल्या नेत्यांची पातळी काय आहे? हे समजेल. आमच्या दोघांवर चित्रपट काढण्यासाठी अनेक दिग्दर्शक तयार असल्याचे देखील करून शर्मा म्हणाल्या. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे या दोघांची चर्चा जोरदार रंगत असतानाच, आता या दोघांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. करूणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटोमुळे धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या प्रेम कहानीची आता पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे करुणा शर्मा चांगल्याच अडचणीत देखील आल्या होत्या. पोलिसांना करुणा शर्मा यांच्या गाडीत रिवाल्वर सापडला होता, या प्रकरणात त्यांना अटक देखील करण्यात आली होती. मात्र एका वायरल झालेल्या व्हिडिओ करुणा शर्मा यांच्या गाडीत कोणीतरी एक वस्तू ठेवताना पाहायला मिळालं होतं, त्यामुळे बाहेरच्याच व्यक्तीने हा रिवाल्वर ठेवल्याची चर्चा रंगली होती. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटोत या दोघांचा मुलगा देखील असल्याचं बोललं जात आहे. व्हायरल झालेल्या फोटोत धनंजय मुंडे फोनवर कोणाशी तरी बोलत असताना पाहायला मिळत असून, त्यांच्या शेजारी त्यांची पत्नी करुणा शर्मा बसल्या आहेत. तर दुसरीकडे एक लहान मुलगा देखील जेवण करताना पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर सुजय विखे पाटलांच्या फॅन पेजवरू हा फोटो व्हायरल झाला असून, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देखील देण्यात आलं आहे. या पेजवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोला ये रिश्ता क्या कहलाता है या गाण्याचे बॅकग्राऊंड म्युझिक देण्यात आले आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तर मधून करुणा शर्मा यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा अर्ज भरला असून, त्यांनी अधिकृत आपल्या राजकारणाला सुरुवात केली आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे आणि माझ्या प्रेम कहानीची दोन पुस्तके देखील लिहिली गेली आहेत. ती लवकरच पब्लिश करण्यात येतील. हिंदी आणि मराठीत ही पुस्तके वाचकांना वाचायला मिळणार आहेत, असंही त्या म्हणाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा घरकुलासाठी अर्ज केलाय? घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ‘अशी’ पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची नांवे

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका; ‘असा’ चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार…

इतर पुरुषासोबत ‘से ‘क्स’ करताना पतीने पत्नीला रंगेहात पकडलं; गड्याने माफही केलं, पण ठेवली ‘ही’ धक्कादायक अट..

यावर क्लिक करून पहा व्हिडिओ..

योगींच्या पोलिसांकडून दलित महिलांवर अत्याचार; ‘त्या’ ठिकाणी केली गुरां-ढोरासारखी मारहाण, व्हिडिओ व्हायरल..

Xiaomi चा पुन्हा धमाका! 6GB रॅम 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ दहा हजारांत; पहा कुठे सुरू आहे सेल..

E-gram swaraj: ‘असा’ चेक करा ग्रामपंचायतीला आलेला निधी,आणि उठवा सरपंचाचा बाजार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.