Hero Lectro: टू व्हीलरच्या वेगाने धावणाऱ्या Hero च्या या दोन इलेक्ट्रिक सायकल्सनी घातलाय धुमाकूळ; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्य..

0

Hero Lectro: इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) वळल्याचं पाहायला मिळतं. बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन आता अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या गाड्यांची निर्मिती इलेक्ट्रिक स्वरूपात सुरू केली आहे. मात्र इलेक्ट्रिक दुचाकीची (electric two wheeler) किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने अनेकजण यापासून वंचित राहिल्याचं देखील पाहायला मिळते. या सगळ्यांना पर्याय म्हणून आता हिरोने (Hero) आपल्या दोन इलेक्ट्रिक सायकलची (electric cycle) निर्मिती केली आहे. जिची किंमत आणि वैशिष्ट्य पाहून तुम्ही प्रेमात पडू शकता. (Hero Lectro E-Cycles)

पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले (petrol diesel price hiked) असल्याने आता या इंधनावर चालणाऱ्या गाड्या सर्वसामान्यांना वापरणं परवडत नाही. साहजिकच यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक (electric vehicles) वाहनांचा वापर करतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती जास्त असल्या तरी देखील या गाड्या वापरायला परवडत असल्याने, अनेक जण या गाड्या खरेदी करताना दिसून येतात. अनेक जण या गाड्या खरेदी करत असले, तरी प्रत्येक जणांना या गाड्या खरेदी करणे शक्य होत नाही. आणि म्हणून अशांना आता इलेक्ट्रिक सायकलचा (electric cycle) पर्याय उपलब्ध झाला आहे.

जर तुमचा बजेट कमी असेल, आणि तुम्हाला दररोज ३० किलोमीटरचा प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला इलेक्ट्रिक सायकल हा उत्तम पर्याय आहे. Hero या नामांकित कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी हिरो इलेक्ट्रिक साईकिलचा (hero Lectro E-Cycles) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. Hero Lectro ने आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक साईकिल लाँच केली आहे. जी सध्या धुमाकूळ घालते आहे. जर तुम्हाला देखील नियमित ३० किमीचा प्रवास करावा लागत असेल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. जाणून घेऊया या इलेक्ट्रिक सायकल विषयी सविस्तर.

Hero Lectro E-Cycles ने आपल्या H3 आणि H5 या दोन सायकल बाजारात उतरवल्या आहेत. या दोन्ही इलेक्ट्रिक सायकल GEMTEC समर्थित असणार आहे. कोणतेही साधन खरेदी करायचे झाल्यास, बजेट हे खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून ही ही बाब लक्षात घेऊन, Hero Lectro आपल्या दोन्ही इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती केली आहे. Hero Lectro E-Cycles ने लाँच केलेली H3 या मॉडेलची किंमत केवळ 27,499 ठेवली आहे. जी खूप कमी मानली जात आहे. त्याचबरोबर H5 या मॉडेलची किंमत 28,499 रुपये आहे.

ग्राहकांना या दोन्ही मॉडेलच्या खरेदीवर अनेक रंगांमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. ब्लिसफुल ब्लॅक-ग्रीन त्याचबरोबर ब्लेझिंग ब्लॅक-रेड यासह आणखी दोन रांगांमध्ये तुम्ही ही इलेक्ट्रिक साईकल खरेदी करू शकता. एच फाईव्ह या मॉडेल विषयी जाणून घ्यायचं झाल्यास हा मॉडेल देखील तुम्हाला Groovy ग्रीन तसेच ग्लोरिअस ग्रे रंगात खरेदी करता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही सायकल एका चार्जमध्ये किती किलोमीटर धावते, आणि हीचा ताशी वेग किती आहे? तर आपण हे देखील जाणून घेऊ.

Hero Lectro ने H3 तसेच H5 या आपल्या दोन्ही इलेक्ट्रिक सायकलमध्ये LED डिस्प्ले दिला आहे. हे विशेष आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक सायकलच्या बॅटरी विषयी जाणून घ्यायचे झाल्यास तब्बल 250 वॅटची BLDC मोटार जोडण्यात आली आहे. जिचा ताशी वेग हा 25 किलोमीटर असणार आहे. IP67 Li-ion 5.8Ah असणारी बॅटरी अवघ्या चार तासात पूर्णपणे चार्ज होते. आणि तब्बल 30 किलोमीटर प्रवास करते. जर तुमचं ऑफिस घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असेल, तर तुमच्यासाठी ही इलेक्ट्रिक सायकल खरेदी करणे खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

हे देखील वाचाSSC GD: 10वी पास उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Samsung Smartphone: Samsung ची भन्नाट ऑफर! 76 हजार किंमतीचा हा स्मार्टफोन मिळतोय १५,७०० रुपयांत..

Flipkart चा धमाका: Samsung redmi सह अनेक स्मार्टफोनवर ८० टक्क्यांची सूट; वाचा कधी सुरू होतोय सेल..

Onion Price: या कारणामुळे कांदा करणार विक्रम; जाणून घ्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान काय असणार कांद्याची स्थिती..

Sport shoes: Puma Reebok कंपनीच्या या पाच जबरदस्त स्पोर्ट शूजला अमेझॉनवर मिळतोय तब्बल 70 टक्के डिस्काउंट..

Safe Time To Have Sex After Periods: मासिक पाळीनंतर इतके दिवस संबंध ठेवू नका अन्यथा..

Lifestyle: विसाव्या वर्षात चुकूनही करू नका हे काम; अन्यथा आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.