Motorola Smartphone: 50MP कॅमेरा असणारा Motorola चा हा स्मार्टफोन उद्या होणार लॉन्च; किंमत केवळ..

0

Motorola Smartphone: प्रत्येकाला कमी किंमतीत दर्जेदार स्मार्टफोन हवा असतो. अनेक बड्या कंपन्या देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरणाऱ्या स्मार्टफोनची (smartphone) निर्मिती करत असतात. कमी किंमतीत अनेक भन्नाट फीचर्स देण्याचा प्रत्येक कंपनीचा प्रयत्न असतो. मोटोरोला ही देखील एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी म्हणून गेल्या काही वर्षात समोर आली आहे. खासकरून तरुणाईमध्ये या स्मार्टफोनची मोठी क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. दमदार कॅमेरा आणि उत्कृष्ट बॅटरी बॅकअपसाठी हा फोन ओळखला जातो. आता मोटोरोलाचा आणखी एक दमदार स्मार्टफोन बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला असून, उद्या फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचा सेल आयोजित करण्यात आला आहे.

मोटोरोला कंपनीचा Moto G32 हा स्मार्टफोन उद्या 22 मार्चला लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून दिली आहे. उद्यापासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्डसह अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. जाणून घेऊया, या स्मार्टफोनचे फीचर्स किंमत आणि ऑफर्स विषयी सविस्तर.

Moto G32चे फीचर्स

Moto G32 हा स्मार्टफोन अँड्रॉइड १२ वर आधारित काम करतो. या स्मार्टफोनचे धूळ त्याचबरोबर पाण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी कंपनीने IP52 रेटिंगनुसार निर्मिती करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ६.५ इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह ग्राहकांना मिळणार आहे. सोबतच या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट ९०HZ देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या प्रोसेसर विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर देण्याचे काम करण्यात आले आहे.

संगीताचा आनंद लुटण्यासाठी ग्राहकांना या स्मार्टफोनमध्ये स्पोर्ट्स स्टिरीओ स्पीकरसोबत डॉल्बी एटमॉस सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर तसेच ड्युअल मायक्रोफोनही देण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या स्मार्टफोनला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 50MP असणार आहे. तर 8 MP अल्ट्रा वाईड, 2 MP मॅक्रो लेन्स कॅमेरा देण्यात आली आहे.

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनच्या सेल्फी कॅमेरा विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी या फोनचा कॅमेरा तब्बल 16 MP कॅमेरा दिला गेला आहे. सोबतच फोनची सुरक्षा म्हणून फेस अनलॉक तसेच साईट माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील दिला गेला आहे. Moto G32 स्मार्टफोनची बॅटरी तब्बल 5000 mAh असणार आहे. या स्मार्टफोनची बॅटरी ३०W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किती आहे किंमत?

भारतीय बाजार भेटीमध्ये लॉन्च झालेल्या Moto G32 या स्मार्टफोनची किंमत बारा हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 8GB रॅम आणि 128 स्टोरेज व्हेरीएंट मिळणार आहे. मोटोरोलाने लॉन्च केलेल्या Moto G32 या स्मार्टफोनचे फीचर्स लक्षात घेतले, तर ही किंमत खूप कमी असल्याचं बोललं जात आहे. ग्राहकांना कमी किंमतीत एक उत्तम स्मार्टफोन खरेदी करण्याची ही खूप मोठी संधी असून, उद्यापासून बाजारात विक्रीसाठी हा स्मार्टफोन उपलब्ध होत आहे.

हे देखील वाचा Couple Viral Video: तरुण-तरुणीने भररस्त्यातच सुरू केला कार्यक्रम; व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ..

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..

realme smartphone: realme चा हा दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय फक्त १० हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँकेत पाच हजार पदांची मेगा भरती; या उमेदवारांना करता येणार अर्ज..

Marriage Tips: लग्नापूर्वी मुलीला हे पाच प्रश्न विचारल्याशिवाय चुकूनही करू नका लग्न; नाहीतर आयुष्यभर..

Honda Shine 100cc: Hero Splendor Plus ला टक्कर देण्यासाठी Honda Shine 100cc झाली सज्ज; जाणून घ्या कोणती गाडी आहे बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.