Agricultural exports: तुमचा शेतमाल निर्यात करायचाय? आता सरकार उचलणार निर्यातीचा खर्च; जाणून घ्या प्रक्रिया..

0

Agricultural exports: भारताला कृषिप्रधान (agrarian) देश म्हणून ओळखले जाते. आज सुद्धा भारतातील ७०% लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना खूप मोठा फटाका बसला. साहजिकच यामुळे अर्थव्यवस्था देखील कमालीची घसरली. परंतु सर्व क्षेत्रांमध्ये भारतातील कृषि क्षेत्राचा मात्र यत्नुंबर लागला नाही. कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला मजबुत ठेवण्यासाठी प्रचंड योगदान दिले. त्यामुळे कृषि क्षेत्राला आपल्या देशात अनन्यसाधारण महत्व आहे. परिणामी सरकारकडून सुद्धा शेतीच्या आधुनिकीकरणासाठी नेहमी उपाययोजना केल्या जातात. त्यातलाच एक भाग म्हणजे शेतीमाल निर्यात करण्या बाबतीत सरकारचे धोरण.

अनेक शेतकर्‍यांची सुद्धा इच्छा असते की, त्यांच्या मालाची निर्यात व्हावी. काही शेतकरी इतर देशांमध्ये माल निर्यात सुद्धा करतात. कृषिमाल निर्यात केल्यास त्यास चांगला भाव मिळतो. त्यामुळे काही शेतकरी मालाची निर्यात करण्यावर भर देतात. शेतकऱ्यांना आपला कुठे विकायचा? याविषयी शेतकरी जागरूक झाल्याचे अलीकडच्या काळात पाहायला मिळतं. अनेक शेतकऱ्यांना आपला माल निर्यात केल्यावर, त्याला चांगला भाव मिळेल, हे माहित असतं. मात्र प्रत्येकाला निर्यातीचा खर्च परवडत नाही. या परंतू जर तुम्हाला तुमच्या शेतमालाची निर्यात करायची असेल आणि याबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, तर केंद्र सरकारने त्यासाठी आता काही प्रावधान केले आहेत.

शेतकर्‍यांना त्यांचा माल निर्यात करण्यास मदत व्हावी, चांगला नफा मिळावा, व उत्पादनात अधिकाधिक वाढ व्हावी. या हेतूने एक सरकारी संस्था काम करते. अपेडा नावाची ही संस्था आहे. या संस्थेच्या मदतीनेच तुम्ही तुमचा माल योग्य ठिकाणी निर्यात करु शकता. ही संस्था तुम्हाला परवा जातच नव्हे तर विदेशात देखील निर्यात करण्यासंबंधी आर्थिक मदत करते. अनेक शेतकरी आपला शेतमाल निर्यात करण्यासाठी या संस्थेची मदत घेतात मात्र अनेकांना या संस्थेविषयी माहिती नसल्याने, या योजनेचा अनेकांना लाभ घेता येत नाही. जर तुम्हाला देखील तुमचा शेतमाल निर्यात करायचा असेल, आणि त्यासाठी आर्थिक भांडवल नसेल, तर तुमच्यासाठी बातमी खूप महत्त्वाची आहे. अनेकांना निर्यात करण्याचे फायदे माहित देखील असतील. मात्र अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल निर्यात केल्यास, कोणते फायदे होतात? हे माहिती नसेल, तर आपण सर्वप्रथम निर्यातीचे फायदे देखील लक्षात घेऊ.

निर्यातीचे फायदे

शेतमाल निर्यातीचे अनेक फायदे आहेत. परंतू आपल्याकडील बहुतांश शेतकर्‍यांना याबाबत पाहिजे तेवढी माहिती नसते. त्यामुळे ते माल निर्यात करण्याचा विचार कधी करतच नाहीत. परंतू शेतमाल निर्यात केल्यास दुपटीचा लाभ तुम्हाला मिळतो. भारतीय धान्यास आंतराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यापारी छोट्या शेतकर्‍यांकडून माल विकत घेतात. आणि त्याची निर्यात करतात. शेतकर्‍यांच्या कष्टाने, मेहनतीने आलेल्या उत्पादनांवर अनेकांनी स्वत:ची घरे भरली आहेत. थोड्याफार माहितीच्या अभावामुळे शेकर्‍यांच्या पदरी निराशा येते.

