Hangover: हा पदार्थ खाल्ल्यास दारूची नशा उतरते एका मिनिटांत; जाणून घ्या सविस्तर..
Hangover: पार्टीत बसलेलं असताना आनंदाच्या भरात अनेकदा दोन-चार ग्लास दारु (alcohol) जास्त पिल्या जाते. अनेक जण मुड ऑफ असताना सुद्धा दारु पितात. सहाजिकच अशा वातावरणामध्ये अनेक कांकडून जास्त प्रमाणात दारूचे सेवन केलं जातं. दारु प्रमाणाबाहेर झाल्यास शरीरावरचे कंट्रोल हळूहळू सुटू लागते. नशा जास्त झाला की, आपल्याला काहीच सुचत नाही. चालण्यात अडचणी येतात, चक्कर आल्यासारखे वाटू लागते. बोलण्यास त्रास होतो. मग दारु उतरवण्यासाठी अनेक उपाययोजना करतात. अनेक जण लिंबू पाणी देखील पितात. अनेकांचा असा देखील समज आहे विदाऊट दुधाचा चहा पिल्यास दारू उतरते. आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
दारूत असणारे अल्कोहोल शरीरात गॅस्ट्रीक ऍसीडची निर्मिती करते. गॅस्ट्रीक ऍसीडचे प्रमाण शरीरात वाढल्यास अस्वस्थ वाटू लागते. ऊलट्या आल्यासारख्या वाटू लागते. अनेकदा दारु जास्त झाल्यास ऊलट्या सुद्धा होतात. अशावेळी नशा ऊतरवण्यासाठी लिंबाचा किंवा लिंबूपाण्याचा ऊपयोग केला जातो. तज्ज्ञांच्या मते लिंबू नशा कमी करण्यात विशेष मदत करत नाही. मात्र शरीरावरील अल्कोहोलचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. त्यामुळे नशेत लिंबू खाल्ल्यास किंवा लिंबू पाणी पिल्यास सामान्य वाटू लागते. त्यामुळे दारूची नशा जास्त झाल्यास लिंबूपाणी पिणे फायद्याचे ठरु शकते का? लिंबू दारुवर नेमका किती प्रभाव पाडते? या सगळ्यांवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.
लिंबू आणि नशा यांवर सखोल अभ्यास करुन याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन या अमेरिकन वेबसाईटवर हा अहवाल ऊपलब्ध आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात यकृतावर दारुच्या नशेचा होणारा परिणाम आणि त्याचवेळी लिंबामुळे होणारा परिणाम याचे मुल्यांकन करुन विश्लेषण करण्यात आलेले आहे. या अभ्यासानुसार दारुमुळे यकृताचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर असल्याचे सांगण्यात आलेले आहे. दारुच्या नशेमुळे यकृताचे होणारे नुकसान टाळण्यास त्याचवेळी लिंबाचे सेवन केल्यास किंवा लिंबूपाणी पिल्यास फायदेशीर ठरु शकते. तज्ज्ञांच्या मते लिंबातील सायट्रिक ऍसीड अल्कोहोल मधील ईथेनॉलशी विक्रिया करते आणि त्यातून ईस्ट तयार होते. ईस्ट अल्कोहोलमुळे शरीरावर होणार्या दुष्परिणामांना कमी करते.
जास्त दारुवर घातक आहे लिंबू
दारु प्यायल्याने झालेला नशा ऊतरवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. नशा जास्त झाल्यास एकतर लिंबू खायला दिले जाते. नाहीतर लिंबूपाणी पिले जाते. यामुळे नशा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. कमी प्रमाणात दारु पिणार्यांसाठी लिंबू प्रभावी आहे. परंतू जास्त दारु पिण्यार्यांना लिंबामुळे त्रास सुद्धा होऊ शकतो. तसेच आरोग्यावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. एखाद्या वेळेला पोटाचा दीर्घ आजार सुद्धा ऊद्भवु शकतो.
लिंबामुळे होतो हा त्रास
दारु प्यायल्यानंतर शरीरातील यकृत दारु पचवण्याचा प्रयत्न करते. मात्र पटापट दारु पिल्यास किंवा प्रमाणाबाहेर पिल्यास यकृतास दारु पचवणे थोडे अवघड जाते. यानंतर अल्कोहोल रक्तात मिसळण्याची प्रक्रिया सुरु होते. आणि नशा वाढत जातो. जास्त दारु पिणार्यांना किंवा प्रमाणाबाहेर पिणार्यांसाठी लिंबू घातक सुद्धा ठरु शकते. लिंबू पोटामध्ये आम्ल तयार करते. त्यामुळे ऊलट्यांचा तीव्र त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रमाणाबाहेर दारु झाल्यास थोडा वेळ गेल्यानंतर लिंबू द्यावे.
नशा झाल्यास जास्त पाणी ठरते प्रभावी
दारु पिल्यानंतर दारुतील अल्कोहोल रक्तात मिसळण्यास सुरुवात होते. मात्र जास्त दारु झाल्यास दारु पचवण्याची क्षमता कमी होऊन जाते. अशावेळी अल्कोहोल शरीराबाहेर निघण्याची प्रक्रिया सुरु होते. युरीनमधून सर्वाधिक अल्कोहोल बाहेर पडते. नशा चढल्यावर थोडे अस्वस्थ सुद्धा वाटू लागते. आणि घाम यायला लागतो. घामावाटे सुद्धा अल्कोहोल शरीराबाहेर पडते. त्यामुळे शरीरातील पाण्याची मात्रा कमी होते. अशावेळी तुम्हाला चक्कर येण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे नशा जास्त झाल्यास पाणी पिणे फार प्रभावी ठरु शकते. जास्त प्रमाणात पाणी पिल्यास मोठ्याप्रमाणात युरीनवाटे अल्कोहोल शरीराबाहेर पडते. त्यामुळे नशा कमी होण्यास नदत होते. अशावेळी अल्कोहोल शरीरातील विषारी घटक युरीनद्वारे शरीराबाहेर टाकते.
हे देखील वाचा RBI BRBNMPL Recruitment 2022: या उमेदवारांना रिझर्व बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अशी केली जाणार निवड..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम