शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर ‘असा’ पहा ‘फेरफार उतारा’ अगदी सोप्या भाषेत…

0

शेतकऱ्यांची सर्वत्र पिळवणूक होते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सरकारी दप्तर पासून ते बाजारपेठपर्यंत शेतकऱ्यांची पिळवणूक होत असते. पूर्वी हे अधिक होत होतं, मात्र आता हळूहळू बदल होताना दिसत आहे. आपल्या शेतजमिनीची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे घालावे लागत होते. तलाठी कार्यालयाकडून साधा सातबारा उतारा काढायचा म्हंटले, तरी शेतकऱ्यांचा आठवडा जायचा. हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. मात्र आता परिस्थिती बदललीय. आता शेतकऱ्याला आपल्या शेतजमिनीची सर्व माहिती मोबाईलवर सहज पाहता येणं शक्य आहे. सातबाऱ्याबरोबरच आता शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीचा फेरफार देखील ऑनलाइन पाहता येणार आहे. चला तर मग आपण सोप्या भाषेत समजून घेऊ फेरफार कसा काढायचा.

फेरफार म्हणजेच गाव नमुना-6 ही सगळ्या सातबाऱ्याची चावी असते, असं म्हटलं जातं. शेतकऱ्याच्या जमीन अधिकार अभिलेखात जे काही बदल होत असतात, त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते. फेरफार या नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, तसेच वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा अशा अनेक बदलांची सविस्तर नोंद ही फेरफारमध्ये ठेवली जाते. पूर्वी शेत जमिनीचा फेरफार काढायला तब्बल एक महिना जायचा. आता मात्र तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलवर गाव फेरफारची सगळी माहिती सहज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना शेतजमीनीची सगळी माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने ‘आपली चावडी’ ही प्रणाली सूरु केली आहे.

फेरफार ऑनलाईन कसा पाहायचा?

जर तुम्हाला फेरफार ऑनलाईन पाहायचा असेल, तर सर्वप्रथम क्रोमवर जाऊन,  http://bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करणं आवश्यक आहे. तुम्ही असं सर्च केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची ही अधिकृत वेबसाईट ओपन झालेली दिसते. ही वेबसाइट ओपन झाल्यानंतर तुम्हाला उजवीकडे ‘आपली चावडी’ हा पर्याय पाहायला मिळणार आहे. आपली चावडी म्हणजेच (Digital Notice Board) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर नवीन पेज ओपन झालेलं दिसणार आहे. या पेजवर तुम्हाला तुमच्या गावातील फेरफार नोंदी पाहता येणार आहेत. त्या कशा पाहायच्या तेही आपण जाणून घेऊयात.

अशी पहा फेरफार संबंधी सगळी माहिती

तुमच्या समोर ओपन झालेल्या या पेजवर तुम्हाला जिल्हा तालुका आणि तुमचं गाव हा पर्याय दिसेल, तुम्ही त्या ठिकाणी योग्य माहिती भरायची आहे. तुमचा जिल्हा तालुका आणि गाव अशी सगळी माहिती व्यवस्थित भरल्यानंतर, तुम्हाला ‘आपली चावडी पहा’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तुम्ही ‘आपली चावडी’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर तुमच्या गावातील फेरफाराच्या सर्व नोंदी ओपन झालेल्या पाहायला मिळतील.

ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, फेरफार नंबर सुरुवातीलाच दिलेला आहे. त्यानंतर फेरफाराचा प्रकार म्हणजेच, शेतमजिनीवर बोजा चढवला आहे का? तसेच कमी केलाय काय? वारस नोंद, जमीन खरेदी केली आहे का? या सगळ्याची नोंद तुम्हाला या पेजवर पाहायला मिळणार आहे. या पेजवर तुम्हाला फेरफाराची तारीख देखील पाहायला मिळते. तसेच या फेरफार संबंधी काही हरकत असेल तर, हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख देखील तुम्हाला या पेजवर पाहायला मिळणार आहे. तसेच गट नंबरशी संबंधित जमिनीचा व्यवहार झाला असेल, त्या गट नंबरची माहिती देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

तुम्ही पाहत असलेल्या पेजच्या पहिल्या रकान्यात तुमहाला फेरफाराचा नंबर पाहायला मिळेल. तर दुसऱ्या रकान्यामध्ये जमीन संपादित केलेल्या अधिकाराचं स्वरूप सांगितलेले दिसेल. यात तुम्हाला जमिनीच्या कोणत्या प्रकारचा व्यवहार झाला, तसेच घेणारा आणि देणारा याविषयी देखील सविस्तर माहिती दिलेली दिसेल.

