Marriage tips: लग्नानंतर वैवाहिक जीवनात हवा असेल भरपूर आनंद, तर लग्नाअगोदर टाळाव्या लागतील या गोष्टी..

Marriage tips: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो. दोन्हीं जोडप्यांना (couple) अनोळखी माणसांसोबत नवीन आयुष्य सुरु करायचं असतं. साहजिकच हे आव्हान नक्कीच सोपं नसतं. लव्ह मॅरेज Love marriage) करणाऱ्यांसाठी थोड्या फार प्रमाणात हे सोपं असलं तरी अरेंज मॅरेज करणाऱ्यांसाठी अनेक आव्हानं असतात. लग्नाच्या काही महिन्यानंतर अरेंज मॅरेज (arrange marriage) करणाऱ्यांमध्ये मोठ्या समस्या निर्माण होत असल्याचे अलीकडच्या काळात पाहायला मिळतं. पती-पत्नीचं ( husband-wife) नातं तुटण्यासाठी अनेक कारणे असू शकतात, आज आपण याच विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.  या चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

पती-पत्नीचं नातं खूप पवित्र मानलं जातं. पवित्र नात्याबरोबरच हे नातं अतूट बंधनाच देखील असतं. लग्नानंतर तुमच्याकडून अनेकांच्या अपेक्षा असतात. अनेकांबरोबर तुमच्या जोडीदाराच्या देखील अनेक अपेक्षा असतात. लग्न झाल्यानंतर तुमच्यावर अपेक्षांचा ओझं पडत असलं, तरी तुम्हाला यातून व्यवस्थितरित्या मार्ग काढावे लागतात. लग्न झाल्यानंतर आपण एक उत्कृष्ट जोडीदार कसा होऊ शकतो, आपल्या जोडीदाराच्या हृदयात आपण कसं स्थान मिळवू शकतो, यावर तुम्ही अधिक जोर देणं आवश्यक असतं. लग्नाअगोदरच्या काही सवयींमुळे, त्याचबरोबर लग्नानंतरच्या देखील तुमच्या कृतीमुळे तुम्ही वैवाहिक जीवनात आनंदी राहू शकत नाही. किंवा नातं तुटू देखील शकतं. याची तुम्हाला कल्पना आहे का? हातावर या रेषा असतील तर वैवाहिक जीवनात येतात खूप अडचणी..

कोणत्याही नात्यात विश्वास असेल, तरच नात्यांमध्ये प्रेम टिकून राहतं. आणि तुमचा सन्मान देखील राखला जातो. पती-पत्नीच्या नात्यात तर विश्वास आणि सन्मान या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरतात. या दोन गोष्टीची जर तुम्ही काळजी केली नाही, तर तुम्हाला वैवाहिक जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. एवढेच नाही, तर तु्मच नातं देखील तुटू शकतं. नात्यांमध्ये गैरसमज असता कामा नये, खास करून पती-पत्नीच्या नात्यात तर मुळीच नाही. लग्नाअगोदरच्या कोणत्या सवयीमुळे तुमच्या नात्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. याबरोबरच लग्नानंतर तुम्ही कसं वागायला हवं, याविषयी सविस्तर जाणून घेऊ. लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येण्यासाठी आणि आनंद पेरण्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराची विचारसरणी, त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराच्या आवडी-निवडी समजून घेणं फार आवश्यक असतं. लग्नाअगोदरच्या तुमच्या काही सवयी तुमच्या वैवाहिक जीवनात बाधा आणू शकतात. आणि म्हणून तुम्ही भूतकाळाविषयी विसरून नवीन आयुष्य सुरू करणं फार आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण तुमच्या लग्नाअगोदरच्या कोणत्या सवयींमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात, याविषयी जाणून घेऊ.

तुमचा बिनधास्तपणा ठरू शकतो व्हिलन

लग्नाअगोदर आपण खूप बिनधास्तपणे जगत असतो. कोणत्याही विषयासंदर्भात आपण गंभीर नसतो. भविष्यामधील आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही समस्येची आपल्याला जाणीव नसते. लग्नाअगोदर मित्रांसोबत असणारं आयुष्य आणि लग्नानंतरचं आयुष्य खूप वेगळं असतं. लहानपणापासून आपल्याला मित्रांसोबत मस्ती करायची सवय असते. लग्नानंतर देखील आपण याच सवयी सुरू ठेवल्या, तर मात्र त्या तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळा निर्माण करू शकतात. कारण मित्रांसोबत बिनधास्तपणाने फिरण्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे अधिक लक्ष देऊ शकत नाही. आणि जोडीदाराच्या आवडीनिवडी देखील समजून घेताना अडथळे निर्माण होऊ शकतात.

स्मोकिंग आणि ड्रिंकिंग

लग्नाअगोदर आपलं अधिक आयुष्य मित्रांसोबत असल्याने, आपल्याला अनेक वाईट सवयी देखील जडतात. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करणं त्यातलाच एक प्रकार आहे. लग्नाअगोदर आपण ज्या गोष्टी करत होतो, त्या सगळ्या सोडून देऊन लग्नानंतर आपल्याला एक नवीन आयुष्य जगण्याकडे भर देणं आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराला तुम्ही स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग केलेली अनेकदा आवडत नाही. ड्रिंकिंग आणि स्मोकिंग तुमच्या आरोग्यासाठी देखील धोकादायक आहे. सतत ड्रिंकिंग आणि स्मोकिंग केल्याने तुम्हाला लैंगिक समस्याचा देखील सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी ठेवायचं असेल, तर लैंगिकता फार महत्त्वाची असते.

उत्साह महत्वाचा

लग्नाअगोदर अनेकांना एखादी गर्लफ्रेंड असू शकते. यात विशेष वाटण्यासारखं काही नाही. मात्र हे देखील वैवाहिक जीवनात समस्या निर्माण करण्याचे कारण ठरू शकते. लग्नाअगोदर आपल्याला गर्लफ्रेंड असल्याने, आपल्याला से क्स विषयी बऱ्याच प्रमाणात माहिती असते. अनेकांनी लग्नाअगोदर से क्स देखील केलेला असतो. यात चुकीचे देखील काही नाही. मात्र लग्नानंतर देखील सेक्स करताना तुमची एक्साईटमेंट आणि उत्साह पहिल्यांदाच से क्स करतोय, असाच असणं आवश्यक आहे. यामुळे तुमचा पार्टनर देखील संतुष्ट होऊ शकतो. जर असं झालं नाही, तरी देखील तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात.

आता आपण लग्नानंतर वैवाहिक जीवन आनंदी घालवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊ. एकमेकांचा आदर करणं आवश्यक

कोणत्याही नात्यांमध्ये एकमेकांचा सन्मान करणं फार आवश्यक आहे. कधीही समोरच्याच्या आत्मसन्मानाला ठेस पोहोचेल, असं वर्तन करू नये. जर तुम्ही समोरच्याचा आदर केला नाही, तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करू शकत नाही. आणि कोणत्याही नात्यात प्रेम नसेल, तर ते नातं व्यर्थ असतं. लग्नासारखे पवित्र नातं अधिक घट्ट होण्यासाठी या नात्यात भरपूर प्रेम असणे आवश्यक असतं.

विवाहापूर्वी जोडीदाराचा होकार

लग्न जमवताना तुम्ही जोडीदाराशी संवाद साधणं अलीकडच्या काळात फार आवश्यक झालं आहे. अनेकदा घरच्यांच्या दबावामुळे अनेक जण लग्नाला होकार देतात. साहजिकच याचे परिणाम लग्नानंतर होऊ शकतात. लग्न जमवताना तुम्ही जोडीदाराला त्याच्या आवडी-निवडी त्याचबरोबर त्याच्या स्वातंत्र्याविषयी देखील बोलणं आवश्यक आहे. जर तुम्ही या गोष्टी बोलणार नसाल, तरीही एकवेळ चालेल. मात्र तुम्ही लग्नाला तयार आहे की नाही, हे मात्र विचारणं गरजेचं आहे. अन्यथा लग्नानंतर वैवाहिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नातेवाईकांविषयी जाणून घेणं आवश्यक

लग्न झाल्यानंतर, त्याचबरोबर लग्नाअगोदर देखील जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांविषयी जाणून घेणे फार आवश्यक आहे. जोडीदाराचे आई-वडील भाऊ बहीण, मित्र यांची विचारसरणी देखील समजून घेणे गरजेचे आहे. लग्नानंतर वैवाहिक जीवनात काही वाद झाले, तर ही मंडळी आपल्या मुलीला किंवा मुलाला व्यवस्थितरित्या समजून सांगतील, अशा विचारांची असणं फार आवश्यक असतं. जेव्हा तुम्ही जोडीदाराच्या आई-वडिलांची किंवा नातेवाईकांची माहिती घेत असता, विचारपूस करत असता, तेव्हा तुमच्या जोडीदाराला देखील त्याच खूप मोठं कौतुक वाटत असतं. साहजिकच यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होणयास मदत होते.

जोडीदाराच्या आवडी-निवडी

लग्नानंतर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडी-निवडी काय आहेत? याविषयी जाणून घेणे फार आवश्यक आहे. लग्नानंतर तुमच्या जोडीदाराला हवं तितकं स्वातंत्र्य देणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. तुमचा जोडीदार लग्नानंतर काय करू इच्छित आहे, हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. जर तुमच्या जोडीदाराला एकत्रित कुटुंबात राहायला आवडत नसेल, तरी देखील तुम्ही त्याचा सन्मान करून, त्या दृष्टीने पाऊल टाकणं आवश्यक आहे. अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हे देखील वाचा ya चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Hero Splendor Plus: या ठिकाणी केवळ 13 हजारांत मिळतेय हिरो स्प्लेंडर; विश्वास नाही बसत? पाहा डिटेल्स..

Whatsapp update: व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलं अनेक भन्नाट फीचर्स; वाचा सविस्तर..

Viral video: सिंहाच्या कळपावर मगर पडली भारी, अचानक हल्ला करूनही मगरीनेच अखेर तिघांचाही काढला काटा..

Vastushastra: आरसा लावण्याचे he आहे योग्य ठिकाण; चुकूनही लावू नका या ठिकाणी आरसा अन्यथा होईल सत्यानाश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.