Monthly Income Scheme: इंडिया पोस्ट बॅंकेची जबरदस्त योजना लॉन्च; दरमहा मिळणार 5 हजार रुपये, करा फक्त हे काम..

0

Monthly Income Scheme: पैसा (money) हा प्रत्येकालाच हवाहवासा असतो. कितीही पैसे मिळाले तरी पैश्यांच्या बाबतीत मानवी मन समाधानी होणे अशक्य असल्यासारखे आहे. त्यामुळे येथे सर्वजण पैसे कमावण्याच्याच मागावर असतात. अमुक तो नुसता पैश्यांच्या मागे धावतो, पैश्यांसमोर त्याला कशाचीच किंमत नाही. नाते गोते यांना तर तो आजकाल विचारत सुद्ध नाही. असेदेखील बर्‍याचवेळा आपल्या कानावर येते. आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जिवनात पैश्यांना एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. जुन्या काळात नाते संबंध, भावनिकता, आपुलकी यांमुळे कामे व्हायची. मात्रा आता सर्वत्र केवळ पैसा बोलतो. त्यामुळे पैश्यांना आलेल्या अनावश्यक महत्वामुळे प्रत्येकजण जास्तीत जास्त पैसा कमावण्याच्याच्या विचारात असतो. (post office monthly income scheme)

समाजात सुद्धा आपण बघतो. ज्याच्याकडे जास्त पैसा लोक त्याची हाजी हाजी करतात. त्याला विनाकारण भाव देतात. काहीजण तर त्याची चमचेगिरी सुद्धा करतात. तेच दुसरीकडे कितीही चांगले व्यक्तीमत्व असले, मात्र पैसा कमी असला किंवा आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर असली तर पाहिजे ती वागणूक त्या संबंधितास दिली जात नाही. सर्वच बाबतीत असं घडतं असंदेखील नाही. काही अपवाद सुद्धा असतात. त्यामुळे प्रत्येकाचा कल पैसे कमावण्याकडे आहे. व्यवसाय किंवा नोकरी यामध्ये परिश्रम घेऊन आपण पैसा कमावतोच. परंतू याशिवाय गुंतवणुकीतून सुद्धा चांगला लाभ मिळू शकतो. शिवाय येथे परिश्रमाची सुद्धा आवश्यकता भासत नाही. त्यामुळे गुंतवणुकीतून पैसा कसा कमावावा याबद्दलच आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

ईंडिया पोस्टाच्यावतीने (India Post Bank) एक भन्नाट योजना गुंतवणुकदारांसाठी लॉन्च करण्यात आली आहे. या योजनेचे फायदे लक्षात घेतल्यास, पैश्यांवरुन पैसा कसा कमवायचा यासाठीच ही योजना असल्याचे वाटु लागते. आपण शेअर मार्केट आणि म्युचुअल फंडमध्ये पैसा गुंतवतो, पण तिथे रिस्क जास्त असते. याऊलट सरकारी खात्यांमधील विभागांत रिस्कचे प्रमाण कमी असते. त्यामुळे नव्याने लॉन्च झालेल्या India Post Bank लॉन्च करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या योजना तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येऊ शकतात. कारण येथे रिस्कही कमी आहे आणि रिटर्न सुद्धा मुबलक प्रमाणात आहे. तर जाणुन घेऊयात India Post च्या या नव्या योजनेविषयी.

पोस्ट ऑफीस मासिक ऊत्पन्न योजना (post office monthly income scheme) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला ५ वर्षांसाठी तुमचे पैसे गुंतवावे लागतील. ५ वर्षांनंतर तुम्हाला तुमची मुळ रक्कम परत मिळेल. गुंतवणुकदाराच्या मुळ रकमेला यामध्ये धक्का लागत नाही जे की ईतर ठिकाणी पैसे गुंतवल्यास तसे होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय तुम्हाला व्याजाच्या स्वरुपात दर महिन्याला पैसे मिळणार आहेत. मोठी गुंतवणुक केल्यास तुम्ही एखाद्याच्या महिन्याच्या वेतनाऐवढे पैसे महिन्याला केवळ व्याजाच्या स्वरुपात घेऊ शकता. त्यामुळेच तर या योजनेस मासिक ऊत्पन्न योजना असे नाव देण्यात आले आहे. निवृत्ती झालेल्यांसाठी तर ही योजना फारच ऊपयोगी आहे. निवृत्तीवेळी मिळालेले पैसे यामध्ये गुंतवल्यास, ५ वर्षांपर्यंत तुम्ही महिन्याला त्यावर काहीही न करता व्याज घेऊ शकता.

