काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ; भुकेल्या मगरीला खाऊ घालत होता मासा, पण मासा सोडून मगरीने..,” तुम्हीच पहा व्हिडीओ..

0

अलीकडच्या काळात प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळतं. मात्र कोणत्या प्राण्यांवर प्रेम करायचं, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या गुणधर्मासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांवर प्रेम करून काहीही उपयोग होत नाही. शेवटी ते ज्याच्यासाठी ओळखले जातात, तेच करणार यात अजिबात दुमत नाही. असाच एका पट्ट्याने थेट मगरीला मासा चारण्याच प्रयत्न केला, मात्र मगरीने मासा सोडून या तरुणावर हल्ला केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडणारा हा व्हिडीओ कॅमेरात कैद झाला असून, सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला आहे.

मगर ही भयंकर हिंस्त्र शिकारी आहे, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. शिकारीत पटाईत असणाऱ्या वाघाला देखील मगर कधी चकवा देऊन आपली शिकार बनवेल, हे सांगता येत नाही. वाघाची देखील मगरीने शिकार केल्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. मगर ही कधीही कोणावर प्रेम करू शकत नाही, किंवा तिला कोणी जीव लावलेला देखील कळणार नाही. हे सगळं माहीत असून देखील, जर तिला कोणी खायला घेऊन जात असेल, तर हा निव्वळ मूर्खपणा ठरेल.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत हा मूर्खपणा ऑस्ट्रेलियन टीव्ही प्रेझेंटर ‘मॅट राइट’ याने केला आहे. unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. मात्र काळजाचा थरकाप उडवणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. मगरीच्या एखादी शिकार तोंडाला लागली तर, तिच्या तोंडून सुटणे हे अशक्यच आहे. कोहीही तिच्या तोंडात सापडले तर ती त्याची चिरफाड केल्याशिवाय सोडणारच नाही. त्यामुळे तिच्या जवळ कोणी जाईल तर हा निव्वळ मूर्खपणा ठरेल.

ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर मॅट राइटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, तो एका तलावाच्या काठावर हातामध्ये एक माशाचा तुकडा घेऊन उभा आहे. तो एका मगरीच्या शोधात असल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत मगर देखील ‘मॅट राइट’ जवळ येत असताना पाहायला मिळत आहे. आता मगर शिकार करण्यात पटाईत असल्याने, ती पाणी देखील किंचितही न हलू देता काठावर येताना दिसत आहे. हे सगळं मॅट पहात असून, देखील घाबरताना दिसत नाही. मगर काठावर आल्यानंतर मॅटने थोडाशी सावधगिरी बाळगत मगरीपुढे मासा नाचवत असल्याचे देखील या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

काय घडलं नेमकं

मॅट माशाचा एक तुकडा घेऊन पाण्याजवळ जातो. काठाच्या कडेला मॅट बराच वेळ आपल्या हातातला मासा घेऊन नाचवत होता. माशाच्या वासाने पाण्यातून मगर काठाच्या कडेला येऊ लागली. मात्र मगर येत असताना, पाणी सुधा हलत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मगर काठावर आली. काठाच्या कडेला येऊन पाण्यातून मॅटकडे हल्ला करण्याच्या भावनेतून एकटक बघत असल्याचे यात पाहायला मिळत आहे. मात्र याच क्षणी जे काही घडलं, हे पाहून काळजाचा ठोकाच चुकला. अचानक मगरीने जे केलं हे पाहून प्रत्येकाचं काळीज धडधड करु लागलं.

मॅटच्या हातामध्ये असणारा मासा खाण्यासाठी ही मगर येत आहे, असं वाटतं होतं. मात्र मगर अचानक मॅटवर हल्ला करते. नशिब बलवत्तर म्हणून मॅट या हल्ल्यात बचावला असल्याचे पाहायला मिळत आहे. मॅटच्या अंगावर मगर अक्षरशः झेप घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मगरीने अचानक केलेल्या हल्ल्यात मॅट देखील प्रचंड घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. मगरीनं मॅटवर हल्ला केला, मात्र तो यात थोडक्यात बजावल्याचे पाहायला मिळत आहे. मगरीच्या या हल्ल्यात मॅट स्वतःला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

मॅट मगरीच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी धडपडून पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र यात त्याचा पाय घसरतो, काठाच्या कडेला चिखल असल्याने, त्याचा तोल गेलाच आपण या व्हीडिओत पाहू शकतो. मगरीच्या हल्ल्यात मॅटचा पाय घसरल्यानंतर मॅट आता मगरीच्या तोंडात जाणार असं देखील काही क्षण या व्हिडिओ वाटत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र मॅट कसातरी या हल्ल्यातून स्वतःला वाचवतो, आणि मोठा अनर्थ टळल्याचं पाहायला मिळतं.

काय म्हणाले नेटकरी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेचा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला आहे, तर काहींनी मॅटच्या या वर्तणुकीवर टीका देखील केली आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना युजर्स म्हणाले, जर मॅटचा पाय आणखी घसरला असता, तर काय झाले असते? प्राण्यांसोबत खेळताना नेहमी सावधगिरी बाळगायला हवी. तर दुसर्‍या एका युजर्सने म्हटले आहे, शिकारीसाठी तरबेज असणाऱ्या मगरीला मॅटने अतिशय दिमाखदार पद्धतीने चकवलं, मॅटची ही पद्धत आपल्याला जाम भारी आवडली.

तसेच तिसऱ्या एका युजर्सने म्हटलं आहे, सुरुवातीला हा व्हिडिओ पाहताना आता काय होईल? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हातात असणारा मासा मगरीच्या तोंडात देणार आणि मगर देखील त्याचं प्रेम पाहून फक्त मासाच खाणार, असं वाटलं होतं. मात्र अचानक मगरीने मॅटवर केलेल्या हल्ल्याने, आम्ही स्तब्ध झालो आहोत. प्राण्यांवर विश्वास ठेवणे, म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. त्यातल्या त्यात शिकारीचे असणारे प्राणी तर हमखास तुमचा खेळ खलास करू शकतात.

 हे देखील वाचा  हंबरडा फोडणाऱ्या आजोबांचं एकाने नाही ऐकलं; उसाचा क्रेशर बुलडोजरने तोडून टाकला; डोळ्यातून पाणी येणारा व्हिडिओ व्हायरल..

Viral Video: ‘या’ कारणामुळे म्हशीने सिंहाला ताणून ताणून बेजार केलंय, व्हायरल झालेला हा व्हिडीओ एकदा पहाच…

सेल्फी काढायला गेलेल्या सुंदर तरुणीचा चेहरामोहरा ऊंटाने टाकला बदलून; नक्की काय घडलंय? पहा व्हायरल व्हिडिओ..

यावर क्लिक करून पहा व्हिडिओ...

Video: धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचा ‘तो’ प्रायव्हेट व्हिडिओ झाला व्हायरल; राज्याच्या राजकारणात खळबळ..

घरकुलासाठी अर्ज केलाय? घरबसल्या तुमच्या मोबाईलवर ‘अशी’ पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची नावे..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.