Samsung Blue Fest 2.0: सॅमसंगचा नवा धमाका! स्मार्टफोन, टिव्ही, फ्रिजसह अनेक वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट..

Samsung Blue Fest 2.0: सॅमसंग ही भारतामधील सर्वात मोठी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. अनेकजण या कंपनीचे प्रोडक्ट खरेदी करणं पसंत करतात. फ्रीज तसेच टीव्ही या कंपनीचा खूपच दमदार असल्याचा review ग्राहक देत असतात. सॅमसंग देखील आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी अनेक वस्तू ऑफर्समध्ये विकते. सॅमसंगने आता पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी मोठ्या सेलचे आयोजन केले आहे. सॅमसंगने आपल्या ग्राहकांसाठी Samsung Blue Fest 2.0 या सेलचे आयोजन केले आहे. सॅमसंगच्या ग्राहकांना या सेलमध्ये LED, फ्रीज, मायक्रोओव्हन, home theatre washing Machine, या सारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर ऑफर देण्यात आली आहे.

सॅमसंगने आयोजित केलेला Samsung Blue Fest 2.0 हा सेल ग्राहकांसाठी आजपासून सुरू झाला असून, हा सेल २१ ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांना या सेलचा लाभ सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअरवर घेता येणार आहे. याबरोबरच ऑफलाईन सॅमसंगच्या स्टोअरमध्ये देखील ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो. देशभरातील सर्व प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअरमध्ये आजपासून २१ ऑगस्ट पर्यंत ग्राहकांना अनेक ऑफरवर लाभ घेता येणार आहे.

सणासुदीला अनेकजण घरामध्ये नवनवीन वस्तू खरेदी करताना पाहायला मिळतात. तुम्ही देखील नवीन वस्तू खरेदी करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. फ्रीज, वॉशिंग मशिन, टीव्ही, यासह स्मार्ट फोनवर देखील सॅमसंगने ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ठेवला आहे. Samsung Galaxy S22, या स्मार्ट फोन खरेदीवर २० टक्के अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळणार आहे. याबरोबरच शून्य डाउन पेमेंटसह सुलभ EMI सह आकर्षक बंपर डील्सचा देखील लाभ ग्राहकांना मिळणार आहे.

टीव्ही (TV)

जर तुम्ही एलसीडी खरेदी करू इच्छित असाल, तर या या सेलमध्ये तुम्हाला एलसीडी खरेदीवर तीस टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. या शिवाय काही मॉडेल्सवर तुम्ही २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकता. ब्लू फेस २.० मध्ये तुम्ही काही निवडक मॉडेलवर तीन वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. तसेच दहा वर्षाची स्क्रीन बर्न इन वॉरंटी देखील मिळणार आहे. सॅमसंगची ‘प्रीमियर न्यू एलईडी’ टीव्ही इतर सामान्य टीव्हीपेक्षा खूप जबरदस्त डिझाईन केलेली आहे. याच्या फीचर्स विषयी जाणून घ्यायचे झाल्यास, गेम कन्सोल, व्हर्च्युअल प्लेग्राउंड, अशा अनेक नवीन फीचर्समुळे हा टीव्ही खास तर ठरतोच, शिवाय अनेक भन्नाट ऑफरवर देखील खरेदी करता येतो.

रेफ्रिजरेटर

सॅमसंगचे रेफ्रिजरेटर खरेदी करणारा मोठा वर्ग पाहायला मिळतो. जर तुम्ही देखील संस्थेचे रेफ्रिजरेटर खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे सॅमसंग आपल्या ऑफरमध्ये रेफ्रिजरेटरवर तब्बल 20 टक्क्यांपर्यंत सूट देत असून, काही निवडक मॉडेलवर 20% कॅश बॅक देखील ग्राहकांना मिळणार आहे. तुम्ही शून्य डाऊन पेमेंटसह अनेक सुलभ ईएमआय पर्यायासह रेफ्रिजरेटर खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला डबल बंपरचा लाभ मिळणार आहे. याबरोबरच ग्राहकांना Galaxy S22 (8GB/128GB) या स्मार्टफोन खरेदीवर देखील अनेक ऑफर्स मिळणार आहेत. तब्बल दोनशे ते अडीचशे लिटरची क्षमता असणारा हा फ्रीज ग्राहकांना फक्त 20,000 रुपयांना मिळणार आहे. या फ्रीजच्या फीचर्स विषयी जाऊन घ्यायचं झालं, तर हा जगातला एकमेव असा फ्रीज आहे, ज्यामध्ये तुम्ही दही बनवू शकता. यात तुमचे अनेक पदार्थ कुल वातावरणात राहतात. या बरोबरचऊर्जेची देखील कमालीची बचत होत असल्याने हे खूप उपयुक्त आहे.

मायक्रोवेव्ह (microwave)

सॅमसंग ब्लू फेस्ट 2.0 या सेलमध्ये स्वयंपाक प्रेमींसाठी जबरदस्त डील उपलब्ध आहेत. भारतीय संस्कृती मोठ्या प्रमाणात खवय्ये पाहायला मिळतात‌. मात्र धावपळीच्या या जमान्यात अनेकांना आपल्या आवडतीचे पदार्थ वेळेत खायला मिळत नाहीत. अशांसाठी या सेलमध्ये मायक्रोवेव्ह खरेदी करण्याची मोठी संधी आहे. मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही अनेक पदार्थ गरम करून खाऊ शकता. या सेलमध्ये देखील मायक्रोव्हेव वर प्रचंड मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये तुम्ही मायक्रोवेव्ह 18 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. विशेष म्हणजे तुम्हाला या मायक्रोवेवर तब्बल दहा वर्षाची वॉरंटी देखील मिळणार आहे.

साऊंडबार (home theatre)

सॅमसंगच्या या सेलमध्ये होम थेटरवर देखील भन्नाट ऑफर ठेवण्यात आली आहे‌. जर तुम्हाला संगीत ऐकण्याची आवड असेल, तर तुम्ही सॅमसंगचा तब्बल 30% पर्यंत सूट मिळणारा साऊंडबार खरेदी करू शकता. या ऑफर्स बरोबर तुम्हाला दहा टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा साऊंडबार वायरलेस आहे. याला जोडण्यात येणारे डॉल्बी अॅटमॉस हे वायरलेस आहेत.

वॉशिंग मशीन (washing machine)

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा आपण पाहतो,धुवलेली कपडे लवकर व्यवस्थितरीत्या वाळली जात नाहीत. तुम्हाला देखील अशा समस्या येत असतील, तर तुम्ही वाशिंग मशीन खरेदी करू शकता. कारण या सेलमध्ये तब्बल 25% डिस्काउंटवर वॉशिंग मशीन खरेदी करता येणार आहे. सोबतच 20% अतिरिक्त कॅश बॅक देखील मिळणार आहे. याशिवाय तुम्ही शून्य डाऊन पेमेंट करून देखील वॉशिंग मशीन खरेदी करू शकता. इको बबल टेक्नॉलॉजीने बनवण्यात आलेल्या या वॉशिंग मशीन मधून कपडे काढल्यानंतर डायरेक्ट तुम्ही इस्त्री देखील करू शकता. म्हणजेच वॉशिंग मशीन मधून धुवून काढलेले कपडे तुम्हाला वाळवण्याची गरज नाही.

हे देखील वाचाToday Steel Rate: घर बांधणाऱ्यांसाठी गोड बातमी, स्टील सिमेंट झाले स्वस्त; जाणून घ्या आजचे दर..

Rechargeable LED Bulbs: आता इन्व्हर्टरची गरज नाही; शंभर रूपयांचे हे LED Bulbs खरेदी करा आणि लाईट गेल्यावरही आठ तास प्रकाश मिळवा.. 

लग्नानंतर हनीमूनसाठी बाहेरच का जातात? ही पाच कारणे जाणून तुम्ही देखील जाल चक्रावून..

चार गोष्टींचा विचार करून मुली बांधतात लग्न गाठ; वाचून तुम्हीही जाल चक्रावून..

Vastushastra: आरसा लावण्याचे हे आहे योग्य ठिकाण; चुकूनही लावू नका या ठिकाणी आरसा अन्यथा होईल सत्यानाश..

Viral video: सिंहाच्या कळपावर मगर पडली भारी, अचानक हल्ला करूनही मगरीनेच अखेर तिघांचाही काढला काटा..

Hero Splendor Plus: या ठिकाणी केवळ 13 हजारांत मिळतेय हिरो स्प्लेंडर; विश्वास नाही बसत? पाहा डिटेल्स..

Wheat growers farmer: गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर उठले मोदी सरकार; आता गहू कवडीमोल भावाने विकला जाणार हे आहे कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.