​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

0

IOCL Recruitment 2022-23: बेरोजगारीच्या (unemployment) दुनियेत नोकरी (nokari) मिळवणे खूप अवघड आहे. मात्र आता अनेक विभागांमध्ये मोठ मोठ्या संधी देखील निर्माण होत आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात (government job) असाल, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) तब्बल 1760 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (Technical and non-technical) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना अर्ज करण्याकरता 3 जानेवारी पर्यंत अर्जची मुदत ठेवण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (INDIAN OIL CORPORATION LIMITED) विविध पदांसाठी करण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवार हे आयटीआय (ITI) त्याचबरोबर बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रत्येक विभागामध्ये उमेदवारांची वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. आपण पदानुसार सविस्तर जाणून घेऊ.

ट्रेड अप्रेंटिस: या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही NCVT/SCVT या अन्यथा प्राप्त संस्थेतून दोन वर्षाचा आयटीआय पूर्ण झालेला असणे आवश्यक आहे. सोबतच मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मेकॅनिकल या पदासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून ३ वर्षे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे आवश्यक आहे.

या शिवाय कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी PWBD 45% गुणांसह नियमित पूर्णवेळ डिप्लोमा हीने आवश्यक आहे. पदवीधर: या पदासाठी उमेदवारांचे शिक्षण हे BA किंवा B. Com/B. Sc किमान पन्नास टक्के गुणांसह पूर्ण असणे आवश्यक आहे. पदानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं. आता आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा? हे देखील सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी आपण कोणत्या ठिकाणी या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, जाणून घेऊ.

एकूण १७६० जागा

ओडिशा, केंद्रशासित प्रदेश, गुजरात, तेलंगणा, हरियाणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण दीव, दादरा नगर हवेली, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, झारखंड, गोवा, दिल्ली, पंजाब, चंदीगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, इत्यादी ठिकाणी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

वयोमर्यादा आणि ऑनलाइन अर्ज

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी करण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा जाणून घ्यायची झाल्यास किमान 18 ते २४ वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे. एससी एसटी आणि ओबीसी उमेदवारांसाठी सरकारी नियमानुसार वयात सूट दिली जाणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.iocl.com/apprenticeships असं सर्च करायचं आहे. यानंतर तुमच्या समोर या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, सविस्तर अर्ज करू शकता. तुम्हाला ज्या राज्यात नोकरी करायची आहे, तुम्ही त्याच राज्याच्या शिकाऊ उमेदवार म्हणून अर्ज करणे आवश्यक आहे.

 हे देखील वाचा Sajid Khan: साजिद खानचे काळे कारनामे उघड, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पँटमध्ये हात घालून करायचा..; पहा व्हिडिओ 

Hardik Pandya: अखेर हार्दिक पांड्याची व्हाईट बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदी अधिकृत निवड; जारी झाला व्हिडिओ..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

Sushant Singh Rajput: सुशांत सिंगच्या शरीरावर होत्या विचित्र खुणा, सुशांतची हत्या होऊनही डॉक्टरांनी मला..; पोस्टमार्टम करणाऱ्याने सांगितले त्या रात्री काय घडलं..

Ration Card: रेशनकार्ड मिळणार आता एका आठवड्यात; जाणून घ्या सर्व डिटेल्स अर्जासहित..

IND vs SL: मोठा निर्णय! ऋषभ पंत, केएल राहुलला टी-20 संघातून डच्चू; इशान किशन संजू सॅमसनला पूर्व वेळ संधी..

IND vs BAN: बाद झाल्यानंतर विराट कोहलीचा राग अनावर, थेट या खेळाडूला दिली आय-माय वरून शिवी; पाहा व्हिडिओ..

Yamaha RX100: बुलेटला टक्कर देण्यासाठी Yamaha RX100 झाली सज्ज; जाणून घ्या किंमत लूक आणि फिचर्स..

PM Kisan Mandhan Yojana: आता PM Kisan योजनेच्या शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी 36 हजार; फक्त करा हे छोटंसं काम..

DRDO Recruitment: दहावी आणि ग्रॅज्युएट उमेदवारांना या पदासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज..

Kiara Advani: पायावर पाय टाकताना कियारा अडवाणीचं सगळंच दिसलं; पाहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.