Safe Time To Have Sex After Periods: मासिक पाळीनंतर इतके दिवस संबंध ठेवू नका अन्यथा..
Safe Time To Have Sex After Periods: सेक्स माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. फक्त माणसाच्याच नाही, तर प्रत्येक प्राण्यांच्या आयुष्यात सेक्स खूप महत्त्वाचा भाग आहे. सेक्स शिवाय या विश्वाची कल्पना करता येणार नाही. नियमित सेक्स केल्यामुळे माणसाचे आरोग्य देखील निरोगी राहते, हे तुमच्यापैकी अनेकांना माहित देखील असेल. तसं पाहायला गेलं, तर सेक्स करण्याची विशेष अशी वेळ नाही. कधीही कोणालाही सेक्स करण्याची इच्छा होऊ शकते. हे जरी खरं असलं, तरी सेक्स कधी करू नये, याविषयी देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
मासिक पाळी हे महिलांच्या निरोगी आयुष्याचे लक्षण आहे. महिलांचं आरोग्य व्यवस्थित असेल, तर मासिक पाळी नियमितपणे येणे स्वभाविक आहे. मात्र या संदर्भात अजूनही काही समजुती पाळल्या जातात, खास करून खेडेगावात या अधिक ठळक होतात. या काळामध्ये महिलांना घरातील कामे देखील करू दिली जात नाहीत. एवढेच नाही, तर त्यांना जेवण देखील वेगळं वाढलं जातं. मात्र महिलांना अशी वागणूक देणे अत्यंत चुकीचे असून, याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाने बदलणे आवश्यक आहे. मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवणे योग्य आहे. याविषयी अनेकांना माहिती नसल्याचं पाहायला मिळतं. आज आपण याचविषयी सविस्तर जाऊन घेणार आहोत.
मासिक पाळी दरम्यान महिलांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीं तणावांना सामोरे जावे लागते. या कालावधीमध्ये महिलांना खूप त्रास देखील सहन करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक महिलांची या काळात संबंध ठेवण्याची इच्छा होईलच असं नाही. बहुतांशी महिलांना या काळात संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही, मात्र काही महिलांची संबंध ठेवण्याची इच्छा असते. अशा काळात संबंध ठेवले, तर यात गैर काही नाही. मात्र पुरुषांनी या कालावधीमध्ये संबंध ठेवल्यानंतर आपली जागा स्वच्छ धुऊन घेणे आवश्यक असतं. त्यामुळे संसर्ग जडण्याची शक्यता कमी होते.
प्रत्येकाचा आपल्या वैवाहिक आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. अनेकांना लग्न झाल्यानंतर, लगेच मूल हवं असतं. तर काहीजण लग्न झाल्यानंतर, काही वर्षांनी मूल व्हाव यासाठी विशेष काळजी घेतात. आता जर तुम्ही कुटुंब नियोजनाविषयी विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. कारण मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवणे योग्य आहे? आणि त्याचे काही परिणाम होतात? हे जाणून घेणे फार आवश्यक आहे. जर तुम्हाला देखील लग्नानंतर, काही वर्षांनी मूल हवं असेल, तर मासिक पाळी नंतर किती दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक आहे? हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
ज्या कालावधीमध्ये आपलं शरीर गर्भधारणा करण्यासाठी सर्वाधिक जास्त तयार असते, अशा कालावधीला “ओव्ह्युलेशन पिरियड” असं म्हटले जाते. आता हा काळ तुम्हाला जाणून घेणं फार आवश्यक आहे. जर तुम्हाला लग्नानंतर लवकर मूळ हवं नसेल, तर तुम्ही ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये संबंध ठेवण्यापासून दूर राहणे गरजेचे आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, हा काळ नक्की कसा ठरवायचा? तर तुमच्या मासिक पाळीच्या 28 दिवसानुसार हा कालावधी ठरलेला असतो. आता आपण या चक्रानुसार सविस्तर माहिती जाणून घेऊ.
असा ओळखा ओव्ह्युलेशनचा दिवस
या विषयाच्या तज्ञांच्या माहितीनुसार, महिलांच्या पाळीचे हे चक्र हे एकूण 28 दिवसा अवती भवती भिरते. महिलांना मासिक पाळी आल्यानंतर, बरोबर 14 व्या दिवशी ओव्ह्युलेशन असते. तुम्हाला गर्भधारणा करायची असेल, तर बरोबर ओव्ह्युलेशनच्या चार ते पाच दिवस अगोदर संबंध ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्हाला गर्भधारणा नको असेल, तर मासिक पाळी आल्यानंतर, ओव्ह्युलेशन दिवसाच्या बरोबर चार दिवस अगोदर पासून संबंध ठेऊ नयेत. मासिक पाळी आल्यानंतर, चार-पाच दिवसांनी संबंध ठेवणे हे गर्भधारणा न होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. जर तुम्हाला गर्भधारणा हवी असेल, तर तुम्ही मासिक पाळी नंतर दहा दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक आहे.
ओव्ह्युलेशनचा कालावधी किती असतो?
मासिक पाळी आल्यानंतर नवव्या दिवसापासून ते २१व्या दिवसापर्यंत ओव्ह्युलेशनचा कालावधी असतो. या कालावधीत जर संबंध ठेवले, तर गर्भधारणा होण्याची शक्यता इतर दिवसांच्या तुलनेत अधिक असते. मोस्टली मासिक पाळीच्या चार ते पाच दिवसानंतर, किंवा लगेच देखील संबंध ठेवले जातात. मात्र या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता फार कमी असते. परंतु या काळात गर्भधारणा होतच नाही, असं नाही. काही अपवाद असू शकतात. मासिक पाळीमध्ये बिजफल होत नसल्याने, या कालावधीमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता फार कमी असते. काही महिला याला अपवाद असू शकतात.
हे देखील वाचाOTT Platform: आता hotstar वर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाहता येणार मोफत; पाहा मोफत hotstar वापरण्याची ही ट्रिक..
Electric Scooter: फक्त 32 हजारामध्ये मिळतेय ही दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम