Samsung Smartphone: Samsung ची भन्नाट ऑफर! 76 हजार किंमतीचा ‘हा’ स्मार्टफोन मिळतोय १५,७०० रुपयांत..

0

Samsung Smartphone: स्मार्टफोन (smartphone) हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. स्मार्टफोन शिवाय जगणं आता खूप कठीण झालं आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मार्केटमध्ये येणारे नवनवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र बजेटमुळे प्रत्येकाला महागडे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. अनेक दर्जेदार फीचर्स असणारा स्मार्टफोन आपल्याकडे देखील असावा, असं अनेकांना वाटत असतं. खास करून आपल्या स्मार्टफोनचा कॅमेरा (camera) हा उत्तम असावा, असं नेहमी वाटत असतं. मात्र हे शक्य नसतं. कारण चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा असणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते.

आपल्याकडे असणारा स्मार्टफोन हा दर्जेदार असावा, त्याचा कॅमेरा हा सर्वोत्कृष्ट असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र आपल्या बजेटमुळे नेहमी आपल्याला अनेक गोष्टीत कॉम्प्रमाईज करावं लागते. परंतु आता तुम्हाला महागडा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. 76 हजार किंमत असणारा सॅमसंगचा स्मार्टफोन (samsung smartphone) तुम्हाला केवळ पंधरा हजार 700 रुपयांत खरेदी करता येणार आहे. होय तुम्ही बरोबरच वाचले आहे, ही सुवर्णसंधी तुम्हाला फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर (Flipkart e-commerce website) मिळणार आहे. फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर Samsung Galaxy S21 FE 5G हा स्मार्टफोन तुम्हाला कमालीच्या डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे.

फ्लिपकार्ट (Flipkart) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या ऑफरचे आयोजन करत असते. खासकरून स्मार्टफोन खरेदीवर फ्लिपकार्टवर कमालीचा डिस्काउंट ग्राहकांना मिळतो. आता पुन्हा एकदा फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S21 FE 5G’ या स्मार्टफोन खरेदीवर ७० टक्क्यांहून अधिक डिस्काउंट मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया, Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनच्या डिस्काउंट तसेच वैशिष्ट्यांविषयी.

Samsung Galaxy S21 FE 5G 

Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनची मूळ किंमत ही 76 हजार रुपये आहे. मात्र फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटवर 76 हजार रुपये किंमत असणारा हा स्मार्टफोन केवळ 36 हजार रुपयांत विक्री केला जात आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल, मग पंधरा हजार सातशे रुपयांत कुठे मिळतोय? तर चिंता करू करू नका, या विषयी देखील आम्ही सविस्तर सांगणार आहोत. फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S21 FE 5G हा स्मार्टफोन तब्बल 52 टक्के डिस्काउंटमध्ये खरेदी करता येत आहे.

8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 76 हजार रुपये आहे. मात्र मात्र फ्लिपकार्टवर तुम्हाला हा स्मार्टफोन तब्बल 52 टक्के डिस्काउंटवर मिळत आहे. म्हणजेच तुम्हाला हा स्मार्टफोन 36 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. जर तुम्ही सिटी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून या व्यवहाराचे पेमेंट केले, तर तुम्हाला अतिरिक्त 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. एवढेच नाही, तर या खरेदीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ घेता येणार आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर तब्बल 52 टक्क्याच्या डिस्काउंटवर खरेदी करता येणार आहे. म्हणजेच 75 हजार रुपयांचा स्मार्टफोन तुम्हाला 36 हजार रुपयांत खरेदी करता येणार आहे. याशिवाय जर तुम्ही या स्मार्टफोनचा व्यवहार सिटी क्रेडिट बँकच्या माध्यमातून खरेदी केला, तर तुम्हाला अतिरिक्त दोन हजार रुपयांची सूट देखील मिळणार आहे. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफरचा जर तुम्ही लाभ घेतला, तर तुम्हाला अतिरिक्त 18 हजार 500 रुपयांची सूट मिळणार आहे. या सगळ्या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर Flipkart वरून Samsung Galaxy S21 FE 5G हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 15 हजार 700 रुपयांत खरेदी करू शकता. आता आपण या स्मार्टफोनच्या फीचर्स विषयी सविस्तर जाणून घेऊ.

Samsung Galaxy S21 FE 5G फीचर्स

Samsung Galaxy S21 FE 5G या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 6.4 inch देण्यात आला आहे. जो FHD+ dynamic AMOLED 2K सह येतो. तसेच या डिस्प्लेचा 120h रिफ्रेश रेटवर देखील आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन Android 12 वर चालतो. या स्मार्टफोनचे प्रोसेसिंग देखील भन्नाट आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये पाच नॅनोमीटर एक्सनॉस 2100 प्रदान केला आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा विचार करायचा झाल्यास कंपनीने यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.

यामध्ये 12 मेगापिक्सल सेंसरसह अल्ट्राव्हाइड आणि आठ मेगापिक्सल टेलिफोटो अशा स्वरूपाचा कॅमेरा दिला आहे. तर सेल्फिसाठी ३२ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन आठ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह मिळतो. या स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअप विषयी जाणून घ्यायचं झाल्यास, कंपनीने या स्मार्टफोनची बॅटरी तब्बल दोन दिवस चालणार असल्याचा दावा केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४५००mAh बॅटरी असणार आहे.

हे देखील वाचाOnion Price: या कारणामुळे कांदा करणार विक्रम; जाणून घ्या डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान काय असणार कांद्याची स्थिती..

Sport shoes: Puma Reebok कंपनीच्या या पाच जबरदस्त स्पोर्ट शूजला अमेझॉनवर मिळतोय तब्बल 70 टक्के डिस्काउंट..

Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

OTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..

Second Hand Bike: 20 हजारात hero spender Plus, 16 हजारात Bajaj Pulsar! कुठे सुरू आहे हा भन्नाट सेल? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.