Steel Rate update: स्टील, सिमेंट, वीट, वाळूच्या दरात लक्षणीय घसरण, सर्वसामान्यांचे घर बांधायचे स्वप्न उतरलं सत्यात..

Steel Rate update: आपल्या स्वप्नातलं घर बांधणं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. त्यासाठी प्रत्येकजण दिवस रात्र मेहनत देखील करतो. गेल्या काही वर्षांपासून स्टीलचे (Steel Rate) दर सातत्याने वाढतच होते. यामुळे सर्वसामान्यांना नवीन घर बांधणे परवडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत होते. पाठीमागच्या पाच सहा वर्षात घरासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती गगनाला भिडल्याने अनेकांनी घर बांधण्याचा निर्णय तूर्तास थांबवल्याचे देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळत होते. मात्र आता नवीन घर बांधणारांसाठी खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून स्टीलचे दर दिवसेंदिवस ढासळत आहेत.

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, त्याचबरोबर बेरोजगारीचा दर देखील वाढत चालल्याने अनेकांच्या उत्पन्नावर बऱ्यापैकी कात्री बसल्याचे चित्र आहे. गेल्या एक-दीड वर्षापासून सर्वसामान्याचे उत्पन्न देखील घटले आहे. याबरोबरच घर खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने, अनेकांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागत आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तू महाग होत चालल्या असल्या, तरी दुसरीकडे मात्र घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे.

गेल्या दोन महिन्यापूर्वी स्टील आणि लोखंडाच्या दरात कमालीची घसरण झाली होती. साहजिकच यामुळे स्टीलला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने स्टीलचे दर प्रति टन साधारण साडेसहा हजार रुपये वाढल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता पुन्हा एकदा स्टीलचे दर कमी झाले असून, नवीन घर बांधू इच्छित असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही देखील नवीन घर बांधायच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

फक्त स्टीलच नाही तर वाळू, वीट, सिमेंट या वस्तू देखील कमी झाल्या आहेत. साहजिकच यामुळे आता तुम्ही पकडलेल्या खर्चापेक्षा कमी खर्चात तुमचं घर पूर्ण होण्यास देखील मदत होऊ शकते. यावर्षीच्या सुरुवातीला जानेवारी ते एप्रिल या महिन्यांत स्टीलच्या दरांनी उच्चांक गाठला होता. मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात स्टीलचे दर सातत्याने कमी झाले. या काळात स्टीलची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. अनेक वर्षांपासून घर बांधायचे स्वप्न उराशी बाळलेल्यानी देखील स्टील खरेदी केले. मात्र आता पुन्हा स्टीलच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत असल्याने, सर्वसामान्य चिंतेत आहे. परंतु स्टीलच्या दरात फारशी वाढ झाली नाही.

एप्रिल पासून जून पर्यंत स्टीलचे दर तब्बल निम्म्या किंमतीवर आले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून स्टीलच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात स्टीलच्या दरात फारशी वाढ झाली नसली तरी, स्टीलचे दर येणाऱ्या काही महिन्यांत आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी घर बांधण्याची ही शेवटची सुवर्णसंधी आहे.

गेल्या महिन्यांत स्टीलच्या दरात सातत्याने चढ उतार पाहायला मिळाले होते. या पूर्वी स्टिलचे दर ८४ हजार प्रती टन झाले होते. मात्र मार्च नंतर हे दर तब्बल निम्म्या किमतीवर आले होते. स्टीलचे दर कमी होऊन ४४ हजार प्रती टन पर्यंत आले होते. 50 ते 60 हजार रुपये प्रति टन आहेत. मात्र स्टीलचे दर पुढच्या काही महिन्यात पुन्हा एकदा एक लाख टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. स्टीलचे दर पूर्व प्रमाणे झाले तर सर्वसामान्यांना आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी आणखी पुढे वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या दोन-तीन वर्षात घर बांधणारांनी स्टील आत्ताच खरेदी केलं तरी देखील उपयुक्त ठरू शकतं.

या पद्धतीने पाहता येतील स्टीलचे दर

भारतातील प्रत्येक शहरात स्टीलचे दर हे वेगवेगळे असतात. तुम्हाला देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये स्टीलचे दर पाहायचं असतील, तर तुम्हाला Ironmart या वेबसाईटवर जाऊन पाहता येणार आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये स्टीलचे दर चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल वरून Ironmart असं सर्च करणं आवश्यक आहे. हे सर्च केल्यानंत, तुमच्या समोर या संदर्भातली वेबसाईट ओपन होईल, यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्ही शहरांची नावे टाकून स्टीलचे दर चेक करू शकता. या वेबसाईटवर दररोज स्टील संदर्भात अपडेट ठेवली जाते.

मुंबईसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये सध्या स्टीलचे दर काय आहेत, यावर आपण थोडक्यात नजर टाकूयात. मायानगरी मुंबईमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यात प्रती टन स्टील फक्त ५०० रुपयांनी वाढले आहे. स्टीलच्या दरात मुंबईमध्ये फारशी वाढ झाली नसली तरी, इतर शहरांत मात्र अडीच हजारांपासून तब्बल साडेसहा हजार रुपयांपर्यंत प्रति टन वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या घडीला पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक स्वस्त स्टील विकले जात आहे, पश्चिम बंगालमध्ये स्टील प्रति टन 51 ते 52 हजार रुपये प्रमाणे विकलं जात आहे.

हे देखील वाचाWhy do couples go for a honeymoon: लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

Marriage tips: लग्नानंतर वैवाहिक जीवनात हवा असेल भरपूर आनंद, तर लग्नाअगोदर टाळाव्या लागतील या गोष्टी..

Samsung Blue Fest 2.0: सॅमसंगचा नवा धमाका! स्मार्टफोन, टिव्ही, फ्रिजसह अनेक वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट..

Hero Splendor Plus: या ठिकाणी केवळ 13 हजारांत मिळतेय हिरो स्प्लेंडर; विश्वास नाही बसत? पाहा डिटेल्स..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा..

Whatsapp update: व्हाट्सअप आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आलं अनेक भन्नाट फीचर्स; वाचा सविस्तर..

Vastushastra: आरसा लावण्याचे हे आहे योग्य ठिकाण; चुकूनही लावू नका या ठिकाणी आरसा अन्यथा होईल सत्यानाश..

Second hand car: ४८ हजार पळालेली Maruti Suzuki Alto केवळ ७८ हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Viral video: सिंहाच्या कळपावर मगर पडली भारी, अचानक हल्ला करूनही मगरीनेच अखेर तिघांचाही काढला काटा..

Lifestyle: या तीन गोष्टींचे पालन केल्यास, कुटुंबामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्य नांदेल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.