Childbirth Tips: गरोदरपणात आणि प्रसूती झाल्यानंतर इतक्या दिवसांनी संबंध ठेवणे आवश्यक; अन्यथा होतील हे गंभीर परिणाम..
Childbirth Tips: सेक्स हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. नियमित सेक्स करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी नियमित सेक्स खूप प्रभावी ठरतो. मात्र विवाहित जोडप्यांनी सेक्स संदर्भात काळजी घेणे देखील महत्त्वाचं आहे. पार्टनर गरोदर असल्यास, त्याचबरोबर प्रसूतीनंतर सेक्स कधी करावा? यासंबंधी जागरूकता असणं फार आवश्यक आहे. अनेकजण गरोदरपणात देखील सातत्याने संबंध करताना पाहायला मिळतात. मात्र यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आपल्याकडे काही विषयांवर उघडपणे भाष्य केले जात नाही. मात्र वास्तविक पाहता अशाच विषयांवर उघडपणे बोलणं आवश्यक आहे. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. जर तुमचं नवीन लग्न झालं असेल, आणि तुमची पत्नी गरोदर असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. अनेकदा अनेकजण गरोदरपणात देखील सेक्स करताना पाहायला मिळतात. गरोदरपणात सेक्स संदर्भातले नियम काय आहेत? त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याचा देखील आपण विचार करणं आवश्यक असतं.
गरोदरपणात महिलांमध्ये होतात हे बदल
महिलांना गर्भधारणा झाली, तर महिलांमध्ये केवळ शारीरिकच बदल होत नाहीत तर, त्यांच्या मानसिकतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होतात. आपण आई होणार या बाबत त्याचबरोबर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे महिलांची भावना पुरुषांपेक्षा खूप वेगळी असते. तिच्या बदललेल्या भावनांची जर पूर्तता झाली नाही, तर तिच्या या विचाराचा गर्भावर देखील परिणाम होत असतो. मात्र पुरुषांमध्ये असे कोणतेही बदल होत नाहीत. या काळात पुरुषांची लैंगिक इच्छा देखील पूर्वीसारखीच असते. बहुतेक महिलांमध्ये मात्र सेक्स बाबत विचार बदललेले असतात. साहजिकच दोघांच्या वेगवेगळ्या विचारामुळे दोघांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.
गरोदरपणात सेक्स विषयी महिलांना काय वाटतं.
गरोदरपणात सेक्स विषयी महिलांना काय वाटतं? याबाबत या विषयाचे तज्ञ सांगतात, गरोदर असणाऱ्या महिलांमध्ये संभोग करण्याची इच्छा कमी होते, ही गोष्ट खरी असली तरी त्यांना से क्स करणे आवडत नाही, असं नसतं. मात्र तुलनेने गरोदर महिलांमधील इच्छाशक्ती कमी झालेली असते. हे पुरुषाने देखील ओळखणे आवश्यक आहे. महिला गरोदर असताना जर दोघांच्याही इच्छेने संभोग होत असेल, तर सेक्स करायला हरकत नाही. मात्र आपण आपल्या पत्नीवर आपली इच्छा तर लादत तर नाही ना, हे देखील पतीने ओळखणे आवश्यक असतं.
गर्भधारणा झाल्यानंतर, सुरुवातीचे तीन महिने सेक्स करणे योग्य नसल्याचं तज्ञ सांगतात. त्याचबरोबर शेवटचे तीन महिने देखील सेक्स न करण्याचा सल्ला या विषयाचे तज्ञ देतात. गर्भधारणा झाल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने सेक्स केल्याने, गर्भाशयाला धोका होण्याची शक्यता जास्त असते. सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये गर्भधारणा नुकतीच झाल्याने, याबाबतचे संपूर्ण बदल पूर्णतः झालेले नसल्याचं तज्ञ सांगतात. त्याच्यामुळे या काळात सेक्स केल्याने गर्भाशयाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. गर्भपात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून सुरुवातीचे तीन महिने सेक्स करणे योग्य नसल्याचं, या विषयाचे अभ्यासक सांगतात.
शेवटच्या तिन महिन्यात सेक्स केल्यास काय होतं?
