PM Kisan Mandhan Yojana: आता PM Kisan योजनेच्या शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी 36 हजार; फक्त करा हे छोटंसं काम..

0

PM Kisan Mandhan Yojana: शेतकऱ्यांचा (Farmer) उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार (central government) अनेक योजना (Yojana) राबवत असल्याचं पाहायला मिळतं. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची (PM Kisan Yojana) सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. दर चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्ता प्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजारांचे एकूण 12 हप्ते जमा झाले आहेत. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आणखी एक योजना राबवली जात असून, या योजनेअंतर्गत पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये मिळत आहेत.

केंद्र सरकारने लागू केलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचे वय वर्ष 60 झाल्यानंतर या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) असं या योजनेचं नाव आहे. शेतकऱ्यांना साठ वर्षानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याची केंद्र सरकारची योजना असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला साठ वर्षापर्यंत दरमहा केवळ ५५ रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि या योजनेचे स्वरूप काय आहे? जाणून घेऊया सविस्तर.

योजनेचे स्वरूप

शेतकऱ्यांना वृद्धकाळात आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. वृद्ध काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना शेतात काम करता येणं शक्य नसतं. साहजिकच यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो. या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला उदरनिर्वाह करता यावा, यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे वय साठ वर्ष झाल्यानंतर, दर महिन्याला तीन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता ठेवण्यात आली आहे? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.

काय आहे पात्रता

शेतकऱ्यांचे वय साठ वर्ष झाल्यानंतर, केंद्र सरकार दर महिन्याला तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवते. त्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता काय आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. याबरोबरच तुमचे वय अठरा वर्ष पूर्ण आणि ४० वर्षापर्यंत असाल, तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येत आहे. जर तुम्ही वरील दोन नियमात बसत असाल, तर तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत काही ठराविक रक्कम भरायची आहे. आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

जर तुमचे वय 18 वर्षे पूर्ण असेल, तर तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत दर महिन्याला 55 रुपये भरायचे आहेत. मात्र जर तुमचं वय 30 वर्ष असेल, तर तुम्हाला 110 रुपये दर महिन्याला 60 वर्षापर्यंत म्हणजेच 30 वर्ष भरायचे आहेत. त्याचबरोबर जर तुमचे वय 40 असेल, तर तुम्हाला दोनशे रुपये दर महिन्याला साठ वर्षापर्यंत म्हणजे वीस वर्ष भरायचे आहेत. जर तुम्ही ४० वर्षाचे असाल, तर तुम्हाला साठ वर्षापर्यंत ४८ हजार रक्कम भरावी लागेल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असणे आवश्यक आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेसंदर्भातली आणि जमिनी बाबतची कागदपत्रे जमा करावी लागतात.

असा करा अर्ज

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर जावे लागणार आहे. कॉमन सर्विस सेंटरवर गेल्यानंतर, तुम्हाला तुमच्या बँक संदर्भातील आणि जमिनीबाबत सर्व माहिती द्यावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला सर्व बँक अकाउंटची माहिती देखील जमा करावी लागणार आहे. यानंतर आधार कार्डला तुमचं नवीन अकाउंट आधारही लिंक केलं जाईल. त्यांनतर तुम्ही तुमची रक्कम दर महिन्याला या खात्यात जमा करू शकता.

याशिवाय तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन maandhan.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला ‘click here to apply’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यांनतर ‘self enrollment’ हा पर्याय पाहायला मिळेल. तुम्हाला बरोबर त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर, नाव ईमेल टाकून ‘generate OTP’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पुढील प्रोसेस करून अर्ज करू शकता.

हे देखील वाचाBenefits Of Foreplay: फोरप्लेमुळे दीर्घ काळ सेक्स आणि महिलांना मिळतो भरपूर आनंद; जाणून घ्या लैंगिक संबंधात याचे महत्व..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

PM Kisan Yojana: अजूनही PM Kisan योजनेचा बारावा हप्ता जमा झाला नसेल तर फक्त करा हे काम, झटक्यात होईल जमा..

Intelligence Bureau Recruitment: १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी बंपर भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Electric Scooter: Flipkart वरून १२ हजारांत खरेदी करू शकता ही इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.