तुम्ही पाहत असलेल्या या पेजवरील तिसऱ्या रकान्यामध्ये ज्या शेतजमिनीवर अधिकार संपादित केला आहे, अशा शेतजमिनींचा गट क्रमांक दिलेला देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच चौथ्या रकान्यामध्ये तुम्हाला या फेरफार नोंदीशी संदर्भात काही आक्षेप/हरकत असल्यास ती तुमच्या गावातील किंवा संबंधित तलाठ्याकडे 15 दिवसांच्या आतमध्ये कळवणे गरजेचे आहे. नाहीतर तुमची या व्यावहाराला कोणतीही हरकत नाही, असं समजलं जातं. अशी सूचना देखील खाली तुम्हाला पाहायला मिळेल.

 3 प्रकारच्या सुविधा

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने सुरू केलेल्या ‘आपली चावडी’ या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना तीन सुविधा पाहायला मिळणार आहेत. यात तुम्हाला फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली असेल, तर ते देखील पाहत येणार आहे. हरकत घेतली असेल तर, हरकतीचा शेरा आणि तपशील देखील या रकान्यात तुम्हाला पाहायला मिळतो. जर कोणी 15 दिवसाच्या आतमध्ये हरकत घेतली नाही, तर फेरफारावरील नोंद प्रमाणित करण्यात येते, आणि नंतर सातबाऱ्यावरही नोंदवली जाते.

गावात मोजणी कोणी आणली?

आपली चावडी हे पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला तिसरा पर्याय ‘मोजणी विषयी’ असा पाहायला मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोजणीच्या नोटीस संदर्भात सगळी माहिती मिळेल. यात तुम्हाला गावामध्ये जमीन मोजणी कुणी आणली आहे? याची सविस्तर माहिती दिलेली दिसेल. या रकान्यामध्ये तुम्हाला मोजणीचा कोणता प्रकार आहे, याविषयी देखील सविस्तर माहिती दिलेली दिसेल. यात तुम्हाला मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका तसेच गावाचं नाव, सोबतच ज्या गटामध्ये मोजणी करायची आहे, तो गट क्रमांक, मोजणीची तारीख देखील दिलेली तुम्हाला पाहायला मिळेल. एवढंच नाही, तर मोजणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आणि त्याचा मोबाईल क्रमांक देखील या रकान्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत मोजायचं आहे, त्या लगतचे खातेदार आणि सहधारक यांची माहिती नमूद केलेली माहिती देखील तुम्हाला या रकान्यात पाहता येणार आहे.

(या संदर्भात आणखी काही जाणून घ्यायचं असेल, तरीदेखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता किंवा
maharashtralokshahi@gmail.com यावर मेल करू शकता)

हे देखील वाचा Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

आठवतायत का मनसेचे ‘ ते ‘ २००९ च्या विधान सभेतील १३ दमदार आमदार, जाणून घ्या सविस्तर...

Viral Video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ; भुकेल्या मगरीला खाऊ घालत होता मासा, पण मासा सोडून मगरीने.. तुम्हीच पहा व्हिडीओ…

Viral Video: ‘या’ कारणामुळे म्हशीने सिंहाला ताणून ताणून बेजार केलंय, व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा पहाच..

हंबरडा फोडणाऱ्या आजोबांचं एकाने नाही ऐकलं; उसाचा क्रेशर बुलडोजरने तोडून टाकला; डोळ्यातून पाणी आणणारा व्हिडिओ व्हायरल..

ई-केवायसी करणं बंधनकारक, अन्यथा पीएम किसान हप्ता होणार बंद; कशी कराल ई-केवायसी? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..

लग्नाची पहिली रात्र अविस्मरणीय करायची असेल तर करा ‘हे’ काम; अन्यथा ‘या’ चुकांमुळे पहिली रात्र होईल उद्ध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.