Bank Account: आता अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीही काढता येणार दहा हजार कॅश; वाचा सविस्तर..
Bank Account: पैशाची अचानक कधी गरज भासेल, हे कोणीही सांगू शकत नाही. प्रत्येकाकडे बँक खाते असले, तरी अनेकांच्या बँक खात्यात अनेकदा पैसे नसल्याचे पाहायला मिळते. नेमकं अशाचवेळी जास्त करून पैशाची आवश्यकता भासते. अनेकांना विनवणी करून देखील आपली मदत कोणी करत नाही. हा अनुभव जवळजवळ प्रत्येकाला येतो. तुम्हाला देखील हा अनुभव आला असेल. पैसाशिवाय या जगात आता ऑक्सिजन देखील मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावलोपावली पैशाची आवश्यकता भासते. मात्र प्रत्येकाकडे रोज पैसे असतीलच, असं नाही. कधी कधी पैसे नसतात, आणि मग आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र आता तुमच्या अकाउंटवर एक रुपया नसला, तरी देखील तुम्ही दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकता.
केंद्र सरकारच्या जनधन (pm Jan dhan Yojana) योजनेमुळे देशातील जवळपास सर्व नागरिकांचे बँक खाते असल्याचं पाहायला मिळतं. भाजप २०१४ ला सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मधील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणामध्ये जनधन योजना सुरू करण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या योजनेला देशवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. जनधन योजनेअंतर्गत तब्बल 50 कोटींहून अधिक लोकांनी बँकेत खाते उघडलं. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार विविध योजना राबवत असून, या योजनांचा थेट लाभ खातेधारकांना मिळत असल्याचं पाहायला मिळतं.
आतापर्यंत जनधन खाते योजनेअंतर्गत 50 कोटीहून अधिक खातेधारकांनी आपलं बँक खाते उघडलं आहे. मात्र अजूनही काहींनी बँकेत जनधन खातं उघडलेलं नाही. जर तुम्ही देखील बँकेमध्ये जनधन खात उघडलेलं नसेल, तर त्वरित उघडून घ्या, या योजनेअंतर्गत आता अनेक सुविधांचा लाभ खातेधारकांना मिळणार आहे. पीएम जनधन खात्याअंतर्गत आता ग्राहकांना महत्त्वपूर्ण सुविधा देण्यात येत आहेत. या बँक खात्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची शिल्लक राखण्याची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. एवढेच नाही, तर बँकेत एक रुपया देखील नसेल तरी देखील तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची रक्कम म्हणून देण्यात येते. जाणून घेऊया सविस्तर.
जनधन खात्याचे फायदे:
केंद्र सरकारच्या जनधन योजनेअंतर्गत जर तुम्ही जनधन खातेधारक असाल, तर तुम्हाला जबरदस्त सुविधा मिळतात. विशेष म्हणजे, हे खातं काढण्यासाठी कसल्याही प्रकारची रक्कम आकारली जात नाही. शिवाय हे बँक खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम बँकेत ठेवावी लागत नाही. वर्षानुवर्ष तुमचा झिरो बॅलन्स असेल, तरीदेखील तुमचं खातं सुरूच राहतं. या योजनेअंतर्गत जर तुम्ही खाते उघडले, तर तुम्हाला एटीएम कार्ड बरोबर दोन लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देखील दिले जाते. याशिवाय तुम्हाला तीस हजार रुपये जीवन संरक्षण विमा देखील मिळतो.
जर तुम्ही या खात्यामध्ये काही रक्कम ठेवली असेल, तर त्या रकमेवर उत्तम व्याजदर देखील मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या खात्यात एक रुपया नसेल, तरी देखील तुम्ही दहा हजार रुपये ओव्हरड्राफ्ट रक्कम म्हणून काढू शकता. या योजनेअंतर्गत खाते काढल्यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड सुविधा दिली जात असल्याने, तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकता. याशिवाय तुम्हाला या कार्डवर खरेदी देखील करता येऊ शकते. विशेष म्हणजे जनधन खाते दहा वर्षाच्या पुढील कोणतीही व्यक्ती काढू शकते.
जनधन खाते उघडण्यासाठी कागदपत्रे
जर तुम्ही देखील जन धन खाते काढू इच्छित असाल, आणि सरकारच्या या सुविधांचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर बँक खाते काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र जाणून घेऊया. जनधन खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, त्याचबरोबर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर केवायसी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे देखील जोडणे गरजेचे आहे. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावा लागत नाही. दहा वर्षे पूर्ण असणारा आणि त्यापुढील कोणत्याही वयाचा व्यक्ती हे बँक खाते ओपन करू शकतो.
हे देखील वाचा Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..
Steel Rate: स्टील, सिमेंटच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण; नविन घर बांधणाऱ्यांसाठी हा सुवर्णकाळ..
Tea Side Effects: उठल्यानंतर सकाळी चहा पित असाल तर सावधान; शरीरावर होतायत हे सात गंभीर परिणाम..
Hair fall tips: आहारात या दोन पदार्थाचा समावेश केल्यास केस गळती थांबून १५ दिवसांत येतात घनदाट केस..
SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पदांसाठी निघाली मेगा भरती; असा करा अर्ज..
Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..
Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम