Whatsapp Unblock: WhatsApp ने आणले नवीन फिचर्स! ब्लॉक केल्यानंतरही आता करता येणार मेसेज; जाणून घ्या प्रोसेस…

Whatsapp Unblock: भारतामध्ये इतर मेसेजिंग ॲपच्या (messaging app) तुलनेत (WhatsApp) वापरकर्त्यांची मोठी संख्या असल्याचे पाहायला मिळते. एकमेकांना चॅटिंग (chating) करण्याचे लोकप्रिय साधन सध्याच्या घडीला कोणते असेल, तर ते व्हॉट्सॲप आहे. हे तुम्ही देखील मान्य कराल. स्मार्टफोन (smartphone) वापरणारे असंख्य जण व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपचा वापर करताना पाहायला मिळतात. खासकरून तरुण वर्ग या ॲपच्या माध्यमातून आपल्या मित्र मैत्रिणींना मोठ्या प्रमाणात चॅटिंग करत असल्याचे एका सर्वेमधून समोर आले आहे. मात्र चॅटिंग करत असताना अनेकदा भांडण देखील होत असते. यातून अनेकजण एकमेकांना ब्लॉक (whatsapp block) देखील करताना पाहायला मिळतात.

तुमच्या मित्र-मैत्रिणींनी तुम्हाला ब्लॉक केलं असेल, तरीदेखील आता तुम्ही अनलॉक होऊ शकता. सोबतच तुम्हाला ब्लॉक केलं असलं तरी, तुमच्या जोडीदाराला तुम्हाला मेसेज करता येऊ शकतो. या संदर्भातले एक नवीन फीचर्स आता whatsapp ने आणले आहे. आज आम्ही तुम्हाला या संदर्भातील सविस्तर माहिती देणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तींने ‘ब्लॉक’ केले असेल, तर आता तुम्हाला स्वतःला unblock करता येणार आहे. आपल्याला ब्लॉक केलेले आहे की नाही, हे बऱ्याचदा अनेकांना समजत नाही. सर्वप्रथम आपल्याला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले आहे, हे कसे ओळखायचे या विषयी जाणून घेऊया.

DP आणि स्टेटस् दिसणार नाही. 

तुम्हाला जर तुमच्या जोडीदाराने व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले आहे की नाही, हे ओळखण्याची पहिली स्टेप म्हणजे, तुमच्या whatsapp वर त्या व्यक्तीचा डिपी, त्याचबरोबर स्टेट्स देखील दिसणार नाही. डीपी आणि स्टेटस जर दिसला नाही, तर समजून जा तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ज्या व्यक्तीने ब्लॉक केलं आहे, त्या व्यक्तीला मेसेज केल्यानंतर, दोन टिक ऐवजी एकच टिक दिसल्यास, त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं, असा त्याचा अर्थ होतो.

WhatsApp call देखील लागणार नाही.

ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे, त्या व्यक्तीचा तुम्हाला dp दिसणार नाही. मेसेज केल्यानंतर दोन टिक देखील पाहायला मिळणार नाहीत. त्याच प्रमाणे तुम्ही व्हाट्सअप कॉल केला, तरीदेखील तुमचा कॉल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही. कॉल केल्यानंतर रिंग वाजली जाईल, मात्र त्या व्यक्तीला तुम्ही कॉल करत आहे, याची जाणीव होणार नाही. याबरोबरच जर तुम्ही नवीन ग्रुप स्थापन केला, आणि तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला ग्रुपमध्ये ऍड करायला गेला, तर ऍड करता येणार नाही. जर असं झालं, तर तुम्ही समजून जा तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलं आहे.

आता आपण तुम्हाला ज्या व्यक्तीने ब्लॉक केलं आहे, त्या व्यक्तीला मेसेज कसा पाठवायचा यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ. आपल्या आवडीच्या व्यक्तींना नेहमी चॅटिंग केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. एक प्रकारे ही एक सवय लागलेली असते. मात्र काही कारणास्तव ती व्यक्ती रागाच्या भरात तुम्हाला ब्लॉक करते. साहजिकच यामुळे आपली मोठ्या प्रमाणात चिडचिड देखील होते. ब्लॉक केलेल्या व्यक्तीच्या जवळच्या माणसांना देखील आपण या संदर्भात माहिती देऊन अनब्लॉक करण्याची विनंती करतो. मात्र तरी देखील अनेकदा समोरची व्यक्ती तुम्हाला अनब्लॉक करत नाही.

