SSC GD: 10वी पास उमेदवारांसाठी कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

0

SSC GD: बेरोजगारीचा (unemployment) स्तर दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने कुठेतरी चार पैशाची नोकरी मिळवणे सध्या खूप कठीण झालं आहे. अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्या तरी उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येकाला नोकरी मिळेलच असं नाही. उच्च शिक्षण (high education) घेऊन देखील अनेकांना बेरोजगार राहावं लागतं असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. साहजिकच यामुळे आता अनेक जण उच्च शिक्षण घेण्याऐवजी दहावी बारावीनंतरच नोकरीच्या शोधात असल्याचे दिसते. जर तुम्ही देखील दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. SSC GD Constable Notification 2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) ने विविध विभागांमध्ये कॉन्स्टेबल या पदांची भरती जाहीर केले असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कॉन्स्टेबल या पदासाठी एकूण 24 हजार 369 जागांसाठी भरती होणार असल्याने उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 देण्यात आली असून, 27 ऑक्टोंबर पासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF) सीआयएसएफ (CISF) आसाम रायफल्स या दलाच्या कॉन्स्टेबलचा सहभाग आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध दलांमध्ये तब्बल 24369 कॉन्स्टेबल या पदांची भरती होणार आहे. आता आपण या एकूण जागापैकी कोण-कोणत्या विभागात किती जागा भरण्यात येणार आहेत, याचा तपशील सविस्तर जाणून घेऊ. BCF या पदासाठी एकूण 10,497 पदे भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सीआयएसएफ या पदासाठी 10 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तर सी आर पी एफ या विभागात कॉन्स्टेबल या पदासाठी एकूण 8991 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तसेच ITBP या विभागात 1613 पदे भरण्यात येणार आहे. SSB या पदासाठी एकूण 1284 पदे भरण्यात येणार आहेत. तर SSF या पदासाठी एकूण 103 जागा भरण्यात येणार आहेत. आणि NCB विभागात एकूण 164 पदांची भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता/ वयोमर्यादा/ परीक्षा फी

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरण्यात येणाऱ्या विविध विभागात कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून आपली दहावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच उमेदवारांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कमाल वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय 23 वर्षापेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे.

मात्र यामध्ये एससी/एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी या उमेदवारांसाठी तीन वर्षाची सूट दिलेली आहे. म्हणजेच एससी/एसटी या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 28 वर्षे तर ओबीसी उमेदवारांसाठी 26 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या परीक्षा फीचा विचार करायचा झाल्यास OBC आणि EWS या उमेदवारांना 100 रुपये परीक्षा फी आकारण्यात येणार आहे. मात्र एससी आणि एसटी त्याचबरोबर महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया/ पगार

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरण्यात येणाऱ्या विविध विभागात कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवारांची निवडणूक प्रक्रिया ही संगणक आधारित परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीला देखील उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना वाचणे गरजेचे आहे. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या पगाराविषयी जाणून घ्यायचे झाल्यास उमेदवारांचे वेतन हे 18000 ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर 21 हजार 700 ते 69 हजार शंभर रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.

शारीरिक पात्रता

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरण्यात येणाऱ्या विविध विभागात कॉन्स्टेबल या पदासाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता काय असणार? हे देखील जाणून घेऊ. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची उंची 170 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. महिलांना यामध्ये सूट देण्यात आली आहे. महिलांची उंची ही 157 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. पुरुषांची छाती न फुगवतात ८० सेंटीमीटर तर फुगवल्यानंतर 85 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्यास 27 सप्टेंबर 2022 पासून सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2022 ठेवण्यात आली आहे. या विभागाची परीक्षा ही जानेवारी 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमेवर जाऊन https://ssc.nic.in/ असं सर्च करणे आवश्यक आहे. अधिसूचना पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.