किती गुंतवणुक करु शकता

म्युचुअल फंड आणि शेअर मार्केटप्रमाणे मनाला येईल तेवढे पैसे गुंतवण्याचे प्रावधान या योजनेत नाही. पैसे गुंतवण्यावर त्यांनी काही मर्यादा ठेवल्या आहेत. परंतू या मर्यादा समाजातल्या प्रत्येक तबक्यास म्हणजेच श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांस दोघांसही लाभकारी आहे. यामध्ये पैसे गुंतवतांना वैयक्तिक खाते आणि संयुक्त खाते असे दोन भाग करण्यात आले आहे. ज्यामध्ये वैयक्तिक खात्यात ४.५ लाखांपर्यंत पैसे गुंतवण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर संयुक्त खात्यावर ९ लाखांपर्यंतची गुंतवणुक केली जाऊ शकते. संयुक्त ख‍ात्यात एकाच वेळी तीन प्रौढ व्यक्ती सुद्धा समाविष्ट होऊ शकतात. मात्र गुंतवणुक केवळ ९ लाखांपर्यंतचीच करु शकता.

६.६ टक्के आहे व्याज

पोस्ट ऑफीस मंथली ईन्कम स्कीम या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या पैश्यांवर ६.६% वार्षिक व्याजदर मिळते. त्यामुळे तुम्ही संयुक्त खात्यासाठी ठरवुन देण्यात आलेली ९ लाखाची गुंतवणुक केल्यास त्यावर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला ५९ हजार ४०० रुपयांचे व्याज मिळते. १२ महिन्यांमध्ये मिळालेल्या या रकमेस एका महिन्यात विभागल्यास तुम्हाला महिन्याकाठी ४ हजार ९५० रुपये मिळतात. पोस्टाच्या वैयक्तिक खात्यावर प्रत्येक महिन्याला मिळणारे हे पैसे जमा होतात. जे तुम्ही सहजरित्या काढू शकता. याशिवाय ते पैसे खात्यावर जशास तसे ठेवल्यास त्यावर सुद्धा व्याज मिळण्याचे प्रावधान या योजनेत आहे. तसेच या योजनेअंतर्गत वैयक्तित खात्यावर ठरवुन देण्यात आलेली ४.५ लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास त्यावर २ हजार ४७५ रुपये व्याज तुम्हाला महिन्याला मिळेल.

हे आहेत या योजनेचे फायदे

योजना सुरु असेपर्यंत व्याजाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होत राहतात. ५ वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर मुद्दल रक्कम जशास तशी परत मिळते. यामध्ये मुद्दल रकमेस धक्का लागत नाही. ईतर बॅंक एफडीच्या तुलनेत या योजनेत परतावा चांगला मिळतो. शिवाय रिस्क सुद्धा कमी असते. मुळ रकमेवर व्याज म्हणून महिन्याकाठी आलेले पैसे खात्यात जशास तसे ठेवल्यास ते पैसे मुद्दलमध्ये जमा होऊन त्यावर सुद्धा व्याज मिळते. ५ वर्षांचा काळ झाल्यानंतर त्यावेळच्या व्याजानुसार पुन्हा नवे खाते ऊघडता येते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल

पोस्टाच्या या योजनेची ऐवढी फायदेशीर माहिती घेतल्यानंयर तुम्ही म्हणाल की या योजनेचा लाभ नेमका कसा घ्यावा. तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही निश्चिंत राहा. याठिकाणी योजनेचा लाभ घेण्याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. सर्वप्रथम पोस्टामध्ये जाऊन तुमचे बचत खाते काढा. कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टामध्ये बचन खाते असणे अनिवार्य आहे. यानंतर दोन पासपोर्ट फोटो, सरकारी आयडी कार्ड, पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. ओळखपत्र म्हणून, आधार, मतदान कार्ड सोबत ठेवावे. पोस्टात जाऊन या योजनेचा फॉर्म भरुन घ्या अथवा फॉर्म डाऊनलोड सुद्धा करु शकता. फॉर्म भरतांना नॉमीनीचे नाव देणे आवश्यक असते.

हे देखील वाचा Peanuts With Alcohol: दारू सोबत शेंगदाणे खाण्याचे काही फायदे आहेत, पण दुष्परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन ..

sexual partner: या कारणांमुळे तीन-तीन पुरुषांसोबत महिला ठेवतात संबंध; NFHS च्या अहवालात धक्कादायक माहिती आली समोर..

Extramarital affairs: या 6 कारणांमुळे ठेवले जातात विवाहबाह्य संबंध; विवाहबाह्य संबंधापासून दूर राहायचं असेल तर करा या गोष्टी..

Husband wife relation: या पाच गोष्टी पासून महिला आपल्या पतीला ठेवतात दूर; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Bacchu Kadu: बच्चु कडूंना या कारणामुळे खावी लागणार १४ दिवस जेलची हवा; या कारणांमुळे देवेंद्र फडणवीसांनीच केला करेक्ट कार्यक्रम..

Amazon Great Indian Festival: आतापर्यंतचा सगळ्यात मोठा सेल! Samsung रेडमीसह अनेक स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..

women notice about men: पुरुषांच्या या गोष्टींकडे महिलांचं असतं बारीक लक्ष; जाणून तुम्हीही जाल चक्रावून..

PM kisan: शेतकऱ्यांनो फक्त ya नंबरवर कॉल करा, आणि 12 वा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची माहिती मिळवा..

NABARD Recruitment 2022: नाबार्डमध्ये निघालीय बंपर भरती; पदवीधरांसाठी आहे सुवर्णसंधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.