Smartphone Earning: घरबसल्या मोबाइलवरून कमवा दररोज एक हजार रुपये; विश्वास नाही बसत? जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

Smartphone Earning: कॉलेज (college) करत चार पैसे कमवायची तुमची इच्छा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अनेकांची घरची परिस्थिती बेताची असते. अशाच अनेकांना आपल्या शिक्षणाबरोबरच घर देखील सांभाळावे लागते. खरं तर घरची परीस्थिती कितीही चांगली असली, तरी अनेकांनी कमी वयातच चार पैसे कमवण्याची कला अवगत करणे अलीकडच्या काळात फार आवश्यक बनलं आहे. कमी वयामध्ये चार पैसे कमवायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला पैशाची किंमत कळते. आणि पैसे खर्च करताना आपण दहा वेळा विचार करू लागतो. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, कॉलेज करत करत काम करून पैसे कमावणे कसं काय शक्य आहे? तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे आहे.

अनेकांना शिक्षणासोबत काही तरी पार्ट टाईम जॉब (part time jobs) करण्याची ईच्छा असते. शिक्षणाचा सर्व भार घरच्यांच्या खांद्यावर टाकण्यापेक्षा काही भार ते स्वत:च उचलण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र अनेकांना नक्की कोणते काम करावे हे सुचवत नाही. जर तुमच्या बाबतीत देखील असा प्रकार घडत असेल, तर आम्ही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मदतीने दररोज एक हजार रुपयांपर्यंत इन्कम मिळवून देण्यासंदर्भातली सविस्तर माहिती देणार आहोत. याशिवाय जर तुम्ही कमी पगाराची नोकरी करत असाल आणि तुम्ही तुमच्याकडे काही वेळ शिल्लक असेल तरीदेखील तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

बाजारात अशा अनेक कामाच्या ऑफर असतात. ज्यामध्ये तुम्ही स्मार्टफोनद्वारे पैसे कमावू शकता. मात्र कुठलेही काम असो, त्यामध्ये टार्गेट हे असतेच. त्यामुळे बर्‍याचदा हे टार्गेट तुमच्यासाठी डोकेदुखी ठरु शकते. यामुळे तुम्ही ईतरत्र वेळच देऊ शकत नाही. परंतू हे काम बिना टार्गेट, बिना डोकेदुखीचे आहे. यामध्ये फक्त एक ऍप्लिकेशनची गरज आहे. जे तुमच्या फायद्याचेच आहे. एवढेच नाही तर हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये वापरत देखील असाल. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. तर आम्ही phone pay या ऍप्लिकेशन विषयी सांगत आहोत. Phone pay च्या सहाय्याने तुम्ही घरी बसून रोज १००० रुपयांची कमाई करू शकता. तर चला जाणून घेऊया फोन पे च्या मदतीने पैसे कमावण्याची ही भन्नाट आयडिया.

काय आहे phone pay?

फोन पे च्या माध्यमातून दररोज एक हजार रुपयांची कमाई कशी करायची याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोतच. मात्र त्यापूर्वी phone pay नक्की काय आहे हे जाणून घेऊया. अर्थात अनेकांना या एप्लीकेशन विषयी माहिती देखील असेल मात्र अनेकांना याविषयी माहिती नसल्याचे देखील पाहायला मिळतं त्यांच्यासाठी आपण हे ॲप्लिकेशन काय आहे हे देखील पाहू. Phone pay हे एक ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणालीशी जोडले गेलेले आहे. यावर तुम्ही तुमचे बॅंक खाते जोडू शकता. त्यासाठी तुमचा एक युपीआय आयडी तयार करावा लागतो.

या या एप्लीकेशन मध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त बँक खाते देखील जोडू शकता. बँक खाते जोडल्यानंतर तुम्ही फोनपेद्वारे सर्व व्यवहार करु शकता. देशाच्या कुठल्याही कोपर्‍यातील व्यक्तीस क्षणार्धात पैसे टाकण्याची सुविधा तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळते. या शिवाय एखाद्या कडून तुमच्या खात्यात तुम्ही पैसे देखील मागवू शकता. डिजीटल पेमेंट प्रणालीमध्ये फोनपेचा वापर सर्वाधिक केला जातो. आता आपण या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे हे देखील जाणून घेऊ.