गर्भधारणा झाल्यानंतर, सुरुवातीच्या तीन महिन्यांत सेक्स केल्यास काय परिणाम होतात? हे आपण सविस्तर जाणून घेतलं. आता आपण गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यात सेक्स केल्यास त्याचे काय परिणाम होतात? हे देखील पाहू. तीन महिन्यांमध्ये सेक्स केल्यास रक्तस्राव होण्याची देखील शक्यता असते. डॉक्टरांनी दिलेल्या वेळेच्या अगोदर प्रसुती होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात असते. यामुळे गरोदरपणाचे दिवस पूर्ण होण्याच्या अगोदरच प्रसूती होऊ शकते. आणि म्हणून गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये सेक्स करणं टाळणं आवश्यक आहे. मधल्या वेळात तुम्ही सेक्स करू शकता. मात्र दोघांच्या सहमतीने आणि काळजीपूर्वक सेक्स करणं आवश्यक असतं. असे देखील या विषयाचे तज्ञ सांगतात. आता आपण प्रसूती झाल्यानंतर, किती दिवसांनी सेक्स करणे योग्य आहे? हे जाणून घेऊ.
प्रसूती झाल्यानंतर किती दिवसांनी सेक्स करावा
विवाहित जोडप्यांनी प्रसूती झाल्यानंतर, किती दिवसांनी सेक्स केला पाहिजे, याविषयी अनेकांना माहिती नसते. खेडेगावात हे प्रमाण अधिक जाणवतं अशी माहीती देखील एका सर्वेतून समोर आली आहे. याविषयी अनेकांना माहिती जाणून घ्यायचे असते, मात्र डॉक्टरांशी बोलणं देखील अनेकांना अनकॉम्फर्टेबल वाटतं. मात्र हा एक आयुष्याचा भाग असून, अशा विषयांवर तुम्ही अधिक संवेदनशील आणि जागरूक असणे आवश्यक असतं.
अलीकडच्या काळात सिझेरियन प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वप्रथम आपण सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर सेक्स किती दिवसांनी करावा? हे जाऊन घेऊ. दोन्हीं प्रकारच्या प्रसूतीनंतर महिलांना बरे व्हायला वेळ लागत असतो. प्रसूती झाल्यानंतर, किती दिवसांनी सेक्स करणं योग्य आहे? हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे. या गोष्टीचा विचार न करता आपण सेक्स करायला सुरुवात केली, तर याचा परिणाम महिलांच्या मानसिक त्याचबरोबर शारिरीक आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात होतो. आणि म्हणून प्रसूती झाल्यानंतर, किमान दीड महिन्यांनी सेक्स करणे आवश्यक आहे.
नॉर्मल प्रेग्नेसी झाल्यास हे खूप महत्वाचे
प्रसूती सामान्य झाली असेल, तरीदेखील आपल्याला काही बाबतीत खबरदारी घ्यावी लागते. प्रसूती नॉर्मल झाली असल्याने अनेक जण लगेच शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. प्लेसेंटा बाहेर आला असल्याने गर्भाशयाला दुखापत झालेली असते. साहजिकच ही जखम भरून येण्याकरिता वेळ लागत असतो. साहजिकच अशा वेळेस सेक्स केल्यानंतर महिलांना शारीरिक जखम होऊ शकते. याबरोबर मानसिकतेवर देखील याचा परिणाम होतो. आणि म्हणून कमीत कमी एक ते दीड महिना तुम्ही सेक्स न करणे योग्य ठरतं.
सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी
सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर, तुम्ही अधिक काळजी घेणे आवश्यक असते. सिझेरियन प्रसूतीमुळे पोटाच्या खालील भागावर टाके पडलेले असतात. साहजिकच यामधून महिलांना यातून बरे व्हायला खूप वेळ लागतो. या काळात जर तुम्ही सेक्स केला, तर टाके तुटण्याची देखील शक्यता असते. आणि म्हणून तुम्ही प्रसूती झाल्यानंतर, किमान एक दीड महिना सेक्स न करणे योग्य निर्णय ठरतो. महिला देखील मानसिक दृष्ट्या सेक्स करण्यास या काळात तयार नसतात. याविषयी देखील आपण आदर्श पती म्हणून विचार करणे गरजेचे असते.
हे देखील वाचा Relationship Tips: पार्टनर आपल्यावर खरं प्रेम करतो की नाही हे कसं ओळखाल? वाचा सविस्तर..
Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..
Health Tips: डेंग्यूचा डास फक्त याच लोकांना चावतो; डेंगू पासून दुर राहायचं असेल तर करा हे काम..
Post Office Recruitment: भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये ९८ हजार ८३ पदांची ऐतिहासीक भरती; असा करा अर्ज..
Name Astrology: या तीन नावाच्या मुलींची आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काहीही करण्याची असते तयारी..
Ration Card: नवीन रेशन कार्डसाठी असा करा online, ऑफलाईन अर्ज; दहा दिवसांत रेशन कार्ड मिळेल घरपोच..
Breakup: ब्रेकअपनंतर मुली उचलतात ही पाच धक्कादायक पावले; तुमच्या भविष्यासाठी जाणून घेणे आवश्यक..
Proprietary Rights: हे सात पुरावे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही जमिनीचे मालक असता..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.