भारतीय मसाल्याचे पदार्थ आणि फळांना विदेशात प्रचंड मागणी आहे. मात्र आपल्याकडचा शेतकरी वर्ग हा पारंपारिक पिकांवरच समाधान मानतो. वर्षानुवर्षे तेच ते पिक घेतले जाते. पिकांची साठवणूक करण्याची व्यवस्था नसल्यामुळे लगेच माल विकण्यास शेतकरी प्राधान्य देतात. आणि नेमका याचाच फायदा व्यापारी घेतात. आणि तुमच्या मालाची निर्यात करुन प्रचंड पैसा कमावतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा शेतमाल निर्यात करुन अधिक लाभ कमवू शकता. त्यासाठी तुम्ही ‘अपेडा’ या संस्थेची मदत घेऊ शकता. सर्वप्रथम आपण अपेडा काय प्रकार आहे हे जाणून घेऊ.

काय आहे अपेडा?

कृषि मालाची निर्यात करून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, तसेच शेतकर्‍यांना निर्यातीसाठी प्रोत्साहित करण्याचे काम अपेडा करते. १९८५ मध्ये भारत सरकारच्यावतीने अपेडाची स्थापना करण्यात आली आणि १९८६ पासून अपेडाने काम करण्यास सुरुवात केली. एग्रीकल्चर ऍन्ड प्रोसेस फुड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (agriculture and process food product development authority) असे अपेडाचे पूर्ण स्वरुप आहे. या संस्थेची मदत घेऊन शेतकरी आपला कृषि माल योग्य ठिकाणी निर्यात करु शकतात.

असा करा निर्यात

विविध सर्वेक्षण, अभ्यास करुन उत्पादनांच्या निर्यातीवर भर देण्याचे काम अपेडा करते. तसेच उत्पादन निर्यातीसाठी ‘अपेडा’च्या वतीने वित्तीय सहाय्यता सुद्धा केली जाते. शेतकरी संघ, उद्योगसमूह आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ यांच्यातील दुवा म्हणून सुद्धा अपेडा काम करते. चांगल्या दर्जाच्या उत्पादनांच्या बियांचे वाटप करणे. माल साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध करुन देणे. तसेच विक्रीकर प्रक्रिया, पॅकेजींग इत्यादीसाठी सुविधा निर्माण करुन देणे, यासारखे काम देखील अपेडा करते. फळे, भाजीपाला आणि मसाल्याचे पदार्थ या पदार्थांची सर्वाधिक निर्यात ‘अपेडा’ मार्फत होते. ‘अपेडा’ बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ‘अपेडा’ च्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.

हे देखील वाचा Electric Scooter: अमेझॉनवर मिळतेय जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर फक्त इतक्या हजारात..

Kareena Kapoor: शालेय जिवनातच या व्यक्तीकडून करीना कपूर झाली होती प्रेग्नंट; प्रकरण वाचून बसेल धक्का..

SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..

Viral video: एका मुली समोरच या दोघांनी केला सेक्स; मुलगी पाहत असूनही करू शकली नाही काहीच, व्हिडिओ व्हायरल..

Ration card: कोणत्या महिन्यात काय दराने किती रेशन तुम्ही घेऊन गेला आहात? जाणून घ्या सविस्तर माहिती सोप्या भाषेत..

Smartphone Earning: घरबसल्या मोबाइलवरून कमवा दररोज एक हजार रुपये; विश्वास नाही बसत? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

Railway requirement 2022: या उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये निघाली मेगा भरती; परिक्षेविना अशी केली जाणार निवड..

Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.