Chanakya Niti: ‘या’ चार गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास याल रस्त्यावर; जाणून घ्या ध्येयप्राप्तीचे चार मार्ग..

0

Chanakya Niti: अनेकदा मेहनत करून यश मिळत नाही, ही समस्या अलीकडच्या काळात प्रामुख्याने पाहायला मिळते. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी देखील या संदर्भात सविस्तर माहिती सांगितलेली आहे. मानवाला यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल, तर काही गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. आचार्य चाणक्य हे थोर विचारवंत होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथांमध्ये त्यांनी अनेक नीती मूल्य सांगितले आहेत. या मूल्यांचा अवलंब करून मानव यशाच्या शिखरापर्यंत सहज पोहोचू शकतो. जाणून घेऊया आचार्य चाणक्यांनी ध्येयप्राप्तीसाठी सांगितलेली चार मूल्य.

मेहनत करून देखील यश मिळत नसल्याची समस्या अलीकडच्या काळात प्रत्येकाला जाणवते. ध्येय प्राप्त करण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही, हे जरी खरं असलं तरी देखील अनेकदा मेहनत करून देखील आपल्याला यश मिळत नाही. याला सर्वस्वी जबाबदार आपण स्वतः असतो. कारण मेहनत करत असताना ध्येयप्राप्त करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्याकडे किंचित दुर्लक्ष होतं, आणि मग भ्रमनिरास होतो.

यशात धैर्याचा महत्वाचा रोल

यश प्राप्तीसाठी प्रचंड मेहनत करावी लागते. याला पर्याय नाही. मात्र अनेकदा यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करूनही फळ मिळत नाही. अशावेळी आपण दुसरा पर्याय निवडतो. मात्र आचार्य सांगतात, ध्येय प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये धैर्य असणं फार आवश्यक असतं. मेहनत करत असताना असा एक टर्निंग पॉईंट तुमच्या आयुष्यात येत असतो, जो क्षणात तुमचे आयुष्य पालटून टाकतो. मात्र तोपर्यंत तुम्ही धैर्याने परिस्थितीचा सामना करणे आवश्यक असतं. लोकांच्या टीकेचा तुमच्यावर परिणाम होत असेल, तर तुम्ही कदापिही ध्येय प्राप्त करू शकणार नाही. असं आचार्य चाणक्य सांगतात. अपयशाची भीती तुम्हाला सतावत असेल, तर ध्येयप्राप्ती केवळ स्वप्न बनून राहते.

चुकांमधून धडा घेणे गरजेचे

कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. माणसाकडून चुका होत असतात. मात्र त्या चुकातून आपण किती लवकर शिकत आहोत, याला फार महत्त्व आहे. कधीकधी इतरांच्या चुकांमधून देखील शिकण्याची संधी मिळत असते. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, असं आचार्य चाणक्य सांगतात. स्वतःच्या चुकांमधून तर माणसाने शिकावेच, मात्र इतरांच्या चुकांमधून देखील शिकण्याची मोठी संधी असते. चुकांची भीती अंगी बाळगणे हा मोठा अपराध आहे, असं चाणक्य सांगतात. जो मनुष्य चुकांना घाबरत नाही, तो आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी चांगली धोरणे आखण्यास सक्षम असतात. झालेल्या चुकांविषयी पश्चाताप न करता, त्या चुका पुन्हा कशा होणार नाहीत, याकडे लक्ष देऊन प्रयत्न करत राहणं, तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी अनुकूल असते.

काळानुसार बदला

मनुष्याने नेहमी कालानुसार आपल्यामध्ये बदल करणे आवश्यक असतं. आचार्य चाणक्य सांगतात, काळ जसा बदलतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे प्रयत्न आणि ध्येय प्राप्त करण्याचे मार्ग देखील बदलणं आवश्यक असतं. समाजातल्या अनेक घटकांचा अभ्यास काळानुसार तुम्हाला करत जावा लागतो. तुमच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर घालण्याचा प्रयत्न जेव्हा तुम्ही करता, तेव्हा ध्येय प्राप्त करण्यासाठीचे अनेक मार्ग देखील खुले होत जातात. त्यामुळे काळानुसार आपल्या स्वभावात देखील बदल करत जाणं योग्य असल्याचे चाणक्य सांगतात.

संगत

आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी संगत देखील फार महत्त्वाचा रोल अदा करते. जीवनात वाईट सवयी आणि दुर्गुणांची संगत असेल, तर तुमचं आयुष्य उध्वस्त झालेलं कळणार देखील नाही. असं आचार्य चाणक्य सांगतात. त्यामुळे माणसाने संगत नेहमी सद्गुणांबरोबर करणे आवश्यक असते. तुमच्या आयुष्यात असणारा मित्रपरिवार देखील पॉझिटिव्हिटीने प्रवास करणारा असायला हवा. अन्यथा त्याचे परिणाम तुमच्या ध्येयप्राप्तीवर होतात.

हे देखील वाचा Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यापासून या सहा राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य..

IND vs AUS: या तीन कारणांमुळे आजही भारताचा दारून पराभव होण्याची शक्यता..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

Motorola Smartphone: 50MP कॅमेरा असणारा Motorola चा हा स्मार्टफोन उद्या होणार लॉन्च; किंमत केवळ..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

realme smartphone: realme चा हा दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय फक्त १० हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँकेत पाच हजार पदांची मेगा भरती; या उमेदवारांना करता येणार अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.