अनेकदा तुम्ही त्या व्यक्तीची माफी देखील मागायला तयार असता. मात्र समोरची व्यक्ती तुमचं म्हणणं ऐकून घ्यायला देखील तयार नसते. साहजिकच यामुळे आपला मनस्ताप होतो. मात्र आता चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कोणालाही विनंती करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही व्हाट्सअपच्या मदतीने त्या व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. एवढेच नाही, तर या पद्धतीने अनब्लॉक देखील करू शकता. वाचा सविस्तर

असा करा मेसेज

ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे. त्या व्यक्तीच्या व्हाट्सअपमधून तुम्ही अनब्लॉक देखील होऊ शकता. तुम्हाला कोणालाही विनंती करण्याची आवश्यकता नाही. मात्र ही थोडीशी किचकट प्रक्रिया आहे. आपण ही पद्धत देखील पाहणार आहोत, मात्र सर्वप्रथम आपण आणखी एक सोपी पद्धत जाणून घेऊ. सर्वप्रथम तुमच्या जवळच्या मित्राला एक व्हाट्सअप ग्रुप बनवायला लावा.

व्हाट्सअप ग्रुप बनवल्यानंतर, ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे, त्या व्यक्तीला देखील तुम्ही त्या ग्रुपमध्ये ऍड करायला सांगा. ऍड केल्यानंतर जो ग्रुपचा ॲडमिन आहे, त्याला या ग्रुपमधून लेफ्ट व्हायला सांगा. आता फक्त तुम्ही दोघेच त्या ग्रुपमध्ये राहाल. त्यानंतर तुम्ही त्या ग्रुपवर टाकलेले मेसेज तुम्हाला ब्लॉक केलेली व्यक्ती वाचू शकते. साहजिकच तुम्ही या मेसेजद्वारे तिला unblock करायची विनंती देखील करू शकता.

WhatsApp डिलीट करून करता येते unblock

एवढं सगळं करून देखील समोरच्या व्यक्तीने तुम्हाला अनब्लॉक केले नाही, तर तुम्हाला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कोणालाही विनंती न करता देखील ज्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे, तिच्या व्हाट्सअप ब्लॉक लिस्ट मधून तुमचा नंबर अनब्लॉक करता येऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे व्हाट्सअप अकाउंट डिलीट करावं लागणार आहे. लक्षात घ्या डिलीट करावं लागणार आहे, अनइन्स्टॉल नाही. अनइन्स्टॉल आणि डिलीट यामध्ये फरक आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.

ही पद्धत वापरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला व्हाट्सअप मधील सेटिंगवर जाऊन Account या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. तुम्ही अकाउंट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, अनेक पर्याय पाहायला मिळतील. अनेक पर्यायांमधून तुम्हाला Delete My Account हा पर्याय निवडायचा आहे. Delete My Account या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, या ठिकाणी तुम्हाला आपल्या देशाचा कोड +९१ टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही Delete My Account या बटनावर क्लिक करून तुमचं अकाउंट डिलीट करू शकणार आहे.

तुमच्या नंबरवरचे अकाउंट तुम्ही यशस्वीरित्या डिलीट केल्यानंतर, तुम्हाला पुन्हा याच नंबरवर तुमचं अकाउंट सुरू करायचं आहे. तर ही पद्धत वापरली तर तुम्हाला ज्या व्यक्तीने ब्लॉक केलं आहे. त्या व्यक्तीच्या व्हाट्सअप ब्लॉक लिस्ट मधून देखील तुमचा नंबर गायब होईल. साहजिकच यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज करू शकणार आहे. मात्र ही पद्धत वापरत असताना एक गोष्ट लक्षात घेण्याच्या आवश्यकता आहे. ती म्हणजे तुमची पाठीमागची सर्व बॅकअप हिस्ट्री डिलीट होणार आहे.

हे देखील वाचाMarriage tips: लग्नानंतर वैवाहिक जीवनात हवा असेल भरपूर आनंद, तर लग्नाअगोदर टाळाव्या लागतील या गोष्टी..

Why do couples go for a honeymoon: लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Steel Rate update: स्टील, सिमेंट, वीट, वाळूच्या दरात लक्षणीय घसरण, सर्वसामान्यांचे घर बांधायचे स्वप्न उतरलं सत्यात..

Samsung Blue Fest 2.0: सॅमसंगचा नवा धमाका! स्मार्टफोन, टिव्ही, फ्रिजसह अनेक वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट..

Viral video: सिंहाच्या कळपावर मगर पडली भारी, अचानक हल्ला करूनही मगरीनेच अखेर तिघांचाही काढला काटा..

Whatsapp Unblock: WhatsApp ने आणले नवीन फिचर्स! ब्लॉक केल्यानंतरही आता करता येणार मेसेज; जाणून घ्या प्रोसेस..

Whatsapp update: व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलं अनेक भन्नाट फीचर्स; वाचा सविस्तर..

Amazon Xiaomi Flagship Days Sale: Xiaomi चा ४० हजाराचा ‘हा’ स्मार्टफोन केवळ १८ हजारांत; जाणून घ्या कुठे सुरू आहे सेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.