Sanju Samson Ranji Trophy: संजू सॅमसनची पुन्हा वादळी खेळी, केवळ अकरा चेंडूत कुटल्या 58 धावा; पाहा व्हिडिओ..

0

Sanju Samson Ranji Trophy: सातत्यपूर्ण कामगिरी करून देखील वारंवार डावल्या जाणाऱ्या संजू सॅमसनने (Sanju Samson) पुन्हा एकदा वादळी खेळी करत BCCI आणि निवड समितीला चपराक लगावली आहे. 2015 साली आपल्या आंतरराष्ट्रीय (international cricket) कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या संजू सॅमसनने सात वर्षात केव्हा 27 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सात वर्षांमध्ये केवळ 27 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसनचे चाहते, भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आणि निवड समितीवर (selection committee) चांगलेच नाराज असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळालं आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji trophy 2022-23) झारखंड विरुद्ध केरळ (Jharkhand vs Kerala) सुरू असलेल्या कसोटी (test cricket) सामन्यांमध्ये पहिल्या डावात संजू सॅमसनने केरळ कडून खेळताना वादळी खेळी साकारली आहे. न्युझीलँड विरुद्ध झालेल्या टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेमध्ये निवड करून देखील संजू सॅमसनला खेळ खेळण्याची संधी मिळाली नाही. या मालिकेत संधी न देताच बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत समजून सॅमसनला वगळण्यात आलं. यावरून निवड समिती आणि बीसीसीआयला क्रिकेटच्या चाहत्यांनी ट्रोल देखील केलं.

एकीकडे ऋषभ पंत (Rishabh pant) पेक्षाही उत्तम आकडे असतानाही सजू सॅमसनला डावलून ऋषभ पंतला वारंवार संधी देण्यात येत असल्याने, क्रिकेट चाहते या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थीत करताना पाहायला मिळतात. बीसीसीआय कडून सजू सॅमसनला डावलत असल्याचे लक्षात आल्यानंतर, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने देखील याची दखल घेतली. संजू सॅमसनवर होणारा अन्याय पाहून, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाकडून खेळण्याची संजूला ऑफर देखील देण्यात आली.

आयर्लंड क्रिकेट बोर्डकडून आलेली ऑफर्स संजूने धुडकावून लावल्यानंतर, आता रणजी क्रिकेट स्पर्धेत झारखंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात संजूने पुन्हा एक वादळी खेळी साकारली आहे. संजूने साकारलेल्या या खेळीमुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल देखील करण्यात येत आहे. संजू सॅमसनने साकारलेल्या 72 धावांच्या खेळीत तब्बल सात गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. तर चार खणखणीत चौकार देखील त्याने लगावले.

झारखंड विरुद्ध खेळताना संजू सॅमसने १०८ चेंडू 72 धावांची बहारदार खेळी साकारली. या खेळीत त्याने तब्बल सात गगनचुंगी षटकार आणि चार चौकार लगावले. म्हणजेच त्याने केवळ अकरा चेंडूत तब्बल 58 धावा झोपल्या. संजू सॅमसनला मोठी केळी साकारता आली नाही. मात्र त्याने साकारलेली 72 धावांची खेळी खूपच बहारदार होती. तीन वर्षानंतर संजू सॅमसन रणजी ट्रॉफी खेळत असून, तो सध्या केरळ संघाचे नेतृत्व देखील करत आहे. शेवटचे वृत हाती आले तेव्हा केरळ संघाने आज दुसऱ्या दिवशी सहा बाद 276 धावा केला आहेत. अक्षय चंद्रन 85 चेंडूत 39 धावांवर तर सिजोमन जोसेफ 53 चेंडूत 28 चेंडूत खेळत आहेत.

हे देखील वाचाSanju Samson: आयर्लंड क्रिकेट बोर्डाकडून ऑफर आल्यानंतर अखेर संजूनेही घेतलाच निर्णय; म्हणाला मला..

Extramarital affair: लग्नानंतर पत्नी इतर पुरुषांकडे आकर्षित होण्याची ही आहेत चार कारणे; चौथं कारण खूपच धोकादायक..

Chanakya Niti: कुटुंबातल्या एकाला जरी ही सवय लागली, तरी घर बरबाद झालंच म्हणून समजा..

Ishan Kishan girlfriend: कोण आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड आदिती हुंडिया? फिल्मी स्टाईल ओळख अन् लव्ह स्टोरीला सुरुवात..

Indian Railway Jobs: दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये 2 हजार 521 जागांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

Indian Post Bharti 2022: भारतीय डाक विभागात दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची भरती; लगेच करा अर्ज..

Anushka Sharma pregnant: विराट कोहली दुसऱ्यांदा होणार पिता; इतक्या महिन्याची गरोदर आहे अनुष्का..

Electric Bike: या चार इलेक्ट्रिक बाईकचे दिवाने आहेत भारतीय; जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि सर्वकाही..

Second Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.