कसे कमवायचे पैसे

फोनपेच्या मदतीने पैसे कमावण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर फोनपेवर तुमचे बॅंक खाते जोडावे लागेल. यासाठी केवायसीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावी लागेल. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे ॲप्लिकेशन चालू केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हे ॲप डाऊनलोड करा म्हणून रेफरल करावा लागणार आहे.

तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना रेफरल केल्यानंतर त्यांनी तुमच्या रेफरल नुसार हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर, त्यांना कोणालातरी पहिलं पेमेंट करायला सांगायचं आहे. जर त्यांनी तुम्ही रेफरल केलेल्या आयडीवरून ॲप चालू केलं असेल, आणि पहिलं पेमेंट केलं असेल, तर तुम्हाला एका रेफरलसाठी शंभर रुपये phone pay पेमेंट करते. जर तुम्ही दिवसभरात दहा जणांना फोन पे चालू करायला सांगितलं आणि त्यांनी पहिले पेमेंट केलं तर तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा होतात.

रेफरल काय आहे

रेफरल म्हणजे ईतरांना फोनपे एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करणे. तुमच्या फोनपेमधून यासाठी तुम्ही एक रेफरल कोड किंवा लिंक तुमच्या मित्रास सेन्ड करु शकता. या लिंकच्या मदतीनेच त्याने फोनपे एप्लिकेशन डाउनलोड करणे अनिवार्य आहे. घरी बसल्या-बसल्या जर तुमच्या १० मित्रांना सुद्धा तुम्ही रेफर केले तरी सुद्धा तुम्ही १००० रुपये दिवसाला कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कुठलेही बंधन तुमच्यावर नाही. त्यामुळे तुमची ईच्छा असेल तेवढे रेफरल तुम्ही सेन्ड करु शकता आणि त्याबदल्यात प्रत्येक रेफरलमागे १०० रुपये कमाई करू शकता.

असे काढा पैसे

फोन पे च्या माध्यमातून दिवसाला एक हजार रुपये कसे कमवायचे या विषयातील सविस्तर जाणून घेतलं मात्र तुमच्या अकाउंट वर हे पैसे कसे जमा होतात याविषयी देखील जाणून घेऊ. तुम्ही ज्या कुणाला रेफर केले आहे, त्याने त्यावर रेफरल लिंकवरुनच फोनपेचे ऍप्लिकेशन घेणे जरुरी आहे. याशिवाय डाउनलोड केल्यानंतर, जेव्हा समोरची व्यक्ती पहिला व्यवहार फोनपेच्या सहाय्याने करेल, तेव्हा तुम्हाला त्या रेफरल लिंकचे पैसे मिळतील. हे पैसे थेट तुमच्या बॅंक खात्यात जमा होतील, ज्याचे विड्रॉल तुम्ही कधीही करु शकता.

हे देखील वाचा Amazon flipkart Sale: flipkart आणि Amozon वर सुरू आहे offerss चा धुमाकुळ; स्मार्टफोनसह या वस्तू मिळतायत निम्म्या किमतीत..

Habits of Successful People: यशस्वी लोक करतात या पाच गोष्टींचे तंतोतंत पालन; जाणून घ्या आणि तुम्हीही करा हा बदल..

Marriage Tips: बायकोच्या सतत चिडचिडेपणामुळे त्रस्त आहात? फक्त हे काम करा बायकोचा चिडचिडेपणा होईल कायमचा बंद..

Post Recruitment 2022: आठवी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

India vs Australia: बुमराहच्या यॉर्करवर स्वतःची दांडी गुल होऊनही अरॉन फिंचने उभा राहून वाजवल्या टाळ्या; पाहा व्हिडिओ..

Aadhar card update: आता आधार कार्डवरचा फोटो बदलणे झाले अधिक सोपे; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया सोप्या भाषेत..

Second hand two wheeler: ४० हजार किमी पळालेली FZ केवळ 25 हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

PM PRANAM Yojana:पीएम प्रणाम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार हे जबरदस्त फायदे; जाणून घ्याया योजने विषयी सविस्तर..

Marriage Tips: लग्नानंतर महिलांना या गोष्टीची असते सर्वात जास्त भिती; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.