Ration Card: रेशन घेतल्याचा SMS तुम्हाला येतो का? SMS द्वारे कळतंय दरमहा किती रेशन घेतले, जाणून घ्या लगेच..

0

Ration Card: प्रत्येक गावामध्ये रेशन दुकानदार (Ration shopkeeper) सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे धान्य देत नसल्याच्या तक्रारी अनेकदा केल्या जातात. आपल्या हक्काचे धान्य आपल्याला मिळते का? याची तपासणी अनेकजण ऑनलाईन (online) करतात. मात्र असेही काही कुटुंब (family) आहेत, ज्यांच्याकडे फोन (smartphone) नसतो. साहजिकच यामुळे आपल्याला दरमहा किती रेशन मिळते? याची त्यांना माहिती नसते. रेशन दुकानदार याचा पुरेपूर गैरफायदा उठवतात. मात्र तुम्हाला याची माहिती आता एका एसएमएस (SMS) द्वारे मिळणार आहे.

गरिबांच्या हक्काचं रेशन अनेक दुकानदार देत नसल्याचे पाहायला मिळतं. यावर आता आळा बसावा यासाठी सरकारने (state government) कठोर पावले उचलायला सुरू केली आहेत. लाभार्थ्यांना आता दर महिन्याला त्यांना किती धान्य मिळते, याचा माहिती एका एसएमएस द्वारे रेशन घेतल्यानंतर दिली जाणार आहे. (Ration card mobile number link) या सुविधेची चाचणी राज्य सरकारने केली असून, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना (Supply Officer) या संदर्भात सूचना देखील दिल्या आहेत. साहजिकच यामुळे आता रेशन दुकानदारांची मुजोरी मोडीत निघणार आहे. जाणून घेऊया या सुविधे विषयी सविस्तर.

रेशन कार्ड लाभार्थ्यांच्या (Ration Card Beneficiaries) सर्व कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डला (Aadhar card link ration card) जोडण्याचे काम राज्यात जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे. रेशन कार्डला आधार कार्ड जोडल्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे? याची स्पष्टता समजली आहे. त्यांच्या संख्येनुसार धान्य वाटप करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. याबरोबरच दोन रेशन कार्डमध्ये एकाच सदस्यांची नाव देखील सरकारला वगळणे शक्य झाले आहे. साहजिकच त्यामुळे अधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मोबाईल देखील जोडला जाणार

ज्याप्रमाणे राज्यांमधील रेशन कार्ड लाभार्थ्यांच्या सदस्यांची आधार कार्ड जोडणी केली. त्याच पद्धतीने रेशन कार्ड लाभार्थ्यांच्या सदस्यांचे मोबाईल क्रमांक देखील रेशन कार्डला जोडले जाणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा देखील केली आहे. राज्य पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेऊन, या संदर्भात निर्णय प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहे.

या पद्धतीने मिळणार सुविधा

रेशन कार्ड लाभार्थ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्याचे काम होणार आहे. याच मोबाईल क्रमांकावर संबंधित रेशन कार्डवर दर महिन्याला किती धान्य देण्यात येते, त्याचबरोबर किती धान्य देण्यात आलं आहे, याची देखील माहिती रेशन कार्ड धारकांना एका एसएमएस द्वारे दिली जाणार आहे. एवढंच नाही, तर तुम्हाला मिळालेले धान्य कुटुंबातील कोणत्या सदस्यांनी खरेदी केले आहे, याची देखील माहिती तुम्हाला एका एसएमएसद्वारे मिळणार आहे.

दुकानदाराला बसणार चोप

शिधापत्रिका लाभार्थ्यांना दर महिन्याला मिळत असलेले धान्य आणि त्यांनी खरेदी केलेल्या धान्याची माहिती एका एसएमएस द्वारे मिळणार आहे. साहजिकच यामुळे रेशन दुकानदाराची मुजोरी संपुष्टात येणार आहे. सोबतच ग्राहकांच्या तक्रारी देखील कमी होण्याची शक्यता आहे.

स्वतंत्र व्यवस्था जोडणार मोबाईल क्रमांक

रेशन कार्डधारकांच्या सदस्याचा मोबाईल क्रमांक रेशन कार्डशी जोडल्यानंतर, ही सुविधा प्रत्येक ग्राहकांना मिळणार आहे. मात्र रेशन कार्डला मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था देखील तयार करण्यात येणार आहे. रेशन दुकानदारांकडे ही सुविधा दिल्यानंतर, यामध्ये भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे.

अनेक रेशन कार्ड धारकांचे मोबाईल क्रमांक रेशन कार्डसोबत जोडले जातील की नाही याविषयी वरिष्ठ पातळीवर बैठक सुरू आहे. आता तालुकास्तरावर या सुविधेचा लाभ देण्यात येत आहे. त्याचबरोबर गावामधील धान्य वितरण समितीला देखील दर महिन्याला आलेला धान्याचा कोटा एसएमएस द्वारे दिला जातो. लवकरच ही सुविधा प्रत्येक ग्राहकांना देखील दिली जाणार आहे.

हे देखील वाचा Urea Subsidy: युरिया खरेदीची चिंता मिटली; सरकार देतय 2,700 रुपये अनुदान, असा घ्या लाभ..

Ration Card: गोड बातमी! जानेवारीत सरकार रेशन कार्ड धारकांना देणार अडीच हजार; जाणून घ्या अधिक..

Business Idea: पाच हजार गुंतवा, अन् सुरू करा हा व्यवसाय; दरमहा कमवाल लाखों रुपये, सरकारही करतंय मदत..

india new coach: रोहित नंतर आता राहुल द्रविडचीही टीम इंडियाच्या कोच पदावरून हकालपट्टी; धोनी, सेहवागसह हे दिग्गज रेसमध्ये..

Pregnancy Tips: या दिवसांत संबंध ठेवल्यास लगेच राहाल गरोदर..

Golden Guys: औषध देऊन पत्नीचा गर्भपात, बाहेरील स्त्रियांशी संबंध; सनी विषयी माहिती नसलेल्या या गोष्टी जाणून सरकेल पायाखाली जमीन..

Golden Guys Bigg Boss: कुठून आलं एवढं सोनं, सोन्याच्या गाड्या मोबाईल; जाणून जाल कोमात..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

Physical relationship tips: वैवाहिक संबंधाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हे चार पोझिशन आहेत सर्वात बेस्ट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.